ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी

ख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी

►ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स घोटाळा,
नवी दिल्ली, ५ डिसेंबर –

Christian Michel Agustawestland

Christian Michel Agustawestland

३६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात २२५ कोटी रुपयांची दलाली स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेलला विशेष न्यायालयाने आज बुधवारी पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात आरोपी प्रत्यार्पण करार असल्याने, अरब प्रशासनाने मंगळवारी मिशेलला भारताच्या स्वाधीन केले होते. त्याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक दुबईला गेले होते. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्याला दिल्लीत आणण्यात आल्यानंतर अटकेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. आज सकाळी त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली. मिशेलला १० डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात यावे, असा आदेश न्या. अरविंद कुमार यांनी दिला.
तत्पूर्वी, न्यायालयाने मिशेलला त्याच्या वकिलासोबत पाच मिनिटे चर्चा करण्याची परवानगी दिली. यानंतर वकिलाने मिशेलसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, तर सीबीआयने १४ दिवसांची कोठडी मागितली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी मंजूर केली. याच दरम्यान, मिशेलच्या वकिलाने जामीन अर्जही सादर केला, पण त्यावर सध्याच सुनावणी होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावेळी पटियाला हाऊस न्यायालयीन संकुल परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
हरपलेली कडी गवसणार
दरम्यान, मिशेलच्या अटकेमुळे हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात झालेल्या घोटाळ्यातील हरपलेली आणि अद्यापही न सापडलेली मुख्य कडी गवसणार असल्याचा विश्‍वास सीबीआयने व्यक्त केला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या हवाई सफरीसाठी सध्या उपलब्ध असलेल्या एमआय-८ हेलिकॉप्टर्सची जागा ऑगस्टा वेस्टलॅण्डच्या हेलिकॉप्टर्सने भरून काढण्यात येणार होती. एमआय हेलिकॉप्टर्स रात्रीच्या वेळी तसेच खराब वातावरणात उड्डाणाची अक्षम आहेत, तसेच वारंवार उद्भवणारे तांत्रिक बिघाड यामुळे त्यांच्या जागी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आवश्यक झाले होते. या व्यवहारात दलालीचा पैसा कुठून आला व तो भारतात कुणा-कुणाला प्राप्त झाला, हे मिशेलच्या चौकशीतून माहीत होऊ शकणार आहे, असे सूत्रांचे मत आहे.
मिशेलचा वकील युवक काँगे्रसचा नेता!
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात दलाली घेणारा ख्रिश्‍चियन मिशेलचा बचाव करीत असलेला वकील हा युवक काँगे्रसच्या कायदेविषयक सेलचा राष्ट्रीय प्रभारी असून, अल्जो के. जोसेफ असे त्यांचे नाव आहे. भाजपा नेते सुरेश मखुआ यांनी आपल्या सोशल साईटवरील ब्लॉगमध्ये ही धक्कादायक माहिती दिली. हा घोटाळा काँगे्रसप्रणीत संपुआच्या काळातच घडला असल्याने, ही घडामोड काँगे्रसपुढील अडचणींमध्ये वाढ करणारी ठरू शकते. दरम्यान, या आरोपावर प्रतिक्रिया देताना जोसेफ म्हणाले की, मी पेशाने वकील असल्याने मिशेलचा खटला लढत आहे. माझा पेशा आणि काँगे्रस पक्ष यात बराच फरक आहे. काँगे्रससोबत माझे संबंध आणि माझ्या वकिली पेशाची सरमिसळ करू नका.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (249 of 1865 articles)

Pm Narendra Modi 2
कसे निसटता, तेच पाहतो ►मोदी यांचा गांधी घराण्यावर हल्लाबोल, पाली, ५ डिसेंबर - २०११-१२ मधील आयकर विवरणाचा फेरआढावा घेण्यास सर्वोच्च ...

×