ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय, सोलापूर » देशात १० वर्षे रिमोट कंट्रोलचे सरकार होते

देशात १० वर्षे रिमोट कंट्रोलचे सरकार होते

►प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे राहुल, सोनिया गांधी यांना लक्ष्य,
►माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही लगावला टोला,
संगमेश जेऊरे,
सोलापूर, दि. ९ जानेवारी –

Pm Modi Sabha In Solapur Park Maidan0

Pm Modi Sabha In Solapur Park Maidan0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवत आमच्यापूर्वी दिल्लीत सन २००४ ते २०१४ या १० वर्षं रिमोट कंट्रोलवालं सरकार होते. परंतू सन २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर गतीमानतेने विकास कामे कशी केली हे मोदींनी सांगितले.
काँग्रेसच्या सरकारने १० वर्षात १३ लाख घर बनवण्याचा निर्णय कागदावर ठेवला. इतक्या मोठ्या देशात १३ लाख घरं म्हणजे काहीच नाही. त्यात काँग्रेसने घर बांधली ती केवळ ८ लाख. १० वर्षात ८ लाख घरं, म्हणजेच १ वर्षात ८० हजार घरांची निर्मिती केली. मोदी सरकार एकट्या सोलापुरात ३० हजार घरांची निर्मिती करत आहे. साडेचार वर्षात आम्ही ७० लाख शहरी गरिबांच्या घरांना मंजुरी दिली. ४ वर्षात १४ लाख घरं बनवली. लवकरच ३७ लाख आणखी घरं बनतील, अशी माहिती देत त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली. आणि काँग्रेसच्या काळात विकास कामांना मारलेल्या लकव्याचाही उल्लेख केला.
आमचा सरकार गरीब, मध्यमवर्गींचा विकासासाठी काम करत आहेत. काँग्रेसने गरीबांना कधी पुढे येऊ दिले नाही. सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी मोदी सरकार कटीबध्द आहे. घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चावी देण्यासाठी मीच सोलापूरला येणार असल्याचे मोदी म्हणताच मोदी, मोदी, मोदी चा आवाज घुमला. काँग्रेसच्या काळात ज्यांनी घरे बांधली, ज्यांनी उद्योगात काम केले तेच झोपडीत राहावे लागले. अटलजीने सन २००० मध्ये कुंभारी येथील १० हजार विडी घरकुलांच्या कामांना मंजूरी दिली. त्यानंतर दहा वर्षे काम संथगतीने सुरु राहिला. ३० हजार घरकुलात कामगार, रिक्षा चालकांना आपल्या हक्काच घर मिळणार आहे. त्याची लवकरच चावी आपल्या हाती मिळतील, असा विश्‍वासही मोदी व्यक्त केला.
..अन् हेच स्मार्ट सिटीची खिल्ली उडवतात
ग्रामीण भागासोबतच शहरी भागाचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार केला. परंतू काँग्रेस सरकारने शहरे बकाल केली. विकास केला नाही. तेच लोक आता स्मार्ट सिटीचे मजाक उडवत आहेत, अशी टिका मोदींनी केली. येत्या दशकात जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणार्या शहरातील टॉपटेन मध्ये भारतातील दहा शहरे आहेत. जगात पहिल्या टॉपटेनमध्ये देशातील १० शहरे असे ही अभिमानाची गोष्ट आहे. स्थायी विकासासाठी सरकारचा प्रयत्न आहे. १०० शहरात स्मार्ट सिटी कामे सुरु असल्याचे मोदी यांनी यावेळी निदर्शनास आणून देताना काँग्रेसवर हल्लाबोल केला.
सोलापूरसाठी विमानसेवेचा मोदींचा शब्द
सध्या देशात रेल्वेबरोबरच विमान वाहतुकीलाही महत्व दिले आहे. उडान योजनेंतर्गत विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाला आहे. राज्यातील ४ विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडाण योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरु होईल, असा शब्द मोदी यांनी दिला. हवाई चप्पल घालून फिरणारे सर्वसामान्य माणसांसाठी हवाई सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या १ हजार कोटीच्या रेल्वेमार्गास मंजूरी दिल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. या रेल्वेमार्गामुळे तुळजाभवानीच्या दर्शनास देशभरातून भाविकांना येण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
