ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » नक्षली हल्ल्यात भाजपा आमदारासह पाच जणांचा मृत्यू

नक्षली हल्ल्यात भाजपा आमदारासह पाच जणांचा मृत्यू

•प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दंतेवाडातील घटना,
बस्तर, ९ एप्रिल –

Maoist Naxal

Maoist Naxal

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यातील कुआंकोंडा ठाण्याअंतर्गत येणार्‍या श्यामगिरी येथे नक्षलवाद्यांनी भाजपाच्या प्रचार रॅलीला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात भाजपाचे आमदार भीमा मांडवी यांच्यासह त्यांच्या सुरक्षा पथकातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन सुरक्षा कर्मचारी आणि एका वाहन चालकाचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार नक्षलवाद्यांनी दंतेवाडा-सुकमा रस्त्यावर नकुलनार नावाच्या जागी आमदार भीमा मंडावी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि एका गाडीला स्फोटात उडवून दिले. या स्फोटात बुलेटप्रुफ गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे.
दंतेवाडा विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या बस्तर लोकसभा मतदार संघात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. हा हल्ला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झाला.
नक्षलवादविरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक पी. सुंदर राज यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार आमदार मांडवी यांच्यासह तीन सुरक्षाकर्मी आणि गाडीचा चालक यांचाही मृत्यू झाला आहे. आम्ही मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सर्व मृतदेह आधी आमच्या मुख्यालयात आणले जातील, असेही त्यांनी सांगितले. या स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी अतिशय उच्च क्षमतेच्या आयईडीचा वापर केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
घटनेची माहिती प्राप्त होताच राज्यातील काँग्रेस सरकारची झोप उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी आणि कारवाईची रूपरेषा ठरविण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती.
४० वर्षीय भीमा मंडावी हे दंतेवाडा विधान सभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बस्तर क्षेत्रातील ते भाजपाचे एकमेव आमदार होते. बस्तर क्षेत्रात विधानसभेच्या १२ जागा असून इतर जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून बचेली येथून कुआकोंडाकडे मंडावी परतत असताना सुरुंग लावून हा हल्ला करण्यात आला. हा स्फोट घडवून आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला. जे वाहन स्फोटात उडविले गेले, त्यात आमदार मंडावी बसले होते. हे वाहन मंडावी यांच्या ताफ्यात शेवटी होते आणि त्याचाच नेमका स्फोट झाला. स्फोट होताच ताफ्यातील इतर वाहनांमध्ये असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती प्राप्त होताच सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जे वाहन स्फोटात उडविले गेले ते बुलेटप्रुफ होते. मात्र, स्फोट इतका तीव्र होता की त्यात बुलेटप्रुफ वाहनाचे तुकडे तुकडे झाले. नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून बस्तर लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
ज्या मार्गावर आज नक्षलवाद्यांनी आज हल्ला केला त्याच मार्गावर २०१४ साली नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला केला होता. त्यात टीआय विवेक शुक्लांसह पाच जवान शहीद झाले होते. तसेच २५ मे २०१३ रोजी झीरम घाट येथे नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता आणि त्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ला, तत्कालीन छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल व बस्तरचे दिग्गज नेते महेंद्र कर्मा या मोठ्या नेत्यांचा समावेश होता.
या नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेले भाजपा आमदार आणि शहीद पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Posted by : | on : 10 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (72 of 2407 articles)

Chandrakant Sharma Rss
ठार, किश्तवाडच्या रुग्णालयातील घटना •संचारबंदी जारी, लष्कराला पाचारण, जम्मू, ९ एप्रिल - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील प्राथमिक सेवा रुग्णालयात राष्ट्रीय स्वयंसेवक ...

×