ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » तरुण विजय, नागरी, राष्ट्रीय, स्तंभलेखक » नितीन गडकरी : भारतमार्गविधाता

नितीन गडकरी : भारतमार्गविधाता

तरुण विजय |

Nitin Gadkari 2

Nitin Gadkari 2

२०१४ साली नितीन गडकरी यांनी भूपृष्ठ परिवहन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर देशात रस्त्यांच्या विकासाचा असा काही झपाटा लावला की आज देशातील बहुतांश रस्त्यांची समस्याच दूर झाली आहे. धार्मिक स्थळांच्या मार्गावरूनही भाविक गडकरींना आशीर्वाद देऊ लागले आहेत. असे हे नितीन गडकरी मित्रांचे मित्र असून ते आपले जुने परिचित आणि मित्रांसोबत आधी जसा व्यवहार होता तसा व्यवहार आजही करतात.
सार्वजनिक जीवनात असे फारच कमी लोक असतात जे मोठ्या पदांवर पोहचल्यानंतरही आपल्यातील विनम्रता आणि मनमोकळेपणाने जगण्याची कला सांभाळून ठेवतात. जिंदादिल नेता असलेल्या गडकरी यांनी आपले काम आणि विचारधारा याशिवाय आपल्या जीवनात अन्य कोणत्याही बाबींची पर्वा केली नाही. ते आपल्या जीवनातील प्रत्येक काम एका आव्हानाच्या रूपात घेतात. दिल्लीतील त्यांच्या मंत्रालयात एका मोठ्या पट्टीवर लिहिलेल्या ओळी खूपच लोकप्रिय आहे… ‘अमेरिका महान आहे म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत, असे नसून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका महान आहे…’ हाच मंत्र समोर ठेवून गडकरी यांनी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे तयार केला होता. एवढेच नव्हे तर गडकरी यांच्या सूचनेवरूनच अटलजींनी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय आणि ग्रामीण रस्ते विकास योजनेची मुहूर्तमेढ रोवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक समर्पित स्वयंसेवक या नात्याने त्यांनी केंद्रीय मंत्रिपद सांभाळताना एकता आणि विकास या सूत्रांची बांधणी करणार्‍या महामार्गांचे असे काही जाळे विस्तारित केले की कोणत्याही प्रचार किंवा प्रसारमाध्यमांविना त्यांना सर्वसाधारण नागरिक ओळखू लागला, आशीर्वाद देऊ लागला. संपुआ सरकारच्या कार्यकाळात असलेला रस्ते बांधणीचा दिवसाला दोन किमी हा वेग १४ पट वाढवून दिवसाला २८ किमी करण्याचे श्रेयही गडकरी यांना जाते. त्यांनी बद्रीनाथ-केदारनाथच्या राष्ट्रीय महामार्गासह कैलास मानसरोवरपर्यंतच्या महामार्गाच्या कामाचीही आधारशिला ठेवली आहे. द्वारका एक्सप्रेस वे आणि मुंबई-बडोदा एक्सप्रेस वेवर अनुक्रमे सात हजार कोटी आणि ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून काम सुरू करण्यात आले आहे. चार धामचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. रामेश्‍वरम्ला विमानतळ करता आले नाही म्हणून तेथे जाणार्‍या यात्रेकरूंना मदुरई विमानतळापर्यंत दीड तासांत पोहचविण्याच्या मार्गाचेही काम हाती घेण्यात आले आहे. दिल्ली ते मेरठ, लखनौ, गढ-मुक्तेश्‍वर मार्ग एवढे अधिक सुलभ आणि वेगवान झाले आहेत ती ते पाहण्यासाठीही लोकांची तेथे गर्दी असते.
एक व्यक्ती आपल्या कार्यकाळात किती काम करू शकतो? गडकरी यांच्या मंत्रालयाला त्यांची प्रयोगशाळा आणि पाठशाळा म्हटले जाऊ शकते. एकीकडे जगातील जलमार्ग तोट्यात सुरू असताना, गडकरी यांनी भारतात जलमार्गांना पुनरुज्जीवनच दिले असे नाही तर, पाच आंतरराष्ट्रीय जलमार्गांशिवाय १०६ नवीन जलमार्ग निश्‍चित केले आहेत. आता या १११ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गही घोषित करण्यात आले आहे. त्याचे अनेक लाभ भविष्यात दिसून येणार आहेत.
जगातील सर्व बंदरे तोट्यात असताना भारतातील बंदरांनी २.६ टक्के लाभ मिळविलेला आहे. अर्थात सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक शुद्ध नफा. देशात विद्यमान परिस्थितीत १२ प्रमुख बंदरे आहेत. गडकरी यांनी त्यात आणखी सहा बंदरांची भर घातली आहे. या क्षेत्रातही विकासाचा झंझावात गडकरी यांनी दाखवून दिला आहे.
गडकरी यांनी जलमार्ग क्षेत्रात दोन हजार जलस्थानक स्थापन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या जलमार्गांची बहुउपयोगिता वाढविण्यासाठी पाण्यावर उतरणारी विमाने होवर क्राफ्ट आणि जल बससेवेची योजना तयार केली आहे. रस्ते व जलमार्गांची निर्मिती करताना रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित राहावी यादृष्टीनेही त्यांनी पावले उचलली आहेत. देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचे प्रमुख कारण कार चालविताना सीट बेल्ट न लावणे आणि मोटारसायकल, स्कूटर चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, ही असल्याचेही निदर्शनास आले आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी गडकरी यांनी देशातील ७२६ अपघातग्रस्त ठिकाणांची निवड केली आहे. आता ती ठिकाणे अपघातमुक्त म्हणून विकसित केली जात आहेत.
त्यांची आतापर्यंतची ९० टक्के सामाजिक आणि माणुसकीची कामे प्रसिद्धीपासून त्यांनी दूर ठेवलेली आहेत. आजपर्यंत मला अशी एकही व्यक्ती आढळून आलेली नाही की जी गडकरी यांच्याकडे काही ना काही कामासाठी गेली आहे आणि रिकाम्या हाताने परतली आहे. काम होणार असेल तर हो म्हणणे, नसेल होणार तर स्पष्ट शब्दात नाही म्हणणे, यालाही मोठे मन लागते, ते गडकरी यांच्याकडे आहे.
अशा व्यक्तीला जर भारत मार्गविधाता म्हटले तर आश्‍चर्य वाटायला नको!

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : तरुण विजय, नागरी, राष्ट्रीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in तरुण विजय, नागरी, राष्ट्रीय, स्तंभलेखक (88 of 3534 articles)

Electioncommission Building1
आयोगाचे आयकर विभागाला निर्देश, नवी दिल्ली, १० एप्रिल - मध्यप्रदेश आणि दिल्लीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले ...

×