ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय, सोलापूर » पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात!

Pm Modi Coming To Solapur Today

Pm Modi Coming To Solapur Today1

Pm Modi Coming To Solapur Today2

►प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरांचे भूमिपूजन
►सोलापूर-धााराशिव चौपदरी रस्त्यांचे लोकार्पण
►सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे भूमिपूजन,
प्रतिनिधी,
सोलापूर, दि. ८ जानेवारी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या बुधवार, दि. ९ जानेवारी रोजी सकाळी सोलापुरात येत आहे. या दौर्यांत त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच पंतप्रधान मोदी सोलापुरातील जनतेशी जाहीर सभेच्या माध्यमातून संवादही साधणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर नगरी आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधानांच्या दौर्यांच्या निमित्ताने संपूर्ण सोलापूर शहर भाजपामय झाल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.
संपर्क आणि रस्ते वाहतुकीला चालना देत राष्ट्रीय महामार्ग-५२ वरच्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव दरम्यानच्या चौपदरी रस्त्यांचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. सोलापूर-धाराशिव महामार्गावरच्या या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे सोलापूर शहराशी मराठवाड्याचा संपर्क वाढण्यास मदत होणार आहे.
दक्षिण भारत ते उत्तर भारताला जवळून जोडणारा अतिमहत्त्वपूर्ण अशा सोलापूर-धाराशिव नवीन रेल्वे मार्गाला नीती आयोगाकडून मंजुरी मिळाली आहे. या नियोजित नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांंच्याहस्ते करण्यात येणार आहे. सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३०,००० घरांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी १,८११.३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी ७५० कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार मदत म्हणून पुरवणार आहे.
‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट समोर ठेवून भूमीगत मलनि:सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणार्या तीन सयंत्राचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी तर भूमिगत मलनि:सारण यंत्रणेची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी २४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे दुसर्यांदा सोलापूरला भेट देत आहेत. याआधी १६ ऑगस्ट २०१४ मध्ये दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-९ वरच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन केले होते.
बीदरहुन हेलिकॉप्टरने मोदी होम मैदानावर उतरणार
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सोलापुरकर सज्ज झाले असून, होम मैदान, पार्क स्टेडियमला पोलिस बंदोबस्त छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहेत. नरेंद्र मोदी थेट बिदर येथील विमानतळावरुन लष्करी हेलिकॉप्टरने सोलापुरातील होम मैदानावर सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आगमन होणार आहे.
पोलीस छावणीचे स्वरुप
मोदी यांच्या नियोजित सभेसाठी पार्क स्टेडिमय येथे एसपीजी पोलीसाने ताब्यात घेतले असून, कसून चौकशी तपासणी केली जात आहे. पोलीस खाते सतर्क असून पोलीस खात्याचे राज्याचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत. याशिवाय सभेला येणार्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही पोलीस प्रशासनाने जाहीर करून त्या पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोदींची १८ मिनिटे वाचली
होटगी रोडवरील विमानतळ ते पार्क स्टेडियम हा ९ किलोमीटर अंतराचा असून, मोदी विमानतळावर उतरल्यास एकूण १८ किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनावरुन करावे लागले असते. वेळेचे नियोजन करण्यात हातखंडा असलेल्या एसपीजी अधिकार्यांनी मोदी यांचे हेलिकॉप्टर विमानतळावर उतरविण्याऐवजी थेट होम मैदानावर उतरविणार आहेत. त्यामुळे सुमारे १८ ते २५ मिनिट वेळेची बचत होणार आहे.
मोंदीचा असा राहणार मार्ग
मोदींचे होम मैदानावर आगमन झाल्यानंतर तेथून विशेष वाहनातून डफरीन चौक, महापौर बंगला, रामलाल चौक, सरस्वती चौक मार्गे हुतात्मा पुतळा जवळील पार्क स्टेडियमवरील कार्यक्रम स्थळी येणार आहेत. या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्यासह आधी अधिकार्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधून मोदी यांच्या दौर्याचा आढावा घेतला. यावेळी मनपाने तयार केलेल्या स्मार्ट सिटी चित्रफितही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिली. तसेच नियोजनाच्या सूचना दिल्या.
मोदींसह १३ जण व्यासपीठावर
पंतप्रधान पदासाठी प्रोटोकॉल खुपच काटेकोरपणे पाळावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ जण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल के.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केेंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरजितसिंग पुरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.अ‍ॅड.शरद बनसोडे, अ‍ॅड.रविंद्र गायकवाड, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आ.नरसय्या आडम या तेरा जणांना व्यासपीठावर मोदी यांच्यासोबत स्थान देण्यात आले आहे.
पार्क मैदानावरील प्रवेशद्वारे खुली
मोदी यांची जाहीर सभा पार्क मैदानावर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सध्या पार्क मैदानावर व्यासपीठ उभारणे, व्हीआयपी नागरिकांची बसण्याची व्यवस्थेसह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पार्क मैदानावर जाण्यासाठी मैदानासाठी असलेली सर्व दरवाजे खुली राहणार आहेत. मात्र कोणत्या दरवाजाने कोणी जावयाचे याची निश्‍चिती करण्यात आली आहे.

