ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » …तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा

…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा

►राजनाथसिंह यांचे पाकिस्तानला खडे बोल,
जयपूर, २ डिसेंबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

दहशतवादाविरोधात पाकिस्तानला एकट्याने लढणे शक्य होत नसल्यास त्याने भारताला मदत मागावी, असे खडे बोल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी पाकिस्तानला सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या चार वर्षांच्या काळात भारतामध्ये एकही मोठी दहशतवादी हल्ल्याची घटना घडलेली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तालिबान आणि दहशतवादाच्या विरोधात लढा देण्यासाठी अफगाणिस्तान अमेरिकेची मदत घेत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानही या विरोधात लढण्यासाठी भारताकडे मदतीची याचना करू शकतो, असे त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
जम्मू-काश्मीर हा मुद्दाच नसून तो भाग भारताचा अविभाज्य भाग आहे. मुद्दा दहशतवादाचा आहे आणि त्यावर पाकिस्तानने चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडत, काँग्रेसच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे. हा पक्ष अविश्‍वासाच्या माध्यमातून राजकीय संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
दहशतवाद थांबल्याचा दावा मी करीत नाही. मात्र, मागील साडेचार वर्षांच्या काळात देशात मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.
आता केवळ काश्मीर खोर्‍यातच दहशतवाद मर्यादित झाला असून, तिथेही परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका यशस्वी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारने जम्मू-काश्मीरला राजकीय प्रक्रियेत आणले आहे आणि दहशतवादाबाबत म्हणाल, तर तो पाकपुरस्कृत आहे, असेही ते म्हणाले. देश आणि देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. दहशतवाद रोखण्यात आला आहे आणि येत्या काही वर्षात नक्षलवादाचाही बिमोड केला जाईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील चार वर्षांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया ५० ते ६० टक्क्यांनी घटल्या आहेत. ९० जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांचे अस्तित्व आता केवळ आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये आहे. ही समस्या येत्या तीन ते पाच वर्षांत संपुष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.
दहशतवादी संघटनांकडून ‘हनी ट्रॅप’चा वापर
श्रीनगर : काश्मीर खोर्‍यातील युवकांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हनी ट्रॅपचा वापर करीत आहेत. तसेच शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी आणि दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासही महिलांचा वापर दहशतवादी संघटनांकडून केला जात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून १५ दिवसांपूर्वी बांदिपुरा येथून सईद शाजिया नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर तिचे कित्येक अकाउंट्स असून, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती येथील तरुणांना जाळ्यात ओढत होती. दहशतवादी संघटनांसाठी आणखी काही महिला खोर्‍यामध्ये सक्रिय असून, त्या तरुणांना जाळ्यात खेचत आहेत, अशी कबुली तिने चौकशीदरम्यान दिल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. तिला १७ नोव्हेंबरला अटक केल्यावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगरच्या बाह्य भागातील लावायपुरा भागातून आसिया जान नावाच्या तरुणीस अटक करून तिच्याकडून २० हॅण्ड ग्रेनेड जप्त केले आहेत. या व्यतिरिक्त तिच्याकडून शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख अबु इस्माईल आणि छोटा कासिमचा खातमा केल्यानंतर पोलिसांनी आसियावर नजर ठेवली होती. या वेळी त्यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या कागदपत्रांतून काश्मीर खोर्‍यात दहशतवादी संघटना महिलांचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले होते.

Posted by : | on : 3 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (427 of 2027 articles)

Dr Satyapal Singh
विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची माहिती, नवी दिल्ली, २ डिसेंबर - पुस्तके, गणवेश आणि विकलांग विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होणारा खर्च केंद्र ...

×