ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » फिचर, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू!

‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू!

►आज जागतिक ‘अल्झायमर दिवस’,
नागपूर, २० सप्टेंबर –

Alzheimers

Alzheimers

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. अल्झायमर म्हणजे लक्षात न राहणे. अल्झायमर हा आजार वेदनादायी नसला, तरी त्रासदायक आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला ओळखत असते. मात्र, तुम्हाला पाहिल्याचे त्याला स्मरणसुद्धा नसते. यामध्ये माणूस हळूहळू गोष्टी विसरत जातो. त्यानंतर दैनंदिन कामे करताना त्याला अडथळा निर्माण होतो. या आजाराला ओळखून वेळीच उपचार केले तर तो नियंत्रणात आणता येतो. मात्र, त्याबद्दल लोकांमध्ये जागृती केली नाही, तर अनेक गैरसमज समाजात पसरतात आणि यातूनच हा आजार गंभीर रूप धारण करतो. अल्झायमरचा रुग्ण भाषा, रस्ते, पत्ता विसरतो, निर्णय घेण्यात चुकतोे, अनेक साधे कामे करणे त्याला अशक्य होते.
अ‍ॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ मध्ये या आजाराचा शोध लावला. त्यामुळे याला ‘अल्झायमर डिसीज’ नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यू झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे, तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढणे. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण विसरणे अशा प्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा-मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की, डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो, कारण अल्झायमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्षे उलटल्यानंतर प्रारंभिक लक्षणे दिसू लागतात, असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. वयाच्या ६५ वर्षांनंतर २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा, निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.
अल्झायमरची कारणे
आज या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन ११० वर्षे झाली आहेत. पण याचे नेमके कारण नक्की काय, हे कोणालाच समजू शकले नाही. अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांनी प्रयत्न करूनही या आजारावर नेमका उपचार अद्याप सापडलेला नाही. या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो.
अल्झायमर होऊ नये यासाठी…
अल्झायमर होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करावा, सकस हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. वास्तविक हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात.
ही आहेत लक्षणे
शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे दिसतात.
मेंदूच्या पेशी क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या संमिश्रणातून झालेली असते. त्यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे घृत नस्य म्हणजे गायीचं तूप ४-६ थेंब नियमितपणे घालण्यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, केशर अशा अनेक गुणी वनस्पती उपयोगी पडू शकतील पण त्या नाकाच्या मार्गाने दिल्या तर त्यांचा परिणाम नेमक्या ठिकाणी, लवकर आणि अचूक होऊ शकेल.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : फिचर, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in फिचर, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (803 of 2059 articles)


रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - तिहेरी तलाक गुन्हा ठरवणार्‍या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ ...

×