पीएम मिनिट टू मिनिट प्रोग्रॉम
सकाळी १०.४५ वा. – पंतप्रधान मोदी यांचे होम मैदानावर आगमन
सकाळी ११.५५ वा. – मोदी कार्यक्रमस्थळावरुन हेलिपॅडकडे प्रयाण
प्रास्ताविक पालकमंत्री विजयकुमार देशमुख – २ मिनिट.
केंद्रीय गृहनिर्माण मंत्री पुरी यांचे भाषण – ३ मिनिट
केंद्रीय भुपृष्ट मंत्री नितिन गडकरी यांचे भाषण – ५ मिनिट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण – ५ मिनिट
पंतप्रधान मोदी यांचे भाषण – ३३ मिनिट

होममैदान, पार्कवर कडेकोट बंदोबस्त
सोलापूर – पंतप्रधान मोदी हे सोलापुरात येत असल्याने पोलीस खाते सतर्क असून पोलीस खात्याचे राज्याचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत. याशिवाय सभेला येणार्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही पोलीस प्रशासनाने जाहीर करून त्या पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण पंतप्रधानांच्या दौर्यासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे.
शहरातील वाहतुकीत बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेला मार्ग कंसात पर्यायी मार्ग – मार्केट चौकी ते पार्क चौक (पंचकट्टा, एसबीआय बॅक ते पुनम गेट, रंगभवन चौक मार्गे पुढे पुनम गेट, ट्रेझरी गेट, पंचकट्टा ते दत्त चौक /विजापूरवेस).
विधता बंगला ते पार्कचौक ( महानगर पालिका पाठीमागील रोड कडून शुभराय आर्ट गॅलरी, रामलाल चौक, मार्गे पुढे). शुभराय आर्ट गॅलरी ते पार्क चौक – (रामलाल चौक, शुभराय आर्ट गॅलरी, महानगर पालिका पाठीमागील रोड ते नवल पेट्रोलपंप कडुन पुढे).
शिवाजी चौक ते नवीवेस चौकी – ( शिवाजी चौक- नवी पेठ- पारस इस्टेट-लकी चौक- दत्त चौक- लक्ष्मी मार्केट- पंचकट्टा पुढे शिवाजी चौक- दिलखुश कॉर्नर-काळी मशीद- शिंदे चौक- राजवाडे चौक- दत्त चौक ते माणिक चौक पंचकट्टाकडे).
सोबत पिशव्या आणू नका
संसदीय लोकशाही प्रणालीत पंतप्रधान हे भारत सरकारचे अतिमहत्वाची व्यक्ती आहे. मोदीं यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने नागरिकांनी सभेच्या ठिकाणी येताना काडीची पेटी, व इतर ज्वालाग्रही पदार्थ, पाण्याची बाटली, पिशवी, लेडीज पर्स अशा कोणत्याही वस्तू सोबत घेवून येवू नयेत. अशा वस्तू सोबत आणणार्या नागरिकांना सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. यांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तायातर्फे करण्यात आले आहे.
रस्ते झाले चकाचक
विमानतळापासून ते पार्क मैदानापर्यंतच्या सर्व शासकीय भिंतीची रंगरगोटी करण्यात आली असून त्यावर विविध संदेश देणारी, विविध योजनांची माहिती सांगणारी आणि जनतेचे प्रबोधन करणारी चित्रे विविध कलाकारांनी साकारलेली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असून रस्त्यावरील दुभाजकांमधील वाळलेली झाडे काढणे, गवत काढणे, दुभाजकांना रंगरंगोटी करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच विमानतळ ते पार्क मैदान हा रस्ता अतिशय चकाचक करण्यात आला आहे. शासकीय कार्यक्रम असल्याने आणि विविध योजनांचे उद्घाटन, भूमीपूजन असेही कार्यक्रम असल्याने त्याची सर्व जय्यत तयारी झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून शासकीय यंत्रणेकडे आलेल्या नियोजनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुमारे ८५ मिनिटे सोलापुरात असतील. त्यानुसार सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे १०.३० नंतर मोदी यांचे विमान येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोदींच्या हस्ते आज सहा विकास कामांचे भूमिपूजन
पार्क चौक परिसरात एलईडी स्क्रिनची सोय; मोबाईल सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित राहणार
सोलापूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी दि. ९ जानेवारी रोजी सोलापुरच्या दौर्यावर येत असून, प्रशासनाच्यावतीने तयारी सुरु आहे. मोदींच्या दौर्यात ६ विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार्क स्टेडियम सोलापूर येथे होणार आहे, मोदी एकूण ८५ मिनिट सोलापुर शहरात असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
मोदी यांच्यासोबत राज्यपाल के.विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्री हरजितसिंग पुरी सोलापुरच्या दौर्यावर येणार आहेत. तसेच ही शासकीय कार्यक्रम असल्याने केंद्रीय आणि राज्यातील विविध वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली.
९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहुन सोलापूर विमानतळावर आगमन होतील. त्यानंतर पार्क स्टेडियम येथे इलेट्रिक कळ दाबून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सहा विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर उपस्थित लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी सोलापूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने बिदरकडे रवाना होतील, अशी माहिती डॉ.भोसले यांनी दिली.
