ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » पाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ

पाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ

गळती ठरते या कंपनीसाठी घातक,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० ऑगस्ट –

Infosys

Infosys

जून तिमाहीमध्ये इन्फोसिसच्या कामगिरीत झालेली घसरण कंपनीसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. मात्र, आगामी काळात या कंपनीला यापेक्षा मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
१८ वर्षांपासून इन्फोसिसमध्ये कार्यरत रंगनाथ गेल्या तीन वर्षांपासून मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून पदावर होते. ते आता १६ नोव्हेंबरपर्यंतच इन्फोसिसध्ये असतील. त्यामुळे मुख्य वित्तीय अधिकार्‍याचा तातडीने शोध घेतला जात आहे, असे भारतातील या दुसर्‍या क्रमांकाच्या आयटी कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. याचाच अर्थ बंगळुरू येथील ही कंपनी पाच वर्षांपेक्षाही कमी काळात चौथ्या मुख्य वित्तीय अधिकार्‍याचा शोध घेत आहे. यामुळे विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मोठे सौदे आणि ग्राहकांसोबत केले जाणारे एकूण करार मूल्य (टीसीव्ही) काही संघर्ष वगळता सुरळीत होत असताना रंगनाथ यांचा राजीनामा हा इन्फोसिस व्यवस्थापनासाठी आश्‍चर्याचा धक्का देणारा ठरला, असे मत काही विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे.
या संघर्षाचा परिणाम इन्फोसिसच्या जूनमधील तिमाहीवर झाला. मार्च तिमाहीत १६.६ टक्के कामगिरी करणार्‍या करणार्‍या इन्फोसिसची टक्केवारी जून तिमाहीत १६.६ इतक्या धोकादायक पातळीवर आली. इन्फोसिसमधून ज्येष्ठ अधिकार्‍यांची बाहेर पडण्याची मालिका सुरूच आहे. मागील तिमाहीतही वरिष्ठ अधिकारी कंपनीबाहेर पडले. हा प्रकार कंपनीसाठी त्रासदायक आहे, असे मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने सांगितले.
मागीत जूनमध्ये ७५ कोटी डॉलर्सचा व्यवसाय करणार्‍या हेल्थकेअर अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेसच्या कार्यकारी उपाध्यक्ष संगीता सिंह आणि उत्पादन विभागाचे जागतिक प्रमुख आणि उपाध्यक्ष नीतेश बंगा यांनीदेखील इन्फोसिसला रामराम ठोकला. जानेवारीमध्ये इन्फोसिसचे अध्यक्ष राजेश कृष्णमूर्ती यांनीही कंपनी सोडत, सीएमए सीजीएम समूहात वरिष्ठ उपाध्यक्षपदी रुजू झाले. चांगली कामगिरी करू न शकणार्‍या अधिकार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या धोरणामुळे इन्फोसिसमध्ये हा संघर्ष निर्माण झाला आहे, असे कोटक सिक्युरिटीजने स्पष्ट केले आहे. यामुळे कंपनीची शक्ती क्षीण झाली आहे. नव्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना वारशामध्ये एक दुबळे नेतृत्व प्राप्त झाले, असून यात बदल करणे आता आवश्यक झाले आहे. इन्फोसिसला आता नेतृत्व करणार्‍या हुद्यांमध्ये स्थैर्य आणावे लागेल. रंगनाथ, संगीता सिंह, नीतेश बंगा यांनी बाहेर पडणे हे कंपनीसाठी चांगले लक्षण नाही, असेही कोटक सिक्युरिटीजने स्पष्ट केले.
रंगनाथ मागील तीन वर्षांपासून इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी होते. त्यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये राजीव बन्सल यांची जागा घेतली होती. रंगनाथ यांच्या कार्यकाळात इन्फोसिसच्या कामगिरीत सातत्य होते.

Posted by : | on : 21 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (997 of 2060 articles)

Atal Bihari Vajpayee Asthi Visrajan At Haridwar
शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार, १९ ऑगस्ट - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी आज रविवारी हरिद्वारमधील ...

×