ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » कोलकाता घटनेचे संसदेत संतप्त पडसाद

कोलकाता घटनेचे संसदेत संतप्त पडसाद

•कामकाज दिवसभरासाठी स्थगित,
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी –

Sansad Bhavan1

Sansad Bhavan1

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्यावरून सीबीआय आणि बंगाल पोलिसांमधील संघर्षाचे संतप्त पडसाद आज सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
या मुद्यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज दोन्ही सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी या मुद्यावर तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे दोन्ही सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तसेच शून्य तासाचे कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेत या मुद्यावरून आलेला स्थगनप्रस्ताव सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळला. मात्र तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांना बोलण्याची परवानगी दिली. केंद्र सरकार आपल्या राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी सीबीआयचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप सौगत राय यांनी केला. बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब यांनीही सीबीआयच्या कारवाईला विरोध दर्शवला. लोकशाहीच्या दृष्टीने झाला प्रकार योग्य नसल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केला.
या गोंधळातच माकपचे मोहम्मद बदरुद्दीन खान बोलायला उभे झाले. सीबीआयचा दुरुपयोग होत असला तरी ममता बॅनर्जींचे वागणेही योग्य नाही, असे स्पष्ट करत खान यांनी, एका भ्रष्ट अधिकार्‍याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री पुढे का येत आहेत, तसेच त्यांच्यासोबतच्या धरणे आंदोलनात एक पोलिस अधिकारी कसा सहभागी होऊ शकतो, अशी विचारणा केली. भ्रष्टाचारातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खान यांनी केली. खान यांच्या या बोलण्यामुळे तृणमूल काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले, तृणमूल काँग्रेसच्या अपरूपा पोद्दार यांनी खान यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा माईक पकडला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या गोंधळातच सभापती महाजन यांनी सौमित्र खान यांना बोलायला सांगितले. सौमित्र खान यांनीही ममता बॅनर्जी यांच्या वागणुकीवर हल्ला चढवताच तृणमूल काँग्रेसचे सदस्य पुन्हा संतप्त झाले. तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष दस्तीदार यांनी सौमित्र खान यांच्या दिशेने धाव घेतली. घोष यांनी खान यांच्यावर हात उगारल्याचे दिसत होते. माकप आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य समोरासमोर आल्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. सौमित्र खान यांनी आपली जागा सोडून भाजपा सदस्यांच्या बाजूला येत आपले बोलणे पूर्ण केले.
सभागृहातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे पाहताच सभापती महाजन यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केले. राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत घोषणा सुरू केल्या. त्यामुळे अध्यक्ष नायडू यांनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले.

Posted by : | on : 5 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (68 of 2024 articles)

Nitish Kumar1
कुमार यांचा टोला, पटना, ४ फेब्रुवारी - कोलकात्यामधील ममता बॅनर्जीचे धरणे म्हणजे निवडणूक काळात काहीही होऊ शकते, असे मत बिहारचे ...

×