ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » ‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार

‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवी दिल्ली, ५ डिसेंबर –

Nsg Commandos Elit Surgicalistrike Unit

Nsg Commandos Elit Surgicalistrike Unit

पाकिस्तानचे छुपे युद्ध संपण्याची शक्यता नजीक काळात नसल्याने केंद्र सरकार ‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापन करण्याचा विचार करीत आहे. या युनिटमध्ये तीनही सशस्त्र दलातील सर्वोत्कृष्ट अधिकार्‍यांचा समावेश केला जाईल. शत्रूचा जमीन, हवा आणि पाण्यातून वाढत असलेला धोका लक्षात घेऊन सरकार या युनिटची स्थापना करण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीनही सशस्त्र दलातील सर्वोत्कृष्ट तंत्र अवगत असलेल्या अधिकार्‍यांची प्लॅटून स्थापन करण्याची गरज केंद्र सरकारला जाणवत आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
अचानक खोलवर हल्ला करून शत्रूला आश्‍चर्यचकित करणे, भरून निघणार नाही असे शत्रूचे नुकसान करून वेगाने परतण्यासारख्या कारवाया करण्याचा अधिकार या युनिटला राहील, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची ही कल्पना असल्याचेही सांगितले जात आहे. या नव्या युनिटमध्ये वायुदल, नौदल आणि भूदलातील गरुड, मार्कोस आणि पारस कमांडो तुकड्यांमधील कमांडोंचा समावेश केला जाईल. अमेरिकेतील नेव्ही सील्सप्रमाणेच या युनिटमधील सैनिकांची क्षमता राहील. अमेरिकी नेव्ही सीलच्या कमांडोंमध्ये परिस्थिनुरूप स्वतःमध्ये बदल घडवून मोहीम फत्ते करण्याची क्षमता आहे.
भविष्यात कारवाई करण्यासाठी वायुदलाचाही वापर करण्याचा विचार सरकार करीत असल्याने सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये समावेश असलेल्या विशेष पथकापेक्षा नवे युनिट जास्त हिकमती असेल. हे युनिट स्थापन करण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जाईल. पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेले युद्धबंदीचे उल्लंघन आणि घुसखोरीचे प्रयत्न केले जात असल्याने हे युनिट स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.
असे असेल युनिट
दहशतवाद विरोधी कारवायांचा दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या अधिकार्‍यांचा समावेश या युनिटमध्ये केला जाईल. लष्करप्रमुख हे या युनिटचे प्रमुख राहतील. युनिटमध्ये दोन गट असतील. त्यातील ९६ सदस्यांचा एक गट हल्ल्यासाठी तपशीलवार योजना तयार करेल, तर, दुसरा गट प्रत्यक्ष कारवाई करणार्‍या कमांडोंचा असेल. यामध्ये १२४ सदस्य राहतील. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेतांप्रमाणे कारवाई करणार्‍या गटात दोन उपगट असतील. कोणत्याही अडथळ्याविना वेगवान चपळ कारवाईसाठी यातील एक गट हल्ला करणारा असेल, तर दुसरा गट त्यांच्या मदतीसाठी असेल. युनिटमधील कमांडोंना लढण्याच्या उच्च तंत्राचे प्रशिक्षण दिले जाईल. कारवाईदरम्यान वायुदलासोबत समन्वय ठेवणे. उच्चतंत्राचे नकाशे समजवून घेणे याचे प्रशिक्षण कारवाई करणार्‍या गटातील कमांडोंना देण्यात येईल. लक्ष्य व संबंधित परिसराची परिपूर्ण माहिती, गुप्तचर विभागाचे मार्गदर्शन आणि कारवाई करणार्‍या गटाला मदत करण्याचे प्रशिक्षण दुसर्‍या गटाला दिले जाईल.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (622 of 2234 articles)

National Herald Scam Sonia Rahul
विवरणाचा फेरआढावा घेण्यास परवानगी ►नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नवी दिल्ली, ४ डिसेंबर - नॅशनल हेरॉल्डशी संबंधित असलेल्या प्रकरणात ...

×