ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसचा निवडणूक घोटाळा, गरिबांची लूट

काँग्रेसचा निवडणूक घोटाळा, गरिबांची लूट

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात,
जुनागड, १० एप्रिल –

Pm Modi Rally

Pm Modi Rally

काँग्रेसने तुघलक रोडवरून निवडणूक घोटाळा केला असून, गरिबांच्या आणि गर्भवती महिलांसाठी असलेल्या योजनेतील पैशांची लूट केली, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी येथे झालेल्या सभेत केला. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नवी दिल्लीतील तुघलक मार्गावर अधिकृत निवासस्थान आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या चार राज्यांतील घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. दिल्लीतील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मुख्यालयात २० कोटी रुपये पाठवण्यात आल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. हा पैसा तुघलक मार्गावरील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या घरून पाठवण्यात आल्याचा दावाही आयकर विभागाने केला आहे.
घोटाळ्यांचे म्हणाल तर या व्यक्तीस कित्येक नावाने ओळखले जाते. मात्र, आता या व्यक्तीस पुराव्यांसह नवे नाव मिळाले आहे. तुघलक मार्ग निवडणूक घोटाळ्यात काँग्रेस गुंतली आहे. गरिबांच्या हक्काचा, गर्भवती महिलांच्या योजनेतील पैसा काँग्रेसने लुटला आहे, असा घणाघात त्यांनी केला. गंभीर घोटाळा केला असतानाही, प्रत्येकाला जामीन देऊ, असे वचन काँग्रेसने दिले आहे. ही तरतूद कुणासाठी, तर स्वपक्षाच्या नेत्यांसाठी ती करण्यात आली आहे. मी या नेत्यांना तुरुंगाच्या दरवाजाजवळ आणले आहे. तुम्ही मला आणखी पाच वर्षे संधी दिल्यास ते तुरुंगात पोहोचतील, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशही काँग्रेससाठी एटीएम केंद्र ठरत आहे, असा जोरदार चिमटा त्यांनी यावेळी काँग्रेसला घेतला.
राजस्थान आणि छत्तीसगडमधील परिस्थिती वेगळी नाही. नागरिकांना लुटण्यासाठीच काँग्रेसला सत्ता हवी आहे. वायुदलाने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले, मात्र त्याचा प्रभाव विरोधी पक्षावर झाला, असा हल्ला काँग्रेसवर चढवतानाच, देश सुरक्षित असेल, तरच त्याची भरभराट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील दहशतवाद हटवण्याची मोदीला इच्छा आहे. विरोधकांना मात्र मोदीलाच हटवायचे आहे. तुमचा पुत्र, तुमच्या चौकीदाराविरोधात कोणती शिवी काँग्रेसने दिली नाही, असा सवालही करतानाच, जम्म-काश्मीर भारतापासून वेगळा करून या भागासाठी वेगळा पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काश्मिरातील सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जवानांनी प्राण वेचले आहेत. ज्यासाठी जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, असे देशात एकही राज्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाची आठवण सांगताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नेहरू हातावर हात देऊन बसले असताना सरदार पटेल यांनीच चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश लष्कराला दिले होते. सरदार पटेल नसते, तर भारताने काश्मीर गमावले असते, असा दावाही त्यांनी केला.

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (46 of 2392 articles)

Kirodsingh Baisla Joins Bjp
दिल्ली, १० एप्रिल - राजस्थानमधील दिग्गज गुर्जर नेते कर्नल किरोडीसिंह बैंसला, तसेच त्यांचा मुलगा विजय बैंसला यांनी आज बुधवारी भाजपात ...

×