ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » देशाला मजबूर नव्हे, मजबूत सरकारची गरज

देशाला मजबूर नव्हे, मजबूत सरकारची गरज

►नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
►भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, १२ जानेवारी –

Pm Modi Bjp Meeting 2019 Pti

Pm Modi Bjp Meeting 2019 Pti

देशाला मजबूर सरकार मिळावे, असा विरोधकांचा प्रयत्न आहे, मात्र देशाची गरज मजबूत सरकारची आहे, मजबूत सरकारच सर्व समस्या निकाली काढत देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे केले.
रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप करताना मोदी बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या दीड तासाच्या घणाघाती भाषणातून मोदी यांनी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. विकासाच्या मंत्रानुसार या सरकारची वाटचाल सुरू आहे, मात्र काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांना विकास पाहावत नाही; कारण त्यांचा भ्रष्टाचार मी बंद केला, त्यामुळे त्यांना देशात मजबूत नव्हे, मजबूर सरकार हवे आहे, जे त्यांचा भ्रष्टाचार सुरू ठेवू शकेल. देशाचा विकास, सुरक्षा, गरीब जनतेच्या तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी देशात मजबूत सरकारची गरज असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य असा हमी भाव मिळावा, आयुष्यमान भारतासारख्या कल्याणकारी योजना राबवता याव्या, संरक्षण साहित्यातील भ्रष्टाचार दूर व्हावा, लष्कराच्या सर्व गरजांची पूर्तता करता यावी, यासाठी आम्हाला मजबूत सरकार हवे आहे, तर वेगवेगळे घोटाळे करता यावे, संरक्षण साहित्य खरेदीत दलाली खाता यावी, म्हणून विरोधी पक्षांना मजबूर सरकार हवे आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
२१ व्या शतकाच्या सुरुवातीची २००४ ते २०१४ पर्यंतची दहा वर्षे वेगवेगळे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे वाया गेली. सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तसेच २००४ नंतर अटलबिहारी वाजपेयी यांना पुन्हा पंतप्रधानपदाची संधी मिळाली असती, तर देशाचे चित्र निश्‍चितच वेगळे राहिले असते. गेल्या साडेचार वर्षातील भाजपाच्या सरकारांची कामगिरी पाहता देशाला विकासाच्या शिखरावर फक्त भाजपाच नेऊ शकते, असा विश्‍वास जनमानसात निर्माण झाला. देश बदलू शकतो, सामान्य जनतेच्या हितासाठी बदलू शकतो, सत्तेच्या दालनातील दलालांना दूर केले जाऊ शकते, हे भाजपाच्या सरकारांनी सिद्ध केले आहे, असे मोदी यांनी ठासून सांगितले.
‘सबका साथ सबका विकास’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा भाजपा सरकारच्या कामाचा मूलमंत्र आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, जेव्हा आम्ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या गोष्टी करतो, तेव्हा त्यात प्रादेशिक अस्मिता आणि आकांक्षांनाही स्थान देतो. अन्य कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील तरुणांना शिक्षण आणि नोकर्‍यांत दहा टक्के आरक्षण दिले. शिक्षणात तर १० टक्के वाढीव आरक्षण दिले, आरक्षणाचा हा निर्णय नव्या भारताचा आत्मविश्‍वास वाढविणारा तसेच नवा आयाम देणारा आहे. आपला आवाज ऐकला जातो, याची देशातील युवकांची खात्री पटली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावर जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयामागची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मोदी म्हणाले. विरोधी पक्षांच्या महाआघाडीवर हल्ला चढवताना, ज्या काँग्रेसची कार्यपद्धती कधी विरोधी पक्षांना मान्य नव्हती, ते आज काँग्रेससोबत आघाडी करीत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जामीनावर बाहेर असताना या पक्षांचे नेते त्यांच्यासमोर शरणागती पत्करत जनतेला धोका देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राजकारण विचारांवर केले जाते, आघाडी धोरणांवर होत असते, पण आज एका व्यक्तीला हरविण्यासाठी विरोधकांची एकजुट होत आहे, असे मोदी म्हणाले. याआधीच्या काँग्रेस सरकारांनीं देशाला अंध:कारात ढकलल्याचा आरोप मोदी यांनी केला.
रामजन्मभूमीवर काँग्रेसचा अडथळा
रामजन्मभूमीच्या मुद्यावर तोडगा निघूच नये, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आपल्या वकिलांच्या माध्यमातून अडथळा आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, ही वस्तुस्थिती देशातील जनतेने समजून घेतली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
सीबीआयला गुजरातमध्ये येण्यापासून रोखले नाही
आंध्रप्रदेश, बंगाल आणि छत्तीसगड सरकारांनी सीबीआयला आपल्या राज्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांनी असे काय काम केले की, त्यांना सीबीआयची भीती वाटते, त्यांची झोप उडाली. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने आणि त्यांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या सर्व सरकारी यंत्रणांनी मला त्रास दिला, माझा छळ केला, मला त्रास देण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही, असे ते म्हणाले.
संपुआ सरकारचा उल्लेख करीत मोदी म्हणाले की, त्यावेळी एकही अशी तपास यंत्रणा नसेल जिने मला त्रास दिला नसेल. २००७ मध्ये काँग्रेसचे एक केंद्रीय मंत्री गुजरातच्या दौर्‍यावर आले होते; त्यांनी, मोदी येत्या काही महिन्यात तुरुंगात गेलेले दिसतील, असे जाहीरसभेत म्हटले होेते, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
गुजरात विधानसभेत भाषण करताना काँग्रेस नेते मला, तुम्ही तुरुंगात जायची तयारी करा, तुम्ही तुरुंगात चांगल्या व्यवस्था करा, कारण लवकरच तुम्हाला तुरुंगात जावे लागणार आहे, अशा धमक्या देत होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल इतक्यातच आला, त्यातून मोदींना त्रास देण्याचा संपुआ सरकारचा एकमेव अजेंडा असल्याचे दिसून येते. अमित शाह यांना तर त्यांनी तुरुंगात पाठवलेच होते. आम्ही मात्र सीबीआय वा अन्य तपास यंत्रणा गुजरातमध्ये येऊ शकणार नाही, असा नियम कधी बनवला नाही. आमच्याजवळही सत्ता होती, कायदे आम्हालाही माहीत होते. आमचा सत्य आणि कायद्यावर विश्‍वास होता, त्यामुळे आम्ही असे वागलो नाही, हे लोक मात्र आपल्या काळ्या कारनाम्यामुळे घाबरलेले दिसतात, असा हल्ला मोदी यांनी चढविला.
शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जादाता
शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तोडगा काढताना आधीच्या वस्तुस्थितीचा स्वीकार केला पाहिजे, ज्यांच्याकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची जबाबदारी होती, त्यांनी शॉर्टकटच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, शेतकर्‍यांकडे अन्नदाता म्हणून नाही तर मतदाता म्हणून पाहिले. आम्ही त्यांना ऊर्जादाता बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणीच केली नाही तर त्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळेल, याची काळजीही घेतली आहे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (191 of 2024 articles)

Union Minister And Bjp Leader Nitin Gadkari
गडकरी यांचा स्पष्ट आरोप, नवी दिल्ली, १२ जानेवारी - पराभवाच्या भीतीने उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांना आघाडी करावी लागली, नरेंद्र ...

×