ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पाक सीमेवर भारताचे पूर्ण वर्चस्व

पाक सीमेवर भारताचे पूर्ण वर्चस्व

लष्करप्रमुख रावत यांचा दावा,
नवी दिल्ली, १५ जानेवारी –

Bipin Rawat

Bipin Rawat

जम्मू-काश्मिरातील सीमेवर आपल्या जवानांनी पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले असून, घुसखोरी करण्याचा प्रत्येक डाव उधळला जात आहे. गेल्या वर्षभरात ३२५ पेक्षा जास्त अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे, असा दावा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केला.
सीमेवर सुरू असलेल्या आपल्या नापाक कारवाया त्वरित थांबवा, अन्यथा कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही मुळीच मागेपुढे पाहणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला.
मंगळवारी लष्करी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लष्करी अधिकारी व जवानांना संबोधित करताना जनरल रावत बोलत होते.
काश्मीर खोर्‍यातील युवकांना दहतशवादाकडे ढकलण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रतत्न करीत असतो. राज्यातील नागरिकांना त्रास व्हावा, असे आम्हाला मुळीच वाटत नाही, पण पाकिस्तान त्यांच्या नापाक कृत्यातून काश्मीर खोरे पेटविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. हा देश अतिरेक्यांचा पुरस्कर्ता आहे, ही सत्यता आता जगाला कळून चुकली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीन सीमेवर सलोख्याचे वातावरण
चीनला जोडणार्‍या सीमेवर सलोख्याचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपापल्या सैन्यांकरिता नवे मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. या सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांचे जवान सतत प्रयत्नरत असतात. असे असले तरी, आमचे जवान स्थितीचा वारंवार आढावा घेत असतात. सीमांचे रक्षण करताना आम्ही कुठलीही तडजोड कधीच केली नाही आणि करणारही नाही. या संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
ईशान्य सीमांवर शांतता
ईशान्य राज्यांमधील सीमांवर शांतता आहे. बंडखोरांच्या कारवाया मोडून काढण्यासाठी आमचे जवान सातत्याने मोहीम राबवत असतात, असे सांगताना त्यांनी लष्करी जवान व अधिकार्‍यांना सोशल मीडियाचा वापर करताना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
नौदल, हवाई दलाशी समन्वर
यावेळी जनरल रावत यांनी नौदल आणि हवाई दलाशी योग्य समन्वय राखण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. देशाच्या या तिन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय प्रस्थापित झाल्यास कोणतेही युद्ध जिंकणे सहज शक्य होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या लष्करी दिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी सर्व जवानांना लष्करी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशसेवेविषयी असलेल्या जवानांच्या ठाम निर्धारावर देशवासीयांना गर्व आहे. मी त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो, असे ट्विट पंतप्रधानांनी केले.

Posted by : | on : 16 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (559 of 2399 articles)

India Us Flag
मनुष्यबळाची वानवा, बंगळुरू, १५ जानेवारी - अमेरिकेतील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल कर्मचार्‍यांची संख्या मर्यादित झाल्याने तेथील बाजारपेठेवर अधिपत्य मिळवण्यासाठी ...

×