ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन
•पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,
गुरुग्राम, १९ मार्च –

Ajit Doval0

Ajit Doval0

पुलवामा येथे पाकिस्तानधार्जिण्या जैश-ए-मोहम्मदने केलेला आत्मघाती हल्ला आम्ही कधीच विसरणार आणि विसरूही देणार नाही, असे स्पष्ट करताना, दहशतवादाचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी भारताचे नेतृत्व अगदी सक्षम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मंगळवारी येथे केले.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ८० व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित डोवाल बोलत होते. उरी आणि पुलवामासारख्या भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, अतिरेक्यांना व त्यांना आश्रय देणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व पूर्णपणे समर्थ आहे, अशी ग्वाही मी आज तुम्हाला देत आहो, असे डोवाल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० जवानांना श्रद्धांजली वाहिली.
आम्हाला काय करायचे आहे, कोणत्या मार्गाने करायचे यासोबतच, अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची वेळ ठरविण्यासाठीही देशाचे नेतृत्व पुरेसे कणखर आहे. अशाप्रसंगी आपल्या सशस्त्र दलांना कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही, ते आपली कारवाई करण्यासाठी पूर्ण मोकळे आहेत, असेही ते म्हणाले.
अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. दुसर्‍या जागतिक युद्धानंतर ३७ देश उद्ध्वस्त झाले आणि आपले सार्वभौमत्व गमावून बसले होते. यातील २८ देश त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे उद्ध्वस्त झाले होते. अंतर्गत सुरक्षा कमजोर असेल तर तो देशही दुबळा असतो, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या फाळणीच्या काळात सीआरपीएफने दिलेल्या योगदानाचे डोवाल यांनी यावेळी कौतुक केले. लोक कदाचित विसरले असतील की, भारताच्या विभाजनानंतर अतिशय कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, त्यावर एक पुस्तक लिहिले जाऊ शकेल, असे सांगताना डोवाल म्हणाले की, सीआरपीएफच्या गणवेषाशी आणि भारताच्या सुरक्षेशी मी ५१ वर्षांपासून संलग्न आहे. यापैकी ३७ वर्षे मी पोलिस खात्याचा भाग होतो.
मला लष्कर आणि पोलिसांसोबत काम करण्याची संधी मिळाली; मात्र आपल्या सीआरपीएफचे काही वैशिष्ट्य आहे. हेच एक असे दल आहे, ज्यात इतकी विविधता आहे. व्हीआयपी सुरक्षा, दहशतवाद, कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली, तिथे सीआरपीएफने मोलाचे योगदान दिले.

Posted by : | on : 20 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (195 of 2407 articles)

Ed Dierctorate Of Enforcement1
फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च - काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून निधी स्वीकारल्याप्रकरणी धडक कारवाई करताना, अंमलबजावणी ...

×