या दौर्यात उजनी ते सोलापूर या ३६० कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणार्या समांतर जलवाहिनीचे भूमिपूजन, स्मार्ट सिटीतील एबीडी एरियातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन सुविधा १९० कोटीच्या कामाचे भूमिपूजन, हद्दवाढ भागात मनपाच्यावतीने करण्यात येणार्या अमृत योजनेअंतर्गत १८० कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, मनपाच्यावतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एस.टी.पी प्रकल्पाचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतून नियोजित ३० हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन, सोलापूर धाराशिव या चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते होणार असल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले. सभेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय एसपीजी स्पेशल पोलीस ग्रार्ड ची २५ टिम सोलापूरात दाखल झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना एसपीजी टिमनी संबंधित विभागांना सूचना दिल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले.
मोदींच्या हस्ते आज सोलापूर-तुळजापूर-धाराशिव
५८ कि.मी. चौपदरीकरण महामार्गाचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय महामार्ग-२११ (नवा राष्ट्रीय महामार्ग-५२) वरच्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ५८ किलोमीटर लांबीच्या चौपदरी रस्त्याचे उद्या सोलापूरमधे लोकार्पण करणार आहेत. ९८.७१७ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाच्या विस्तृत प्रकल्पाचा हा एक भाग आहे. सोलापूर-येदाशी दरम्यानच्या या कामासाठी ९७२.५० कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या असणार्या मराठवाडा या विभागाशी सोलापूर शहराचे दळण-वळण वाढण्यासाठी मदत होणार आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते.
उद्या लोकार्पण होणार्या या चौपदरी रस्त्यावरचे दोन मोठे तर १७ छोटे पूल, वाहनांसाठी चार तर पादचार्यांसाठी १० अंडरपास, तुळजापूरजवळ ३.४ किलोमीटरचा बायपास यामुळे सोलापूर शहरातली वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
३१ मार्च २०१४ रोजी देशात ९१,२८७ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. सध्या यात वाढ होऊन १,३१,३२६ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याशिवाय ५३,०३१ किलोमीटर लांबीचे राज्यमार्गांना नवे राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. देशातल्या राष्ट्रीय महामार्गांची लांबी २ लाख किलोमीटरपर्यंत नेण्याचे उदिृष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात जलद गतीने राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहेत. २०१०-११ ते २०१३-१४ या काळात केवळ १६,५०५ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले तर विद्यमान सरकारने २०१४-१५ ते २०१७-१८ या काळात २८,५३१ किलोमीटरपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत. या वर्षात ९,८२९ किमीची यात भर घालण्यात आली आहे. महत्वाकांक्षी भारतमाला परियोजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातल्या रस्ते वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देत आहे. यासाठी पायाभूत त्रुटी दूर करण्यात येत आहे. दिल्ली भोवतालचा वर्तुळाकार एक्स्प्रेस वे, वाराणसी बाबतपूर एक्स्प्रेस वे, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे यासारख्या जागतिक दर्जाच्या महामार्गांचे बांधकाम या सरकारने पूर्ण केले आहे. राजस्थानच्या मागासभागातून, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून जाणारा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे , नागपूर-हैद्राबाद-बंगलोर एक्स्प्रेस वे, बंगलोर-चेन्नई एक्स्प्रेस वे यासारखे महामार्गही बांधण्यात येत आहेत. देशभरात वाहतूक कोंडी होणारी १९१ ठिकाणं शोधून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. अशा प्रकारचे १३ प्रकल्प पूर्ण झाले असून ८० प्रकल्पांचे काम सुरु आहे. नागपूर, मुंबई, बेंगलुरु, चेन्नई, सुरत, संग्रुर आणि गुवाहाटी इथल्या मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क बांधणीसाठी तपशीलवार प्रकल्प अहवालही तयार करण्यात येत आहे.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय, सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय, सोलापूर (404 of 2228 articles)

Sansad Bhavan Modi
शिक्षण संस्थांमध्येही असेल आरक्षण ►घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, नवी दिल्ली, ८ जानेवारी - आरक्षणाच्या विद्यमान व्यवस्थेत येत नसलेल्या सर्व जाति-धर्माच्या ...

×