ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » तिहेरी तलाकसाठी अण्णाद्रमुकची मनधरणी

तिहेरी तलाकसाठी अण्णाद्रमुकची मनधरणी

►द्रमुकचा काँग्रेसला इशारा,
नवी दिल्ली, २८ डिसेंबर –

Triple Talaq Talaq

Triple Talaq Talaq

राज्यसभेत तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर व्हावे यासाठी भाजपा अण्णाद्रमुकच्या संपर्कात आहेत तर, दुसरीकडे या विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, अशी गळ काँग्रेस नेते अण्णाद्रमुक पक्षाला करत आहेत. परंतु, या कृत्याला द्रमुकच्या खासदार कनिमोळी हरकत घेतली असून याचे द्रमुक-काँग्रेस युतीवर विपरीत परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.
अण्णाद्रमुकला आपल्या बाजूने वळविण्याची जबाबदारी काँग्रेसने खासदार कपिल सिब्बल यांना सोपविली आहे. त्यांनी आज शुक्रवारी अण्णाद्रमुकचे खासदार डॉ. व्ही. मैत्रेयन यांची संसदेत भेट घेतली. पुढील बोलणी करण्यासाठी सिब्बल चेन्नईला जाऊन मुख्यमंत्री पलानीस्वामींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यसभेत भाजपाला बहुमत नाही. अशा स्थितीत अण्णाद्रमुकने या विधेयकाला विरोध दर्शवून सभात्याग केल्यास हे विधेयक राज्यसभेत पारित करणे भाजपाला सोपे जाणार आहे. त्यादृष्टीने भाजपा अण्णाद्रमुकच्या संपर्कात असल्याचे समजते. दरम्यान, द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी तामिळनाडूच्या राजकारणात नाक खुपसू नका, अशी जाहीर तंबी कपिल सिब्बल यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली आहे. या मुद्यावर ते अण्णाद्रमुकच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला गेले, तर त्याचा परिणाम द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीवर होईल, असा इशारा त्यांनी कपिल सिब्बल यांना दिला. अण्णाद्रमुकच्या मदतीने तिहेरी तलाकचे विधेयक कायद्यात रूपांतरित होईल, अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत काँग्रेसने अण्णाद्रमुकला साथ मागितली, तर मित्रपक्ष असलेल्या द्रमुकची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. अर्थात तिहेरी तलाकवर अण्णाद्रमुकची साथ, काँग्रेससाठी द्रमुककडून तलाकच ठरणार आहे.
तिहेरी तलाक राज्यसभेत पारित होईल : प्रसाद
लोकसभेत स्पष्ट बहुमताने पारित झालेले तिहेरी तलाक विधेयक आता राज्यसभेतही नक्कीच पारित होईल, असा विश्‍वास केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला.
राज्यसभेतील सदस्यांच्या विवेकबुद्धिविषयी मला अजिबात शंका नाही. या मुद्यावर ते पुरेसे संवेदनशील आहेत. या वरिष्ठ सभागृहातील बहुतांश सदस्य विधेयकाच्या बाजूनेच मतदान करणार आहेत, असा मला विश्‍वास असल्याचे प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Posted by : | on : 29 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (489 of 2234 articles)

Isro Logo
भारतीय सात दिवस अंतराळात, नवी दिल्ली, २८ डिसेंबर - इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, या मिशनसाठी ...

×