ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार,
पुणे, १९ नोव्हेंबर –

Digvijaya Singh

Digvijaya Singh

एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या भीषण हिंसाचार प्रकरणानंतर नक्षल समर्थकाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या एका पत्रात आढळलेला मोबाईल क्रमांक काँगे्रसचे वादग्रस्त नेते दिग्विजयसिंह यांचाच असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ही नवीन घडामोड पोलिसांनी या प्रकरणी दाखल आरोपपत्रात समाविष्ट केली आहे. त्यांची या प्रकरणी लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पत्रात आढळलेला मोबाईल क्रमांक दिग्विजयसिंह यांचाच आहे काय आणि नक्षलवाद्यांना मदत करण्यास ते तयार झाले आहेत का, याचा तपास पुणे पोलिसांनी जवळजवळ पूर्ण केला आहे. नक्षलवादी प्रकाशने सुरेंद्र गडलिंगला पाठविलेल्या एका पत्रातील मोबाइल क्रमांक दिग्विजयसिंह यांचा असल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी या खटल्यात प्राथमिक आरोपपत्र सादर केले असून, यात आता तो क्रमांक दिग्विजयसिंहांचाच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सुरू केलेल्या तपासात दिग्विजयसिंहांच्या मोबाइल क्रमांकाची चौकशी केली. नक्षलवाद्यांच्या पत्रव्यवहारात त्यांचा क्रमांक असल्याचे स्पष्ट झाल्याने या क्रमाकांवरून त्यांचे नक्षलवाद्यांशी काही बोलणे झाले का, याचीही चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील शनिवारवाडा येथे गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस झालेल्या एल्गार परिषदप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान पुणे पोलिसांनी संशयित नक्षलवाद्यांच्या ताब्यातील अनेक कागदपत्रे, सीडी, हार्डडिस्क, लॅपटॉप जप्त केले असून, त्यातून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यातील एका हार्डडिस्कमधून कॉम्रेड प्रकाशने गडलिंगला पाठवलेल्या पत्रात काही मोबाइल क्रमांक पोलिसांना आढळले होते. त्यातील एक क्रमांक दिग्विजयसिंहांचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या मोबाईल क्रमांकाची पडताळणी टेलिकॉम कंपनीकडूनही केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली. आपण या प्रकरणी दिग्विजयसिंह यांना समन्स बजावणार आहात काय, असे विचारले असता, चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स जारी करण्याचा आमचा अधिकारच आहे, असे त्यांनी सांगितले.
काँगे्रसच्या वेबसाईटवरही हाच क्रमांक
धक्कादायक बाब म्हणजे, नक्षलवाद्याच्या या पत्रात जो क्रमांक देण्यात आलेला आहे, तोच क्रमांक काँगे्रसच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहे आणि तो दिग्विजयसिंह यांच्या नावासमोर दिला गेला आहे.
कोणत्याही चौकशीस तयार : दिग्विजयसिंह
भाजपा मला घाबरत आहे आणि त्यामुळे मला या प्रकरणात गोवले जात आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
पत्रातील मजकूर असा
दिग्विजयसिंह यांचा मोबाईल क्रमांक ज्या पत्रात आढळला, त्या पत्रातील मजकूर असा आहे – ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण आता आपले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करायला हवे. सुरक्षा दलाच्या जवानांची विद्यार्थ्यांबाबतची भूमिका मवाळ असते. काँगे्रसचे काही नेतेही यात आपल्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहेत, तसेच चळवळ तीव्र करण्यासाठी निधी देण्याचीही त्यांची तयारी आहे. याच संदर्भात तुम्ही काँगे्रसमधील आमच्या एका मित्राशी संपर्क करू शकता. त्यांचा क्रमांक आम्ही देत आहोत.(विशेष म्हणजे, हाच क्रमांक दिग्विजयसिंह यांचा असल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले आहे.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (106 of 1875 articles)

Narendramodi 2 Bangluru
मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर - अटकाने, लटकाने आणि भटकानेवाल्या संस्कृतीने हरयाणा, दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमधील जनतेचे ...

×