चार वर्षात ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारने केलेल्या कामांचा प्रशंसा केला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ५८ किलोमीटर लांबीच्या चौपदरी रस्त्याचे भूमिपूजन माझ्याच हस्ते सन २०१४ मध्ये झाली. आज त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या असणार्या मराठवाडा या विभागाशी दळण-वळण वाढण्यासाठी मदत होणार असून, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाल्याचे मोदी म्हणाले. ३१ मार्च २०१४ रोजी देशात ९१,२८७ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. सध्या यात वाढ होऊन १,३१,३२६ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. गेल्या चार वर्षात ४० हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची बांधणी केल्याचे मोदी म्हणाले.
….तर त्यांचा मार्ग खुला झाला
पाकिस्तान, बांग्लादेश, आफगाणिस्तान या देशातून भारत देणार्या नागरिकांसाठी नागरिकत्व देण्याचा विधेयकही लोसकभेत मंजूर झाला आहे. आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. भारत माता की जय, वंद मातरम म्हणणार्यांनाच भारतात स्थान आहे. या विधेयकांमुळे नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्याचा आसाम व पुर्वांचल राज्यातील नागरिकांना काहीही त्रास होणार याची ग्वाही देतो असे मोदी म्हणाले. मध्यप्रदेश सरकारने वंदे मारतमला परवानगी नाकारल्यानंतर मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांचा समाचार घेतला. सबका का साथ सबका विकास हा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भाग विकासाच्या माध्यमातून नवीन भारत निर्माण करण्याचा विडा उचलला आहे, असे मोदी म्हणाले.
विमा योजनेतून मध्यम वर्गीयांसाठी ३ हजार कोटी
गरीबांबरोबरच मोदी सरकार मध्यमर्गीयांसाठी काम करत आहे. मध्यमवर्गींयाासठी अटल विमा पेन्शन योजना सुरु केली आहे. प्रतिदिन ९० पैसा प्रिमियम आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना सुरु केली. १ रुपये प्रिमियम आहे. दुर्दैवी घटनेत अपघात कुटुंबाला २ लाख रुपयाची मदत दिली जाते. आतापर्यंत देशातील गरिब कुटुंबाना ३ हजार रुपयाची विमा मदत थेट खात्यात पोच केली आहे. ‘ना बोले, ना ढोले पिटे’ फिर भी ३ हजार रुपये मदत दिल्याचे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, तुमच्या आशीर्वादासाठी तिसर्यांदा सोलापुरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच तुमच्या आशिवार्दासाठी तिसर्यांदा सोलापुराला आल्याचा उल्लेष केला. विशेष म्हणजे ेदेशाच्या स्वातंत्र्यानंतर सोलापुरला तीन वेळा भेट देणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान ठरले आहेत, असे म्हणताच मैदानात मोदी मोदीचा नारा घुमला.
मोदींनी भगवद् गीता उघडून पाहिली
व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुणेरी पगडी, खांद्यावर घोंगडी, २०० वर्षे जुने हस्तलिखित भगवदगीता ग्रंथ, तलवार देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी हाताने लिहिलेली भगवदगीता मोदींनी उघडून आवर्जून पाहिली. यावेळी स्टेडियममध्ये मोदी.. मोदी…असे नारे घुमले.
होम मैदानावर उत्स्फूर्त स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवारी सोलापूर येथील होम मैदानावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी १०.५० वाजता उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त आनंद लिमये, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उप जिल्हाधिकारी एम बी बोरकर, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यासह प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय, सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय, सोलापूर (400 of 2228 articles)

Pm Modi Sabha In Solapur
निर्मितीत उणीव, पण सभेतील उपस्थिती उत्स्फूर्त, विजयकुमार पिसे, सोलापूर, दि. ९ जानेवारी - लातूर आणि सोलापूर येथे दोन मोठे इव्हेंन्ट ...

×