ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्राची मंजुरी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्राची मंजुरी

आज लोकसभेत होणार सादर,
नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Sansad Bhavan1

Sansad Bhavan1

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा मसुदा नव्यान तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सोमवारी मंजुरी दिली आहे. उद्या मंगळवारी हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील गैरमुस्लिमांना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१६ मध्ये हे विधेयक सर्वप्रथम संसदेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर ते अभ्यासासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले.
आसाम आणि ईशान्येतील अन्य राज्यांतील भाजपा सोडून काही राजकीय पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे. १९७१ नंतर राज्यात प्रवेश करणार्‍या कोणत्याही धर्माच्या विदेशी नागरिकाला मायदेशी परत पाठविण्याची तरतूद असलेला १९८५ मधील आसाम करार यामुळे रद्द ठरेल, अशी भीती या पक्षांंकडून व्यक्त केली जात आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर, भारताच्या शेजारी देशांमधून आलेल्या मुस्लिम लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे हे मुसलमान ज्या राजकीय पक्षांची व्होटबँक आहे, ते राजकीय पक्ष या विधेयकावरून बिथरले आहेत.
केंद्र सरकारने नागरिकत्व विधेयकात काही दुरुस्त्या करून, अफगाण, बांगलादेश आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि सहा वर्षे वास्तव्य केलल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्‍चन नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. विद्यमान कायद्यात १२ वर्षे भारतात वास्तव्य करणार्‍यांनाच नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. ती बदलून आता सहा वर्षे वास्तव्याची अट यात टाकण्यात आली आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याचे वचन भाजपाने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या संकल्पपत्रात दिले होते.
तर आसामात हिंदू अल्पसंख्यक
गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत पारित झाले नाही, तर आगामी पाच वर्षांच्या काळात
आसामात हिंदू अल्पसंख्यक झालेला दिसेल, अशी भीती राज्याचे वरिष्ठ मंत्री हिमंता बिस्वा यांनी आज सोमवारी व्यक्त केली.
आसामला दुसरे काश्मीर करण्याचा कट रचणार्‍या समाजविरोधी शक्तीच हे विधेयक रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मनात हिंदूंविषयी प्रचंड द्वेष आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
आसामातील हिंदूंच्या अस्तित्वासाठी हे विधेयक पारित होणे अतिशय आवश्यक आहे. ते पारित न झाल्यास आपल्याच राज्यात हिंदू समाज आगामी पाच वर्षांत अल्पसंख्यक होईल आणि आसामचे दुसरे काश्मीर झालेले असेल, असे त्यांनी सांगितले.
शिलाँगमध्ये भाजपा कार्यालयावर हल्ला
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा निषेध करून अज्ञात लोकांनी मेघालयच्या शिलाँग येथील भाजपा कार्यालयावर बॉम्बहल्ला केला. यात कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तथापि, यात कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगपने काढला भाजपाचा पाठिंबा
गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा निषेध करून आसाम गण परिषदेने आज सोमवारी भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढला. आगपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. या भेटीत राजनाथसिंह यांनी, विधेयक पारित करण्याचा आपल्या सरकारचा ठाम निर्धार असल्याचे सांगितले. यानंतर आसामातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीे आगपचे अध्यक्ष अतुल बोरगा यांनी दिली. आगपने पाठिंबा काढला असला तरी, भाजपा सरकार बहुमतात असल्याने कुठलाही धोका नाही.
निषेध आंदोलनाचा भडका
गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाले नाही, तर आसामात हिंदू अल्पसंख्यक होईल, या अर्थमंत्री हिमंता बिस्वा यांच्या भूमिकेचा निषेध करीत डाव्या विचारांच्या विविध संघटनांनी आज सोमवारी राज्याच्या अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलन छेडले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बिस्वा यांनी राज्यात मतदारांचे धृवीकरण करण्यासाठीच अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे, असा आरोप या संघटनांनी केला आहे. तर, मी कुठल्याही एका समाजाविषयी बोललो नसल्याचे स्पष्टीकरण बिस्वा यांनी दिले.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (429 of 2234 articles)

Christian Michel Sonia Gandhi Rahul
दलाल हॅशकेच्या घरातून मिळाली कागदपत्रे ►काँगे्रसला आणखी एक धक्का, नवी दिल्ली, ७ जानेवारी - अगस्ता वेस्टलॅण्ड हलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात ३२५ ...

×