ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुन्हा तारीख! अयोध्या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारी

पुन्हा तारीख! अयोध्या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारी

►नवे घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय
►न्या. उदय ललित यांची माघार,
नवी दिल्ली, १० जानेवारी –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीवरील मालकी हक्काच्या मुद्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील आज गुरुवारी पुन्हा नवीन तारीख दिली आहे. पाच सदस्यीय घटनापीठाचा भाग असलेले न्या. उदय ललित यांनी माघार घेतल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नवीन घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या नव्या घटनापीठापुढे आता २९ जानेवारीला या प्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे.
आज सकाळी सुनावणी होताच मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी, न्या. ललित यांच्या घटनापीठातील समावेशावर आक्षेप घेतला. १९९४ मध्ये ते वकील या नात्याने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यावतीने न्यायालयात हजर झाले होते. त्यामुळे त्यांचा घटनापीठातील सहभाग आक्षेपार्ह आहे. तथापि, त्यांनी यातून माघार घ्यावी, अशी माझी मुळीच मागणी नाही, असे ते म्हणाले. त्यांची ही भूमिका न्यायालयाने नोंदवून घेतली. यावेळी धवन यांनी, यापूर्वीच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी हे प्रकरण तीन सदस्यीय न्यायासनापुढे सुनावणीसाठी ठेवण्याचे निश्‍चित केले होते आणि नंतर त्यांनी अचानक पाच सदस्यीय घटनापीठ गठित केले, याकडेही लक्ष वेधले. पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यासाठी न्यायालयीन आदेश जारी करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा हवाला दिला आणि पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करणे नियमाच्या विरोधात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील सत्यता आणि एकूण स्थिती पाहू जाता घटनापीठाचे गठन योग्य निर्णय असल्याचे ते म्हणाले.
उत्तरप्रदेश सरकारचे वकील हरीश साळवे यांनीही, न्या. ललित यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही, असे स्पष्ट केले. तथापि, न्या. उदल ललित यांनी, आपण या घटनापीठावरून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एकूणच स्थिती लक्षात घेऊन सरन्यायाधीशांनी नव्याने घटनापीठाचे गठन करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकरणावरील सुनावणी आता २९ जानेवारीला होणार असल्याचेही स्पष्ट केले.
नेमके काय झाले सरन्यायाधीशांच्या कक्षात
सुनावणी सुरू होताच, सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी या खंडपीठातील एक न्यायमूर्ती उदय ललित हे बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यासाठी वकील म्हणून हजर राहिल्याची आठवण करून दिली. धवन यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर थोडा वेळ पाचही न्यायमूर्तींमध्ये कुजबूज झाली, त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगाई म्हणाले की, न्या. उदय ललित स्वत: या घटनापीठातून बाजूला होऊ इच्छितात. एखाद्या महत्त्वाच्या खटल्यातून न्यायमूर्तींनी अशा पद्धतीने स्वत:ला ऐनवेळी बाजूला करण्याची ही घटना तशी दुर्मिळच आहे.
काय होते प्रकरण?
बाबरी मशीद विध्वंसाशी संबंधित असलम भुरे प्रकणात उदय ललित तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या बाजूने लढले होते. असलम भुरे हा बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारा पहिला याचिकाकर्ता होता. कल्याणसिंह यांच्यावर न्यायालयाची अवमानना केल्याचा आरोप होता. कल्याणसिंह यांना राष्ट्रीय एकता समितीच्या बैठकीत दिलेल्या वचनांशी एकनिष्ठ राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बाबरी विध्वंसाआधीच दिला होता. बाबरी मशिदीचे संपूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी उत्तरप्रदेश सरकारचीच असेल, हे महत्त्वाचे वचन त्यांनी दिले होते.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (410 of 2234 articles)

Alokkumar Verma
निवड समितीचा निर्णय ►राजेश्‍वर राव पुन्हा अंतरिम प्रमुख, नवी दिल्ली, १० जानेवारी - एका महत्त्वपूर्ण घडामोडीत सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा ...

×