ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले सुरूच राहणार

दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले सुरूच राहणार

•तिन्ही सेनादलांचा वज्रनिर्धार
•कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज,
नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी –

Indian Army Chif Surendra Singh Mahal R G K Kapoor Dalbirsingh Gujral

Indian Army Chif Surendra Singh Mahal R G K Kapoor Dalbirsingh Gujral

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा निर्वाळा भारतातील तिन्ही सेनादलांनी आज गुरुवारी एका संयुक्त पत्रपरिषदेत दिला. दहशतवाद्यांना आश्रय देणे पाकिस्तानने थांबवले नाही, तर आम्हाला यापुढेही अशीच कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
भारत पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पृष्ठभूमीवर आज दिल्लीत दिवसभर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकांच्या सत्रानंतर सायंकाळी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करताना, बालाकोट येथील आपल्या कारवाईची माहिती देत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणला. लष्करातर्फे मेजर जनरल सुरेंद्रसिंह बहल, वायुसेनेतर्फे एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर तसेच नौदलातर्फे रियल अ‍ॅडमिरल दलबीरसिंह गुजराल यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले. पाकिस्तान सीमेवरील युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन करत असून, भारतीय सेना त्याला जशास तसे उत्तर देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे, जोपर्यत पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहील, तोपर्यंत आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे प्रशिक्षणतळ उद्ध्वस्त करू, असे मेजर जनरल सुरेंद्रसिंह बहल यांनी सांगितले. २६ फेब्रुवारीला सकाळी आणि रात्री पाकिस्तानने युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन करण्याचा तसेच आमच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले चढवण्याचा प्रयत्न केल्याचे बहल यांनी स्पष्ट केले.
भारतावर हल्ला करण्यासाठी एफ-१६ विमानांचा वापर केला नसल्याचा दावा पाकिस्तान करत असला, तरी त्याने एफ-१६ विमानांचा वापर केल्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. राजौरी भागात ऐराम क्षेपणास्त्रांचे तुकडे आम्हाला मिळाले असून, ते क्षेपणास्त्र एफ-१६ विमानातच वापरले जाते. यासाठी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरही आम्ही पडताळून पाहिले, असे आर.जी. के. कपूर यांनी स्पष्ट केले. आम्ही पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले असून, पाकिस्तान याबाबत विनाकारण खोटा दावा करत आहे. पडलेले विमान मिग-२१ असल्याचे पाकिस्तानी माध्यमे सांगत असली, तरी ते एफ-१६ विमान होते, असे यावेळी सांगण्यात आले.
२७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, याची माहिती रडारवरून मिळताच आमच्या मिराज, मिग आणि सुखोई विमानांनी पाठलाग करुन त्यांना पिटाळून लावले. यात दोन एफ-१६ विमान पाडण्यात आम्हाला यश आले. दोन वैमानिक विमानातून उड्या मारत असल्याचे दिसत होते. त्या विमानाचा मलबा गुलाम काश्मीरमध्ये पडला. मात्र या कारवाईत आमचेही एक मिग विमान कोसळले, असे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
आम्ही भारताची दोन जेट विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही खोटा आहे. आधी भारताच्या दोन वैमानिकांना पकडल्याचा दावा पाकिस्तान करत होते, पण नंतर त्यांनी कोलांटउडी घेत एकाच वैमानिकाला पकडल्याचे मान्य केले. यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा दिसून येतो, असे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
आम्ही निर्मनुष्य भागात बॉम्बहल्ला केल्याचा दावा पाकिस्तान करत असला, तरी त्यांनी आमच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असे या अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानी विमानांच्या हल्ल्यात भारताचे कोणतेच नुकसान झाले नाही, असे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
भारतीय विमानांनी बालाकोट भागातील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावेही आमच्याजवळ असून, ते आम्ही केव्हाही दाखवू शकतो. या तळाचे जेवढे नुकसान आम्हाला करायचे होते, तेवढे आम्ही केले आहे, असे या अधिकार्‍यांनी सांगितले. पाकिस्तानात घुसून आम्ही आमचे मिशन पूर्ण केले असल्याचा दावा या अधिकार्‍यांनी केला. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे आर. जी. के. कपूर यांनी स्पष्ट केले.
समुद्रीमार्गाने पाकिस्तानने काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा तेवढ्याच जोमाने सामना केला जाईल, भारतीय नौदल यांसाठी सक्षम असल्याचे रियल अ‍ॅडमिरल दलबीरसिंह गुजराल यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (125 of 2216 articles)

Sansad Top
दिल्ली, २८ फेब्रुवारी - विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना समोर करून पाकिस्तान सौदेबाजी करू शकत नाही आणि भारत त्यांच्या सुटकेसाठी ...

×