ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुरावे दिल्यास पोलिस आयुक्तांना अद्दल घडवू

पुरावे दिल्यास पोलिस आयुक्तांना अद्दल घडवू

•सर्वोच्च न्यायालयाचे आश्‍वासन
•ममता विरुद्ध सीबीआय वादावर आज सुनावणी,
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी –

Supreme Court 2

Supreme Court 2

कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांनी शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित पुरावे नष्ट केले असल्याचे पुरावे सादर केल्यास, त्यांना जन्मभराचा पश्‍चाताप होईल, इतकी कठोर कारवाई आम्ही करू, अशी ग्वाही सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी दिली.
राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकार्‍यांना अटक करण्याच्या बंगाल पोलिसांच्या कृत्याला सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. बंगाल पोलिस आणि सीबीआयची भूमिका ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने, उद्या मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करण्याचे निश्‍चित केले.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयच्यावतीने आज दोन याचिका दाखल केल्या आहेत. यातील पहिल्या याचिकेत सीबीआयने, कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांना तातडीने शरण येण्याचा आणि पुरावे नष्ट न करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, तर दुसर्‍या याचिकेत, सीबीआय अधिकार्‍यांना अटक करण्याची कृती न्यायालयाचा अवमान करणारी असल्याने, बंगाल पोलिसांवर अवमाननेचा खटला भरण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
सीबीआयचे काही अधिकारी राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेले असता, त्यातील काही अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धरणे आंदोलनावर बसल्या असता, राज्य पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारीही राजकीय नेत्यांसोबत आंदोलनावर बसले आहेत. ही स्थिती अभूतपूर्व अशीच आहे. वर्दीतल्या अधिकार्‍यांनी राजकीय नेतृत्वासोबत धरणे आंदोलन करणे ही स्थिती सामान्य नाही, याची गंभीर दखल घ्यायलाच हवी. कोलकाता पोलिस प्रमुखांनी चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केले आहेत. सीबीआय जी काही कारवाई करीत आहे, ती सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार असतानाही, सीबीआयच्या चौकशीत अडथळा आणणे आणि तपास अधिकार्‍यांना अटक करणे हा न्यायालयाचाही अवमान आहे, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला.
बंगाल पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी किंवा इतर कुणी या घोटाळ्यातील पुरावे नष्ट करीत आहेत, याबाबतचे पुरावे तुम्ही उद्या शपथपत्राच्या माध्यमातून आमच्याकडे सादर करा, असे न्यायालयाने सांगितले. यावर तुषार मेहता म्हणाले की, मी केवळ एकाच घटनेकडे न्यायालयाचे लक्ष वेधत नाही. ही स्थिती असामान्य आहे. एकीकडे पुरावे नष्ट केले जात आहे आणि दुसरीकडे सीबीआय अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. इतकेच नव्हे, तर सीबीआयच्या कार्यालयावर ताबा घेऊन, या तपास संस्थेचे संयुक्त संचालक पंकज श्रीवास्तव यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण रात्रभर हा गोंधळ सुरू होता. आमच्या घराला पोलिसांनी वेढा घातला असून, घरातील सदस्यांनाही ओलिस ठेवले आहे, याची माहिती श्रीवास्तव यांनी टेली-कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना दिली. तेव्हा, आज सकाळची स्थिती काय आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, आमच्या सर्व अधिकार्‍यांची मुक्तता करण्यात आली, असे मेहता यांनी सांगितले.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. राजीव कुमार यांनी, एसआयटीचे प्रमुख म्हणून चिटफंड घोटाळ्याचा तपास करताना आरोपींचा बचाव केला असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयने कुमार यांना अनेकदा समन्स पाठविला, पण एकाही समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, याकडे तुषार मेहता यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, पोलिस आयुक्तांनी पुराव्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला आणि ही बाब सिद्ध झाली तर, त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अवमान याचिकाही विचारात घेतली आहे आणि म्हणूनच आम्ही यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला. यावेळी बंगाल सरकारचे वकील आणि काँगे्रसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने तो धुडकावून लावला.

Posted by : | on : 5 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (440 of 2399 articles)

Home Ministery
संकेत, नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी - कोलकाता पोलिस आयुक्तांची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकार्‍यांच्या कामात अडथळा आणणार्‍या कोलकाता पोलिस अधिकार्‍यांची ...

×