ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » कोलकात्यातील घटनेमुळे संघराज्य प्रणालीला गंभीर धोका

कोलकात्यातील घटनेमुळे संघराज्य प्रणालीला गंभीर धोका

•राजनाथसिंह यांचा लोकसभेत आरोप,
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

बंगालमध्ये जे काही घडले, त्यामुळे संघराज्य प्रणालीला धोका उत्पन्न झाला असून, त्याचे देशावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी लोकसभेत केला.
शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्यावरून सीबीआय आणि बंगाल पोलिसांमधील संघर्षाचे संतप्त पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. तत्पूर्वी, लोकसभेत या मुद्यावर निवेदन करतांना राजनाथसिंह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्याचे लागेबांधे अनेक राज्यात पसरले असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. मात्र या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीला मज्जाव करण्यात येत आहे. सीबीआयला आपली कायदेशीर कारवाई करण्यापासून बंगालमध्ये रोखण्यात आले, देशात प्रथमच असा प्रकार घडला असून, हे अभूतपूर्व असे आहे.
आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली बंगालमध्ये लाखो लोकांच्या कष्टाच्या पैशाची लूट करण्यात आली. या लोकांना जेव्हा आपला पैसा परत मिळाला नाही, तेव्हा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानेच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या दखरेखीखालीच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या सहभागाची शक्यता न्यायालयानेच वर्तवली होती.
कोलकाताचे पोलिस आयुक्त चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे सीबीआयला नाईलाजाने त्यांच्या निवासस्थानी जावे लागले, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी जाण्यापासून बंगाल पोलिसांनी सीबीआयच्या अधिकार्‍यांना रोखले आणि त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेण्यात आले. बंगाल पोलिस आणि सीबीआय यांच्यात संघर्षाची स्थिती उद्भवली होती. तेथील परिस्थिती इतकी गंभीर झाली की, सीबीआय मुख्यालयावर सीआरपीएफ तैनात करावी लागली.
केंद्र सरकार नेहमीच संघराज्यप्रणालीचा आदर करत आले आहे, मात्र कोलकाता येथे रविवारी रात्री जे घडले, त्यामुळे तेथे घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे ढासळल्यासारखी स्थिती उद्भवली होती, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, यासंदर्भात राज्यपालांशी माझी चर्चा झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालकासोबत तातडीची बैठकही घेतली. राज्यातील या घटनाक्रमाबाबत अहवाल पाठवण्याची सूचना राज्यपालांना करण्यात आली आहे. चौकशी यंत्रणांना आपले कायदेशीर कर्तव्य निष्पक्षपणे बजावू द्यावे, असे आवाहनही राजनाथसिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले. तृणमूल काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळात राजनाथसिंह यांना हे निवेदन करावे लागले.

Posted by : | on : 5 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (64 of 2024 articles)

Supreme Court 2
न्यायालयाचे आश्‍वासन •ममता विरुद्ध सीबीआय वादावर आज सुनावणी, नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी - कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांनी शारदा ...

×