ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर

तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर

►काँग्रेस, अण्णाद्रमुकसह अनेक पक्षांचा बहिष्कार
►पत्नीने तडजोड केल्यास खटला मागे,
नवी दिल्ली, २७ डिसेंबर –

Triple Talaq Bill Clears Loksabha

Triple Talaq Bill Clears Loksabha

मुस्लिम समाजातील तीन तलाकची अनिष्ट प्रथा संपुष्टात आणणारे तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर करण्यात आले. २४५ विरुद्ध ११ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यावेळी विधेयकावरील सुधारणांवर घेण्यात आलेल्या मतदानावर बहिष्कार टाकत काँग्रेस, अण्णाद्रमुकसह काही पक्षांनी सभात्याग केला. विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर केले. यावेळी विधेयकातील सुधारणांवर मतदान घेण्यात आले असता, संसदेत उपस्थित असलेल्या २५६ खासदारांपैकी २४५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने, तर ११ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. मतदान सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अण्णाद्रमुकसह अनेक पक्षांनी सभात्याग केला.
या विधेयकासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नावर रविशंकर प्रसाद प्रचंड चिडले. हे विधेयक मंजूर होत नसेल, तर आम्ही मुस्लिम महिलांना तीन तलाकच्या नावाने त्रास सहन करू द्यायचा का, असा सवाल त्यांनी केला. या विधेयकानंतर तीन तलाकची प्रकरणे कमी झाली असली, तरी अजूनही ही कुप्रथा सुरूच आहे, असे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.
दरम्यान, लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले असले, तरी राज्यसभेत पारित करणे भाजपासाठी आव्हान ठरणार आहे. कारण राज्यसभेत भाजपाचे बहुमत नाही.
२७ डिसेंबर रोजी तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्याचा निर्णय मागच्या अधिवेशनातच निर्णय घेण्यात आला होता. त्याला विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली होती. त्यावेळी काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर पुढच्या आठवड्यात चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावर पुढच्या आठवड्यात कोणत्याही आडकाठीविना या विधेयकावर साधकबाधक चर्चा करण्याचे आश्‍वासन विरोधक देतील काय, असा सवाल संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांना केला होता. त्यावर २७ डिसेंबर रोजी हे विधेयक चर्चेला आणल्यास आम्ही त्या चर्चेत भाग घेऊ, असे आश्‍वासन खरगे यांनी दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले.
राजकारणासाठी नव्हे, न्यायासाठीच : रविशंकर प्रसाद
तिहेरी तलाक देणार्‍या आरोपीला कारावासाची शिक्षा देऊन राजकारण नव्हे, तर मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना न्याय देण्यासाठी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले, असे विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावर चर्चा करताना सांगितले. याचा अभ्यास करण्यासाठी हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवा, अशी मागणी यावेळी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात केली. मात्र, यापूर्वी विधेयकात सुधारणा केली, त्यावेळीच सदस्यांनी व्यक्त केलेल्या काळजीची दखल घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पत्नीने तडजोड केल्यास पतीविरोधातील खटला मागे घेण्याची तरतूदही विधेयकात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्ही या विधेयकाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका. हे विधेयक न्याय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आणले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही : नक्वी
तिहेरी तलाक विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, असे अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यातील दंडाच्या तरतुदीचे समर्थन करताना सभागृहात सांगितले. खुनासारख्या कृत्यांच्या विरोधात कायदा असताना आणि त्यात कठोर शिक्षेचे प्रावधान असताना असे गुन्हे घडतातच, असेही त्यांनी सांगितले. हा केवळ एखाद्या पीडितेचा प्रश्‍न नाही. तो मुस्लिम महिलांना सुरक्षा आणि संरक्षण देण्याचा आहे, असेही त्यांनी सांगितले. तिहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील कुप्रथा आहे आणि ती बंद करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केेले. कित्येक मुस्लिम राष्ट्रांमध्ये तिहेरी तलाक अवैध ठरवण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये १९ ५६ मध्ये, तर सिरियामध्ये १९५३ मध्ये यावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
मुस्लिम पुरुषांना दंडित करण्यासाठीच : सुष्मिता देव
तिहेरी तलाकच्या विधेयकामागे सरकारचा हेतूने मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणाचा नव्हे, तर मुस्लिम पुरुषांना दंडित करण्याचा आहे, असा आरोप काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी आज लोकसभेत चर्चेदरम्यान केला.
तुम्ही मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण नव्हे, तर त्यांच्यामागे गुन्हेगारी खटले लावत आहात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुस्लिम संघटनांच्या संमिश्र प्रतिक्रिया
लोकसभेमध्ये पारित झालेल्या तिहेरी तलाक विधेयकावरून मुस्लिम संघटनांमध्ये फूट पडली आहे. त्यांनी याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही संघटनांनी याचे स्वागत केले, तर काही संघटनांनी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनने या विधेयकाचे स्वागत केले. हिंदू विवाह कायद्याप्रमाणेच मुस्लिम निकाह कायदा तयार करण्यात येऊन सामाजिक कुप्रथा बंद करण्यात याव्यात, अशी मागणी या संघटनेच्या सदस्य झाकिया सोमण यांनी केली. अशा विधेयकाची गरजच नव्हती. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हे विधेयक पारित करण्यात आल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोडाच्या कार्यकारिणीचे सदस्य एस. क्यू. इलियाज यांनी व्यक्त केली.
मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्याचा घाट
तिहेरी तलाक विधेयक फक्त मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्यासाठी असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी केला. मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकण्यासाठी, मुस्लिम महिलांना कमजोर करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोपही त्यांनी केला. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. एक पुरुष कितीही महिलांशी संबंध ठेवू शकतो. त्यात कोणताही गुन्हा नाही. पण तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मी या विधेयकाला विरोध करतो, असे ते म्हणाले. व्यभिचाराबद्दलचा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यभिचार गुन्हा नाही. मात्र, तिहेरी तलाकला गुन्ह्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 28 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (493 of 2234 articles)

Arun Jaitley 1
जेटलींचा विरोधकांवर पलटवार, नवी दिल्ली, २७ डिसेंबर - व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मुद्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. ...

×