ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित

►आसाममधील एनआरसीवर कोणताही परिणाम होणार नाही : राजनाथसिंह,
नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Rajnath Singh 11

Rajnath Singh 11

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरवर (एनआरसी) कोणताही परिणाम होणार नाही, आसामधील लोकांच्या कल्याणासाठी हे विधेयक आहे, असा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी लोकसभेत दिल्यानंतर बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. आसामची सीमा ही देशाची सीमा आहे, त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व केंद्र सरकार करेल, असे राजनाथसिंह म्हणाले.
आसामला डोळ्यासमोर ठेऊन नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तयार करण्यात आले नाही. या विधेयकाची व्याप्ती संपूर्ण देशभर राहणार आहे. या विधेयकाचा आसाममधील एनआरसीवर कोणताही परिणाम होणार नाही. एनआरसीच्या मुद्यावर आम्ही अतिशय गंभीर आहे, या विधेयकामुळे एनआरसीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, मात्र आसाममध्ये आणि देशात बेकायदशीरपणे वास्तव्य करणार्‍या घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हे विधेयक आम्ही आणले आहे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
हे दुरुस्ती विधेयक फक्त आसामपुरतेच मर्यादित नाही, तर संपूर्ण देशाला लागू होणार आहे. आसाममधील लोकांचे अधिकार, संस्कृती आणि रोजगार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आसाममधील आणि बोडो लोकांनी जे मुद्दे उपस्थित केले, त्याचेच प्रतिबिंब या विधेयकात आहे. आसाम करार हा ऐतिहासिक असा करार आहे. यात आसामी लोकांची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख जतन करण्यास सांगितले होते, यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय रचना उभी करण्याची सूचना करण्यात आली होती, पण यादृष्टीने आतापर्यंत काहीच करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.
आसाममधील सहा समुदायांना आदिवासींचा दर्जा देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती, गृह मंत्रालयाने गठित केलेल्या समितीनेही याबाबत शिफारस केली होती, त्यामुळे या सहा समुदायांना आदिवासींचा दर्जा देण्याबाबतचे विधेयक लवकरच आणले जाईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
विशिष्ट देशातून भारतात येणार्‍या लोकांच्या कल्याणासाठी नाही तर शेजारी देशातून भारतात येणार्‍या गैरमुस्लिम शरणार्थ्यांच्या कल्याणासाठी हे विधेयक आहे. पाकिस्तान, बांगलादेश आदी देशातून भारतात येत गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान, पंजाब, आणि दिल्लीत वास्तव्य करणार्‍या लोकांच्या कल्याणासाठी हे विधेयक आहे. अशा लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे, मग ते लोक कोणत्याही जाती-धर्माचे असो. त्यामुळे खर्‍या अर्थाने हे विधेयक धर्मनिरपेक्ष आहे, असे राजनाथसिंह म्हणाले.
पाकिस्तानात अल्पसंख्यकांशी भेदभाव केला जातो. त्यांना मूलभूत तसेच धार्मिक अधिकारांपासून वंचित केले जाते, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, बांगला देश आणि अफगाणिस्तानात तेथील सरकारे अल्पसंख्यकांच्या अधिकारांचे संरक्षण करत असली तरी तेथेही अल्पसंख्यकांवर अत्याचार होता, अशा परिस्थितीत या लोकांना भारतात आश्रयासाठी यावे लागते. अशा लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप (एनआरसी) च्या कामावर या विधेयकामुळे परिणाम होईल, अशी भीती रालोआचे घटकपक्ष असलेल्या आसाम गण परिषद आणि शिवसेनेने व्यक्त केली. त्याचा राजनाथसिंह यांनी ठामपणे इन्कार केला. या विधेयकावरून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.
१९५५ च्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले. हे विधेयक पारित झाल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश,आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्‍चन धर्माच्या लोकांना १२ वर्षांच्या भारतातील वास्तव्याची अट शिथिल करत सहा वर्षांतच कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली. आसाममध्ये झालेल्या दंगलीकडे, तसेच या विधेयकला होत असलेल्या विरोधाकडे त्यांनी लक्ष वेधले. हे विधेयक पुन्हा प्रवर समितीकडे पाठवता येणार नाही, असे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप यांनीही या विधेयकाला विरोध केला. हे विधेयक धार्मिक आधारावर भेदभाव करणारे आहे, जे घटनेतील मूळ तरतुदींच्या विरोधात आहे, असा तृणमूल काँग्रेसचा आरोप होता. विधेयकावर चर्चा होत असताना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सभात्याग केला होता.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (615 of 2426 articles)

Ram Mandir Movement
दिल्ली, ८ जानेवारी - रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेवरील मालकी हक्काच्या वादावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना ...

×