ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुलवामा हल्ल्याची माहिती होती

पुलवामा हल्ल्याची माहिती होती

•जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा,
नवी दिल्ली, ९ एप्रिल –

Nia National Investigation Agency

Nia National Investigation Agency

संयुक्त अरब अमिरातने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याला काही दिवसांपूर्वी भारताकडे सोपवले होते. तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती, अशी माहिती त्याने दिली आहे.
निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) चौकशी करण्यात येत आहे. जैशच्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याचबरोबर खान हीच ती व्यक्ती आहे की ज्याने या हल्ल्याचे नेतृत्व करीत तो घडवून आणला होता, या माहितीलाही तांत्रेने दुजोरा दिला. आपल्या गुप्तचरांची माहिती आणि खालच्या स्तरावरील दहशतवाद्यांच्या चौकशीवरच तपास पथकांचा तपास निर्भर होता. निसार अहमद तांत्रेनी चौकशीदरम्यान दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
काश्मीर खोर्‍यात जैशच्या कार्यकर्त्यांवर तांत्रेचा प्रभाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकार्‍याने सांगितले असल्याचे एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे. खानने त्याला सोशल मीडिया अ‍ॅपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती दिली होती. खानने म्हटले होते की, फेब्रुवारीच्या मध्यात पुलवामात तो अनेक मोठे स्फोट घडवून आणणार आहे. त्याचबरोबर खानने तांत्रेकडून या हल्ल्यासाठी नियोजन आणि तो प्रत्यक्ष घडवून आणण्यासाठी मदत मागितली असल्याची माहिती तांत्रेने चौकशीदरम्यान दिली आहे. जैशचा निसार अहमद तांत्रे हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते, तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे याचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले होते आणि नंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले होते. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. याच आधारे त्याला अमिरातकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश ए मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोर्‍यात जम बसवायला मदत केली, असे मानले जाते. डिसेंबर २०१७ मध्ये एका चकमकीत नूरला ठार मारण्यात आले होते. लेथपोरा प्रकरणातच पुलवामा येथील अवंतीपुराचा रहिवासी असलेल्या फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवामाच्या द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. फेब्रुवारीमध्ये एनआयने अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश ए मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि माहिती उपलब्ध केली होती.

Posted by : | on : 10 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (74 of 2407 articles)

Bjp Manifesto Release
शेतकर्‍यांना, छोट्या व्यापार्‍यांना निवृत्तिवेतन, सर्वच शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार!, •भाजपाच्या संकल्पपत्राचे लोकार्पण, नवी दिल्ली, ८ एप्रिल - २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न ...

×