ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दहशतवाद थांबवा, आमचेही पर्याय खुले आहेत

दहशतवाद थांबवा, आमचेही पर्याय खुले आहेत

►करतारपूर कॉरिडोर पायाभरणी समारंभात कॅप्टन अमरिंदरसिंग कडाडले,
डेरा बाबा नानक, २६ नोव्हेंबर –

Kartarpur Corridor

Kartarpur Corridor

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सोमवारी गुरदासपूर येथील डेरा बाबा नानक येथे भारत आणि पाकिस्तानचा संयुक्त उपक्रमाची पायाभरणी केली. या समारंभात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला. तुम्ही दहशतवाद पसरवायचा, आमच्या जवानांना भ्याड हल्ले करून मारायचे आणि आम्ही शांत बसायचे काय? लक्षात ठेवा, आमचेही सर्व पर्याय खुले आहेत, ज्यांचा वापर आम्ही केला, तर तुम्हाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम त्यांनी पाक सरकार आणि लष्कराला दिला.
या पायाभरणी कार्यक्रमात केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. अमरिंदरसिंग म्हणाले की, मी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांना स्पष्टपणे सांगतो की, मीसुद्धा भारतीय लष्करात जवान राहिलो आहे. बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे. प्रत्येक जवानाला माहीत असते की, दुसरा जवान काय विचार करतो. आमच्यासाठी देशाची सुरक्षा नेहमीच सर्वोच्च असते, पण निर्दोष लोकांना आणि सीमेवर तैनात दुसर्‍या देशाच्या जवानांना ठार मारा, ही शिकवण तुम्हाला लष्करातील कोणत्या अधिकार्‍याने दिली? अमृतसरचे लोक कीर्तन करीत असताना तुमचे लोक बॉम्बहल्ला करतात. पठाणकोटच्या हवाई तळावर घुसा आणि तिथे तैनात जवानांना मारा, असा आदेश तुम्हाला तुमच्या सरकारने दिला होता काय, असा सवालही त्यांनी केला.
इशारा आणि आभारही
अमरिंदरसिंग यांनी कमर बाजवासोबत पंतप्रधान इम्रान खान यांनाही इशारा दिला. तुम्ही तुमच्या लष्कराला आवरा आणि भारताच्या भूमीत सुरू असलेला दहशतवाद ताबडतोड थांबवा. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही दुबळे आहो, असा मुळीच नाही. प्रत्युत्तर देणे आम्हालाही माहीत आहे. आम्ही जर समोर पाऊल टाकले, तर तुमच्यासाठी ते अतिशय कठीण जाईल, असा इशारा देतानाच, करतारपूर कॉरिडोरचा विकास करण्याच्या भारताच्या पुढाकारात सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी इम्रान खान यांचे आभारही मानले.
यावेळी त्यांनी याच कॉरिडोरच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी २८ नोव्हेंबरला पाकला न जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थनही केले. तुमचे सैनिक आमच्या निष्पाप नागरिकांना मारत असताना, मी तुमच्या देशात पाय कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (488 of 2053 articles)

Bullet Train
२ तास २५ मिनिटांत प्रवास, नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर - येत्या काही वर्षांत चेन्नई ते म्हैसूर व्हाया बंगळूरू हा प्रवास ...

×