ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » काँग्रेसला दलाली न मिळाल्यानेच राफेल सौदा रद्द

काँग्रेसला दलाली न मिळाल्यानेच राफेल सौदा रद्द

►निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर आरोप
►९ टक्के कमी दराने आमची खरेदी,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ४ जानेवारी –

Nirmala Sitharaman 5

Nirmala Sitharaman 5

संपुआ सरकारच्या काळात दहा वर्षे राफेल विमानांच्या खरेदीवर फक्त चर्चाच सुरू होती. संरक्षणविषयक करार करण्यासाठी इतकी वर्षे लागत नाही. अखेर काँगे्रसने हा सौदाच केला नाही. याचे कारण म्हणजे, या व्यवहारात काँगे्रसला दलाली मिळाली नव्हती, असा घणाघाती हल्ला चढवताना, देशाचे हित आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेलअन राफेल मुद्यावर आम्ही सर्वोत्कृष्ट असा करार केला आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला क्लीन चिट दिली, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
संपुआ सरकारपेक्षा ९ टक्के कमी दरात आमच्या सरकारने राफेलचा सौदा केला. यावर्षीपासून राफेल विमाने भारतात यायला सुरुवात होईल आणि २०२२ पर्यंत ३६ विमाने भारतात आलेली असतील, असे सीतारामन् यांनी स्पष्ट केले.
राफेल मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नियम १९३ अंतर्गत लोकसभेत सुरू केलेल्या तीन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना सीतारामन् यांनी, राहुल गांधी आणि काँगे्रसच्या खोटारड्या प्रचाराचा पुरता पंचनामा केला. सुमारे दोन तासांच्या ओघवत्या भाषणात सीतारामन् यांनी गांधी घराण्यावर घणाघाती हल्ला चढवताना राफेलवर काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रत्येक आरोपाचे मुद्देसूद निराकरण केले आणि काँग्रेसचे दात त्यांच्याच घशात घातले. काँग्रेसच्या सदस्यांनी सीतारामन् यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण जराही विचलित न होता सीतारामन् यांनी अतिशय आक्रमक रुप धारण करीत, राफेलवरून काँग्रेसच्या अपप्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.
राफेल मुद्यावर देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राफेलचा सौदा होऊच नये, असा काँग्रेसचा प्रयत्न होता, त्यामुळेच या पक्षाने अनेक मार्गांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, देश सुरक्षा लक्षात घेता आम्ही हा करार अतिशय पारदर्शी पद्धतीने केला. हा करार करताना दलालांना बाजूला ठेवले, त्यामुळेच काँग्रेसच्या पोटात दुखू लागले. कारण आतापर्यंतचे काँग्रेसच्या राजवटीतील संरक्षण साहित्य खरेदीचे सर्व करार दलाली घेऊनच करण्यात आले होते. हा एकमेव करार कोणतीही दलाली वा भ्रष्टाचार न होता झाला आहे, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही राफेलवर आम्हाला क्लीन चिट दिली आहे, असा सडेतोड हल्ला सीतारामन् यांनी केला.
संरक्षण साहित्य खरेदीचे करार हे राष्ट्रीय सुरक्षेशी जुडलेले असतात, मग सत्तेत कोणीही असो, याची जाणिव सर्वानीच ठेवायला पाहिजे, असे स्पष्ट करत सीतारामन म्हणाल्या की, आपल्या शेजारची परिस्थिती कशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. चीन आणि पाकिस्तान आपले वायुदल मजबूत करीत आहे, चीनजवळ तर चौथ्या आणि पाचव्या पिढीची विमाने आहे, त्या तुलनेत आपण मागे होतो. त्यामुळेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राफेल विमान खरेदी करण्याचा करार आमच्या सरकारने प्राधान्यक्रमाने केला. यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत राफेल विमाने देशात यायला सुरुवात झालेली असेल आणि २०२२ पर्यंत राफेलची सर्व म्हणजे विमाने देशात आलेली असतील. संपुआ सरकार १८ विमाने घेणार होती, आम्ही ३६ विमाने घेण्याचा करार केला आहे. उर्वरित विमाने भारतातच तयार होणार आहेत.
