ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » नवा भारत घडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या

नवा भारत घडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या

•अभिभाषणातून राष्ट्रपतींचे आवाहन
•संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ,
नवी दिल्ली, ३१ जानेवारी –

Modi Kovind Pib

Modi Kovind Pib

व्यापक विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे, शेवटच्या माणसाचा विकास होईस्तोवर परिवर्तनाची ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे. देशातील १३० कोटी जनतेच्या सहकार्याने आणि आशीवार्दाने नवा भारत घडवण्यासाठी माझे सरकार प्रयत्नशील आहे, नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेत जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले.
संसदेच्या केंद्रीय कक्षात दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतांना राष्ट्रपती कोविंद बोलत होते. राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणाने आज गुरुवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित होत्या. आपल्या तासभराच्या भाषणात राष्ट्रपती कोविंद यांनी मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील उपलब्धींचा आढावा घेतला. देशात आता भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्‍यांसाठी जागा नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या लढाईचा नोटबंदी हा महत्त्वपूर्ण टप्पा होता, नोटबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशाच्या समांतर अर्थव्यवस्थेवर प्रहार केला, जो पैसा आतापर्यंत व्यवस्थेच्या बाहेर होता, तो अर्थव्यवस्थेत आणण्यात आला, असे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.
जनधन योजनेत ३४ कोटी खाती
जनधन योजनेमुळे ३४ कोटी लोकांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. देशातील प्रत्येक कुटुंब या योजनेमुळे बँकेशी जोडल्या गेले, यातून ८८ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले, यामुळे बचतीचा नवा मार्ग देशासमोर खुला झाला, असे स्पष्ट करत कोविंद म्हणाले की, माझ्या सरकारने २२ पिकांचा किमान हमी भाव उत्पादन खर्चाच्या दीडपट करण्याचा ऐतिहासिक असता निर्णय घेतला. अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.
करदात्यांच्या संख्येत वाढ
२०१४ च्या आधी देशातील करदात्यांची संख्या ३ कोटी ८० लाख होती, त्यात वाढ होऊन ती आता ६ कोटी ८० लाख झाली आहे. आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी लोक स्वत:हून पुढे येत आहे. आपल्या पैशाचा उपयोग देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे होत आहे, असा विश्‍वास देशातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आर्थिक आघाडीवर झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत देशाचा विकास दर ७.२ टक्क्याच्या दिशेने जात असल्याचे कोविंद यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा आवाज आज सन्मानपूर्वक ऐकला जातो, ही माझ्या सरकारची मोठी राजनयिक उपलब्धी आहे, याकडे लक्ष वेधत कोविंद म्हणाले की, भारत आज जगातील सौर ऊर्जा क्रांतीचे नेतृत्व करत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
कल्याणकारी योजनांचा उल्लेख
आयुष्यमान, उज्ज्वला आणि सौभाग्य योजनेसह मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा कोविंद यांनी आपल्या भाषणातून उल्लेख केला. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचाही कोविंद यांनी आढावा घेतला. राष्ट्रपती कोविंद यांच्या हिंदी भाषणाचा इंग्रजी अनुवाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सादर केला.
सर्जिकल स्ट्राईक, राफेलचा उल्लेख
बदललेल्या भारताने सीमेपलिकडच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या नवीन धोरणाचा आणि नवीन पद्धतीचा परिचय करून दिला आहे, असे कोविंद यांनी म्हणताच केंद्रीय कक्षात उपस्थित खासदारांनी बाके वाजविली. बराच वेळ मेज थपथपविण्याचा आवाज गुंजत होता. परमाणू त्रिकोणाची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशात भारताचा समावेश झाला आहे, असे कोविंद यांनी सांगितले.
आपली सशस्त्र दले आणि त्यांचे मनोबल २१ व्या शतकातील भारताच्या सामर्थ्यांचे प्रतिक आहे. अनेक दशकांनतर भारतीय वायुसेना येत्या काही महिन्यात नवीन पिढीच्या अत्याधुनिक अशा राफेल लढाऊ विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश करून आपली क्षमता आणखी सुदृढ करत आहे, असे कोविंद यांनी म्हणताच पुन्हा उपस्थित खासदारांनी बराच वेळ मेज थपथपवून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदीही यात सहभागी होते.
तीन तलाकविरोधी कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील
मुस्लिम मुलींना भयमुक्त तसेच अन्य मुलींप्रमाणे स्वाभिमानाचे जीवन जगता यावे म्हणून माझे सरकार तीन तलाकसंदर्भातील विधेयक संसदेत पारित करून घेण्याचा प्रयत्न करत आहे, याकडे लक्ष वेधत कोविंद म्हणाले की, अल्पवयीनांवर होणार्‍या बलात्काराच्या घृणात्मक प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने अशा गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतचा कायदा केला आहे. अनेक राज्यात अशा प्रकरणांची वेगवान सुनावणी करून दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांमध्ये कठोर संदेश गेला आहे.
नमामी गंगेचा गौरवपूर्ण उल्लेख
नमामी गंगे मिशन अंतर्गत आतापर्यंत २५ हजार ५०० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, याचा गौरवपूर्वक उल्लेख करत कोविंद म्हणाले की, गंगेत सांडपाणी वाहून आणणारे अनेक मोठे नाले बंद करण्यात आले. औद्योगिक कचर्‍याची गंगेत होणारी विल्हेवाट थांबवण्यात आली, तसेच गंगेच्या काठावर सिवेज ट्रिटमेंट प्लांट उभारून माझे सरकार गंगा स्वच्छ करण्याच्या कामात प्रामणिकपणे आणि पूर्ण ताकदीने भिडले आहे.

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (93 of 2024 articles)

Piyush Goyal 1
गोयल पाडणार लोकप्रिय घोषणांचा पाऊस?, नवी दिल्ली, ३१ जानेवारी - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला असून, उद्या मोदी सरकार ...

×