ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » न्यायालयाची प्राथमिकता नसेल तर, कायदा करा

न्यायालयाची प्राथमिकता नसेल तर, कायदा करा

►राममंदिर शीघ्रातिशीघ्र, संकल्पित स्वरूपात हवे
►सरकारवर लोकदबाव आणायचा आहे : डॉ. मोहनजी भागवत,
नागपूर, (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर), २५ नोव्हेंबर –

Mohanji Bhagwat Hunkar Rally

Mohanji Bhagwat Hunkar Rally

आम्हाला रामजन्मभूमीवर भव्य मंदिर हवे, शीघ्रातिशीघ्र हवे, संकल्पित स्वरूपात हवे आणि ज्यांनी सुरुवातीपासून या आंदोलनाचे नेतृत्व केले, त्यांच्या हातूनच या मंदिराची उभारणी व्हावी. राममंदिराबाबत टाळाटाळ करणार्‍यांजवळ सत्य नाही, हे सिद्ध झालेले आहे. राममंदिराबाबतच्या खटल्याची सुनावणी करण्याची न्यायालयाची प्राथमिकता नसेल तर सरकारने तत्परतेने संसदेत कायदा करावा आणि श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपुरात विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने आयोजित भव्य हुंकार सभेत केले.
रामजन्मभूमीबाबतची वस्तुस्थिती सर्वांना समजावून सांगा. राममंदिराबाबत दृढनिश्‍चय करा. सरकारवर जनतेच्या दबावाची आवश्यकता आहे. हनुमानासारखे दक्ष राहिलो, त्याच्यासारखी बुद्धी वापरली तर हे सारे सहज शक्य होईल, असेही ते म्हणाले.
वर्षभरापूर्वी मी अयोध्येबाबत धैर्याने काम घ्या असे म्हटले होते. पण वारंवार मागण्या करून, न्यायालयाचा मार्ग पत्करूनही न्याय पदरात पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे संसदेत राममंदिराबाबत कायदा करण्याची मागणी करावी लागणार आहे. त्यासाठी जनजागरण करावे लागणार आहे. देशातील हजारो संत-महंतांची ती इच्छा आहे. आंदोलनाचा हा निर्णायक क्षण आहे. पण जोवर मंदिरनिर्माणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोवर हे जनजागरणाचे काम अविरत चालवावे लागेल, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात संपूर्ण विदर्भातून एकत्रित आलेल्या हजारो रामसेवकांसमोर व्यक्त केली.
अयोध्येतील मंदिर उभारणीबाबत मी १९८७ मध्ये पहिल्यांदा एका सभेला संबोधित केले होते. त्या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज पुन्हा त्याच मागणीसाठी या सभेत आलो आहे. आपण मंदिराची मागणी का करतोय्, ही बाब ध्यानात घ्यायला हवी. राम-कृष्ण आणि शिव हे भारताचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी या देशाला एका धाग्यात ओवले आहे. तेच आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. आम्ही स्वतंत्र नव्हतो त्यावेळीही आमचा रामजन्मभूमीसाठी लढा सुरू होता. स्वातंत्र्यानंतर आम्ही सोमनाथचे पुनर्निर्माण केले. त्यावेळी सरदार पटेलांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्याचे अध्ययन केले तर आपल्याला राममंदिराच्या निर्मितीला विलंब का झाला, हे निश्‍चित कळेल, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
बाबराचा संबंध मुसलमानांशी जोडणे अयोग्य असल्याचेही सरसंघचालक म्हणाले. बाबर पापी होता, आक्रमक होता. त्याने भारतातील हिंदूंवरच नव्हे तर मुसलमानांवरही अत्याचार केले. पण आपली संस्कृती श्रीरामाची आहे. आम्ही सहनशील आहोत म्हणून राममंदिराच्या उभारणीसाठी ३० वर्षे लागत आहेत. प्रारंभी आम्ही राममंदिराचे कुलूप उघडले. त्यानंतर न्यायालयीन लढा तीव्र केला. कोर्टाने न्याय देण्यास विलंब केल्यामुळे कारसेवेचा निर्णय घेतला. तत्कालीन सरसंघचालकांनी नरसिंहरावांना कारसेवेची अनुमती मागितली होती. पण त्यांची प्राथमिकता निराळी होती. त्यांनी निर्णय घेण्यास विलंब लावला. जनमत क्षुब्ध झाले आणि परिणामी विवादित ढाचा कोसळला. भारतीय पुररातत्त्व विभागानेही बाबरी ढाचा मंदिर तोडून उभारला असल्याचे पुरावे दिले. हिंदू समाज कायदा पाळणारा असल्यानेच त्याने आजवर न्यायालयाची प्रतीक्षा केली. पण राममंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाला पाऊलच उचलायचे नसेल, सत्य आणि न्यायाला बाजूला सारले जात असेल, तर देशाच्या सार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘जस्टिस डीलेड इज जस्टिस डिनाईड’ ही जी शिकवण आजवर दिली जात आहे, तीच बंद करावी, असा कठोराघातही सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात केला.
अयोध्येचे स्थान रामललाचे आहे, हे सर्व बाजूंनी सिद्ध झाल्यावरही तेथे मंदिर उभारले जात नाही, ही चिंतेची बाब आहे. इंग्रजांच्या काळातही याबाबत टाळाटाळ केली गेली आणि नंतर स्वतंत्र भारतातही टाळाटाळ केली जात आहे. कोणाला सत्तेत आणण्यासाठी अथवा हटवण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभारलेले नसल्याचे नमूद करून, वर्षानुवर्षे जेथे रामलला विराजमान आहे, त्या जागेवर दुसरा कुणी मालकी हक्क कसा काय सांगू शकतो, असा प्रश्‍न सरसंघचालकांनी उपस्थित केला. जेव्हा रामलला अयोध्येत विराजमान होते, त्यावेळी आज हयात असणार्‍यांपैकी कोणीही नव्हते. केवळ तलावारीच्या जोरावर ही जागा ताब्यात घेण्यात आली होती. त्या जागेसाठी आजवर ७७ लढाया झाल्या आहेत. देशभरातून जेव्हा भाविक तेथे जातात, तेव्हा त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होते. सरकारने हिंदू-मुसलमानांमधील वैमनस्याचे कारणच समूळ नष्ट करावे. रामजन्मभूमीवर भव्य मंदिर झाले तरच उभयतांमधील संघर्षाला विराम मिळणार आहे. ज्यांना याबाबत विचार करायचा आहे, त्यांनी त्याची चिंता करावी. तातडीने कायदा आणावा, याकडेही डॉ. मोहनजी भागवत यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (110 of 1912 articles)

Ram Mandir Movement
आखाड्याचे रामजी दास यांची माहिती, अयोध्या, २५ नोव्हेंबर - पुढील वर्षी प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधण्याची ...

×