ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नागरिकत्व विधेयकामुळे आसाम, ईशान्येचे नुकसान नाही

नागरिकत्व विधेयकामुळे आसाम, ईशान्येचे नुकसान नाही

•पंतप्रधान मोदी यांची ग्वाही,
चांगसारी, ९ फेब्रुवारी –

Pm Modi Rally Allahabad

Pm Modi Rally Allahabad

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्यांच्या हिताचे कुठलेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे दिली.
आसामचे आरोग्यमंत्री हेमंत शर्मा यांचा मतदारसंघ असलेल्या चांगसारी येथे आयोजित विशाल जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. ईशान्य राज्यांमधील एकाही नागरिकाच्या हिताला धक्काही लागणार नाही, अशी राष्ट्रीय हमी मी आज देत आहो. राज्य सरकारकडून आलेल्या शिफारसी आणि प्रत्येक निर्वासिताची सखोल चौकशी हाच भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याचा आधार असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
अन्य देशांमधून भारतात बळजबरीने घुसलेले आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान व नेपाळमधून जीवाच्या भीतीने पळ काढून, भारताला शरण आलेले गैरमुस्लिम नागरिक या दोन प्रकारांमध्ये बराच फरक आहे आणि हा फरक आम्हालाही माहीत आहे. शेजारील देशांमधून हक्काचे घरदार सोडून केवळ स्वत:चा व परिवाराचा जीव वाचविण्यासाठी भारताच्या आश्रयात आलेल्या आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
३६ वर्षे जुन्या आसाम कराराचे पालन करण्यासाठी भाजपा वचनबद्ध असून, या करारातील कलम सहाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती याचेच द्योतक आहे. आसाम आणि ईशान्येतील अन्य राज्यांमधील भाषा, संस्कृती, संसाधने, तसेच आशा-आकांक्षांचे रक्षण करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अरुणाचलात विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन
पंतप्रधान मोदी यांनी त्यानंतर अरुणाचल प्रदेशला भेट दिली. या दौर्‍यात त्यांनी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या विविध विकासात्मक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. चीनच्या सीमेला लागून असलेल्या या संवेदनशील राज्यात कनेक्टिव्हिटी अद्ययावत करण्यासाठी आपल्या सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेचे जाळे, विमानसेवा आणि ऊर्जेच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी माझ्या सरकारने अनेक ठोस पुढाकार घेतले आहेत. अरुणाचल हे राज्य भारताचा गर्व आहे, देशाचे प्रवेशद्वार आहे आणि सीमांचे रक्षकही आहे. त्यामुळे या राज्याचा विकास करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आणि प्राधान्यही आहे. या राज्यामुळेच देशाला बळकटी आली असल्याने, ते देशाकरिता विश्‍वासाचे प्रतीकही आहे. या राज्यांतील लोक एकमेकांना ‘जयहिंद’ असे म्हणूनच अभिवादन करीत असतात, त्यांच्या देशभक्तीला मी वंदन करतो. अरुणाचल आणि ईशान्येतील अन्य राज्यांच्या विकासातच भारताचा विकास आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांच्या दौर्‍यावर चीनचा आक्षेप
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यावर चीनने पुन्हा एकदा तीव्र आक्षेप नोंदविला आहे. हे संवेदनशील सीमावर्ती राज्य भारताचे अंग असल्याचे आम्ही आजवर कधीच मान्य केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. भारत आणि चीनच्या मैत्रीत वितुष्ट निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य भारतीय नेतृत्वाने करू नये, असा इशारा चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते हू चुनियांग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. भारत आणि चीनच्या सीमावादावर चीनची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि आम्ही ती वारंवार विशदही केली आहे. अरुणाचल भारताचे आहे, हे आम्ही मान्य करणार नाही, असे चुनियांग यांनी स्पष्ट केले.
अरुणाचल आमचेच; भारताचा दावा
चीनच्या या भूमिकेवर भारताने लगेच पलटवार केला आहे. अरुणाचल हे भारताचे अविभाज्य अंग होते, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. चीनने भारताच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करू नये, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रावीश कुमार यांनी सांगितले. भारताचे नेते अरुणाचलला भेट देणारच आहेत, कारण हे राज्य आमचे आहे. त्यावर चीनने आपला हक्क सांगू नये. अरुणाचलबाबत आम्ही चीनला वारंवार आमची भूमिका सांगितली आहे आणि चीननेही ती स्वीकारायला हवी, असेही रावीश कुमार म्हणाले.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (434 of 2426 articles)

Kumbh Prayag 2019
कोटी भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, ९ फेब्रुवारी - उद्या रविवारी असलेल्या वसंत पंचमीच्या अनुषंगाने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात तिसर्‍या शाही स्नानाचे ...

×