ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » पाच लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न असणर्‍यांनाच लाभ : गोयल

पाच लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न असणर्‍यांनाच लाभ : गोयल

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Piyush Goyal S

Piyush Goyal S

कार्यवाहक अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी ५ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केल्यानंतर देशातील सर्वसामान्य जनतेत आनंदाची लाट आली होती. ५ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकही खुश झाले होते; मात्र या निर्णयामागची वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्यांची स्थिती ‘कभी खुशी कभी गम’ सारखी झाली होती. सर्व प्रकारच्या करसवलती धरून पाच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांनाच याचा फायदा मिळणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
करांच्या रचनेत (टॅक्स स्लॅब) गोयल यांनी बदल केला असल्याचा जनतेचा समज झाला होता; मात्र आपण करांच्या रचनेत कोणताच बदल केला नाही. सर्व प्रकारच्या करसवलती वगळूनही ज्यांचे उत्पन्न पाच लाखाच्या वर आहे, त्यांना विद्यमान कर रचनेप्रमाणेच कर भरावा लागेल, असे गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले. हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे यात मोठे बदल करता येत नव्हते. जुलै महिन्यात मांडण्यात येणार्‍या नियमित अर्थसंकल्पात कर प्रस्ताव राहणार आहेत. करांच्या विद्यमान प्रणालीत मी कोणतेच बदल केले नाही. करांचे दर आणि त्यांच्या मर्यादा नियमित अर्थसंकल्पात निश्‍चित केले जातील, याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले की, जनतेचा आशीर्वाद असाच कायम राहिला तर २०१९ चा नियमित अर्थसंकल्पही मोदी सरकारच सादर करेल.
५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण देताना गोयल म्हणाले की, देशातील कनिष्ठ मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मोदी या वर्गाचा नियो मिडल क्लास म्हणून उल्लेख करतात, या लोकांना आता कर सवलत दिली गेली नसती तर जुन्या दराने त्यांच्या वेतनातून करांची कपात झाली असती आणि नंतर कर सवलत मिळाल्यावर आधी भरलेला अतिरिक्त कर परत मिळवण्यासाठी त्यांना आयकर कार्यालयाकडे रिफंडचा अर्ज करावा लागला असता. या वर्गाची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशातील ३ कोटीपेक्षा जास्त संख्येतील वर्गाला मिळणार आहे. ज्यांचे करपात्र उत्पन्न ५ लाखापयर्र्त आहे, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
आपला मुद्दा स्पष्ट करताना गोयल म्हणाले की, उदाहरणार्थ ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न साडेसहा लाख आहे. दीड लाख रुपयांच्या वेगवेगळ्या करसवलती वजा केल्यानंतर ज्यांचे उत्पन्न पाच लाखावर येते, अशांनाच याचा फायदा मिळणार आहे. याच्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार्‍यांना सध्याच्या दराप्रमाणेच आयकर भरावा लागणार आहे.

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (85 of 2024 articles)

Bjp Flag
दिल्ली, १ फेब्रुवारी - भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अबकी बार मोदी सरकार घोषणा देत ...

×