एचएएलच्या कर्मचार्‍यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी राफेलचा करार हा एचएएलचाच अधिकार होता, तो त्याला मिळायलाच हवा होता, असे विधान केले होते, त्याचप्रमाणे स्थायी समितीचे सदस्य असलेल्या मल्लिकार्जुन खडगे यांनी तीन दशकानंतरही एचएएलला विमाने बनवण्याची संधी न मिळाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते, याचा संदर्भ देत सीतारामन् म्हणाल्या की, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) मुद्यावरून काँग्रेस नकाश्रू ढाळत आहे. एचएएलबद्दल एवढेच प्रेम काँग्रेसला होते, तर त्यांनी हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार अगस्ता वेस्टलॅण्डशी का केला, एचएएलशी का केला नाही? कारण अगस्ता वेस्टलॅण्डकडून काँग्रेसला जे मिळाले आहे, ते एचएएलकडून काँग्रेसला मिळाले नसते. एचएएलकडून काँग्रेसला फक्त हेलिकॉप्टर्सच मिळाली असती. आम्ही मात्र एचएएलला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी विमान निर्मितीचे अनेक करार मिळवून दिले.
देशाच्या सुरक्षेच्या कोणत्याही मुद्यावर काँग्रेस दुसर्‍या देशासोबत कधीच चर्चा करणार नाही, यासंदर्भातील चर्चा सरकारने फ्रान्ससोबत करावी, आमच्यासोबत नाही, असे काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते, याची आठवण करून देत सीतारामन् म्हणाल्या, यानंतर लगेच राहुल गांधी यांनी फ्रान्सच्या अध्यक्षासोबत आपण गोपनीयतेच्या मुद्यावर चर्चा केल्याचे याच सभागृहात सांगितले. राफेल विमानाची किंमत जाहीर करण्यास गोपनीयतेचा कोणताच अडथळा नसल्याचे राहुल म्हणाले. त्यामुळे कोण खरे बोलत आहे, हाच मुद्दा आहे. या दोन काँग्रेस नेत्यांपैकी एकजण देशाची दिशाभूल करीत आहे, हे नक्की. हेच मला सांगायचे आहे.
ज्या ऑफसेट करारावरून गदारोळ माजवला जात आहे, तो संपुआच्या काळातच झाला होता आणि या ऑफसेट करारात खाजगी वा सरकारी कंपनी असा कोणताही उल्लेख नाही, मात्र आम्ही ऑफसेट करार करताना भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला फ्रान्सच्या कंपनीला भाग पाडले, असे सीतारामन म्हणाल्या.
किमतीबाबत काँग्रेसचा घोळ
राफेल विमानाच्या किमतीबाबत वारंवार झालेल्या विचारणेबाबतचा संदर्भ देत सीतारामन् म्हणाल्या की, राफेल विमानाची बेसिक किंमत आम्ही संसदेत ६७० कोटी रुपये सांगितली होती, हे विमान आपल्याला ५२० कोटी रुपयांत मिळणार होते, असे काँग्रेसने म्हटले आहे, पण याबाबतचा कोणताही अधिकृत कागद काँग्रेसने आतापर्यंत दिला नाही. उलट राफेल विमानाच्या किमतीबाबत राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती सांगितल्या आहे. काँग्रेस सांगत असलेल्या किमती या फक्त विमानाच्या होत्या, आम्ही खरेदी करत असलेले विमान विविध अत्याधुनिक शस्त्रसामग्रीने आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि कोणत्याही आव्हानचा सामना करण्यास परिपूर्ण आहे.
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत सीतारामन् म्हणाल्या की, सर्व घटनाक्रमाचा अभ्यास केल्यानंतर राफेल विमान खरेदी प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्राच्या ३४ व्या परिच्छेदात दिला आहे. कोणाच्या व्यक्तिगत धारणा हा चौकशीचा विषय होऊ शकत नाही. या व्यवहारात सरकारने कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे वा सरकारची कोणतीही संशयास्पद भूमिका असल्याचे आम्हाला आढळले नाही, असे न्यायालयाने ३३ व्या परिच्छदात नमूद केले आहे.
विमानाच्या किमती गोपनीय असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार करीत सीतारामन् म्हणाल्या की, विमानाच्या किमतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली नाही, वा आग्रह धरला नाही, कारण हा संवेदनशील मुद्दा असल्याचे सांगत यामुळे दोन देशात झालेल्या कराराचे उल्लंघन होईल, त्यामुळे विमानाच्या किमती जाहीर करण्यात काहीच औचित्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.
आरव्ही आणि क्यू
सीतारामन् बोलत असताना एए (अनिल अंबानी) सोबत करार झाला का, अशी विचारणा काँग्रेसचे सदस्य करत होते, यावर पलटवार करीत त्या म्हणाल्या की, तुम्ही ‘एए’बाबत विचारणा करीत असाल तर, प्रत्येक ‘एए’च्या उत्तरात ‘आरव्ही’ (रॉबर्ट वढेरा) आणि ‘क्यु’ (क्वात्रोची) आल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव तुम्ही ठेवा. आरव्ही देशाचा जावई असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Posted by : | on : 5 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (59 of 1851 articles)

Supreme Court 2
जानेवारीला गठन; ३० सेकंदात निर्णय, नवी दिल्ली, ४ जानेवारी - अयोध्या प्रकरणी आम्ही १० जानेवारीला नवे न्यायासन गठित करणार आहोत. ...

×