ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसचा नसेल, आमचा लष्कराच्या शौर्यावर पूर्ण विश्‍वास

काँग्रेसचा नसेल, आमचा लष्कराच्या शौर्यावर पूर्ण विश्‍वास

नवी दिल्ली, ५ मार्च –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

काँग्रेसचा लष्करावर, वायुसेनेवर विश्‍वास नाही, पण आमचा लष्कराच्या आणि वायुसेनेच्या शौर्यावर, पराक्रमावर पूर्ण विश्‍वास असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकरप्रसाद यांनी आज स्पष्ट केले.
बालाकोट येथील हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍या काँग्रेस नेत्यांवर भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत घणाघाती हल्ला चढवतांना प्रसाद म्हणाले की, शहीद जवानांच्या बलिदानाचा, तसेच लष्कराचा काँग्रेस नेते अपमान करत आहे. किती खालच्या भाषेत आपण लष्कराचा अपमान करतो, याची काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आपल्या पातळीहीन शब्दांनी सेनादलांचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा बेजबाबदार विधानांनी अतिशय वेदना होत आहे.
माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करत प्रसाद म्हणाले की, इंग्रजीच्या या विद्वानांचा देशातील लष्करावर विश्‍वास नाही, हे दुर्दैवी आहे.
इंग्रजीचे विद्वान आणि देशातील प्रसिद्ध वकील काही कौटुंबिक समस्यांनी ग्रस्त आहे, असा टोला मारत प्रसाद म्हणाले की, चिदम्बरम् यांचे व्यक्तिमत्त्व आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळे ते सतत परदेशी माध्यमांचा संदर्भ देत असतात, पण देशातील लष्करावर मात्र त्यांचा विश्‍वास नाही.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांच्यावर टीका करतांना प्रसाद म्हणाले की, त्यांचा स्तर इतका घसरला की, पुलवामा येथील देशाला हादरवणार्‍या अतिरेकी हल्ल्याची तुलना अपघाताशी केली. दिग्विजयसिंह दहा वर्षे मुख्यमंत्री होते, पण आज ते ज्या शब्दांचा वापर करत आहे, ते ऐकून वाईट वाटते. ओसामा बिन लादेनचा उल्लेख ते ओसामाजी असा करत असतात. हाफीज सईद त्यांच्यासाठी साहाब असतात, तर जाकीर नाईक त्यांच्यासाठी मानवतेचा मसीहा आहे.
कपील सिब्बल यांच्यावर हल्ला चढवतांना प्रसाद म्हणाले की, सिब्बल दहा वर्षे केंद्रीय मंत्री होते. भारतीय निवडणूक प्रणालीवर परदेशात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍यांना ते पुरावे मागत नाही, मात्र लष्कराच्या पराक्रमाचे त्यांना पुरावे हवे असतात.
आमच्या वायुसेनेने बालाकोट येथे केलेला हवाईहल्ला अतिशय प्रभावी होता, अतिरेक्यांच्या मोठ्या तळावर त्यांनी आपल्या लक्ष्यावर अचूक हल्ला केला, वायुसेनेच्या पराक्रमावर काँग्रेस नेत्यांचा नसला तरी आमचा पूर्ण विश्‍वास आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 6 Mar 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (96 of 2216 articles)

Sunil Lamba Navy Chif
प्रमुख सुनील लांबा यांचा इशारा, नवी दिल्ली, ५ मार्च - समुद्रमार्गे देशात घुसखोरी करून भारतात दहशतवादी हल्ला करण्याचे प्रशिक्षण अतिरेक्यांना ...

×