ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार

•जैशचे अन्य दोन अतिरेकीही ठार,
श्रीनगर, ११ मार्च –

Pulwama Brain Behind Attack Mudasir Ahmad Khan

Pulwama Brain Behind Attack Mudasir Ahmad Khan

पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यासाठी वाहन आणि आरडीएक्सची व्यवस्था करणारा आणि या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेल्या मुदासिर अहमद उर्फ मोहम्मद भाईचा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज सोमवारी दक्षिण काश्मीरच्या त्राल येथील भीषण चकमकीत खातमा केला. त्याच्यासोबत जैश-ए-मोहम्मदचे आणखी दोन अतिरेकीही ठार झाले. मुदासिर हा जैशचा दुसर्‍या फळीतील कमांडर होता.
त्रालच्या पिंगलिश भागात रविवारी सायंकाळी काही अतिरेकी आले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. लगेच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी या भागाला वेढा दिला होता. सायंकाळच्या सुमारास अतिरेकी आणि जवानांमध्ये गोळीबार झाल्यानंतर अंधार पडल्याने, नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोळीबार थांबविण्यात आला होता. आज सकाळी पुन्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. यात मुदासिर आणि त्याचे दोन साथीदार झाले, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
एका पडक्या घरात हे अतिरेकी लपले होते. घरात कोणीही नागरिक नाही, याची खात्री केल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी बॉम्बचाही वापर केला. गोळीबार आणि बॉम्बच्या स्फोटामुळे अतिरेकी पूर्णपणे भाजल्या गेले असून, त्यांची ओळख पटण्याच्या पलीकडे गेली आहे. तथापि, घटनास्थळी सापडलेल्या काही दस्तावेजांवरून मुदासिरची ओळख पटविणे शक्य झाले असल्याचे प्रवक्ता म्हणाला.
त्रालच्या मीर मोहल्ला येथे राहणारा आणि पदवीधर असलेल्या मुदासिरने इलेक्ट्रिशियनचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. काही वर्षे तो जैशचा भूमिगत सदस्य म्हणून कार्यरत होता. त्यानंतर नूर मोहम्मद तंत्री असे नाव असलेल्या अतिरेक्याने त्याला आपल्या संघटनेत आणले आणि सक्रिय केले होते. पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यासाठी मुदासिरनेच गाडी आणि आरडीएक्सची व्यवस्था केली होती, तसेच या हल्ल्याच्या कटातही तो सहभागी होता. डिसेंबर २०१७ मधील चकमकीत तंत्रीचा खातमा करण्यात आल्यानंतर मुदासिर १४ जानेवारी २०१८ रोजी घरातून पळून गेला होता. अखेर त्याचा खातमा करण्यात जवानांना यश आले.
पुलवामा हल्ल्यानंतर १८ अतिरेक्यांना मारले
पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अतिरेक्यांविरोधात अतिशय प्रखर मोहीम उघडली असून, या २१ दिवसांच्या काळात आमच्या जवानांनी १८ अतिरेक्यांना यमसदनी धाडले आहे, अशी माहिती लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे कमांडर के. जे. एस. धिल्लाँ यांनी आज सोमवारी दिली.
पुलवामा हल्ल्यात आमचे ४० जवान शहीद झाले. त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. काश्मीर खोर्‍यातील प्रत्येक अतिरेक्याला ठार मारण्याचा आमचा निर्धार आहे. मागील २१ दिवसांच्या काळात जे १८ अतिरेकी मारले गेले, त्यातील आठ अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक आहेत, असे त्यांनी सांगितले.
आजच्या कारवाईत पुलवामाचा सूत्रधार मुदासिर अहमदचा खातमा करण्यात आला. त्याने भारतातील अनेक हल्ल्यांचे कट रचले होते, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (53 of 2216 articles)

Air Strike On Pakistan
आली सत्य माहिती, नवी दिल्ली, ११ मार्च - पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथेल ...

×