ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पोलिस आयुक्तांवर ‘ममता’ नाहीच, चौकशीचा सामना करा

पोलिस आयुक्तांवर ‘ममता’ नाहीच, चौकशीचा सामना करा

•मुख्यमंत्री बॅनर्जींना ‘सर्वोच्च’ झटका
•सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश,
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी –

Supreme Court 2

Supreme Court 2

कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची शारदा चिटफंड घोटाळ्यात चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकार्‍यांना अटक करणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडल्या. चौकशीचा सामना करण्यात त्यांना काय अडचण आहे. आम्ही त्यांच्या अटकेचे आदेश देणार नाही, पण त्यांना चौकशीचा सामना करावाच लागणार आहे, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिला.
पोलिस आयुक्त राजीव कुमार हे मेघालयातील शिलाँग येथे सीबीआयपुढे हजर होतील आणि चौकशीत आवश्यक ते सर्वच सहकार्य करतील. तपासाच्या काळात सीबीआय त्यांना अटक करणार नाही, तसेच अन्य कोणतीही कारवाई करणार नाही, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
न्यायालयाने यावेळी राजीव कुमार यांना नोटीस जारी करून, २० फेबु्रवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याच तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. राजीव कुमार चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करीत आहेत, तसेच या प्रकरणी गठित एसआयटीचे प्रमुख असताना त्यांनी सीबीआयला बोगस दस्तावेज दिले होते, असा आरोप सीबीआयने केला.
सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल म्हणाले की, एसआयटीने पुराव्यांसोबत छेडछाड केली आणि योग्य तपासही केला नाही. तर, बंगाल सरकारचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी, सीबीआयला कोलकाता पोलिसांना त्रास द्यायचा आहे, असा आरोप केला.
यावर न्यायालयाने, राजीव कुमार यांना चौकशीची काय अडचण आहे, पोलिस आयुक्त सीबीआयसमोर हजर का होत नाही? असा सवाल केला. पोलिस आयुक्तांनी तपासात सहकार्य करावे, असा आदेश देण्यात आम्हाला कोणतीच अडचण नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपविला, पण राजीव कुमार तपासात सहकार्य करायला तयार नाही, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. आम्हाला यातील आरोपींनी केलेल्या सर्व कॉल्सची माहिती हवी आहे, पण ती देखील मिळाली नाही आणि जे मिळाले, ते सर्व बोगस होते, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला.
अवमानना खटल्यावर नोटीस
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आम्ही कोलकाता पोलिस प्रमुखांविरोधात अवमानना खटला दाखल केला आहे, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने असे नमूद केले की, आम्ही आजच बंगालचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महासंचालक आणि कोलकात्याच्या पोलिस प्रमुखांना नोटीस पाठवत आहोत. १८ फेबु्रवारीपर्यंत त्यांना यावर आपले उत्तर सादर करायचे आहे. त्यांचे उत्तर तपासल्यानंतरच अवमानना खटल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत.
हा आमचाच विजय; मुजोरी कायम
कोलकाता : कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांना चौकशीचा सामना करावा लागेल, असा झटका देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, आपली मुजोरी कायम ठेवत, हा आमचाच विजय असल्याचे मत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
ममतांचे धरणे आंदोलन मागे
कोलकाता : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सायंकाळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरुद्धचे आपले धरणे आंदोलन आज मंगळवारी मागे घेतले. काही राजकीय पक्षांचे नेते ममतांच्या भेटीला आले आणि त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

Posted by : | on : 6 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (431 of 2399 articles)

Nitin Gadkari2
गडकरी यांचा राहुल गांधींना टोला, नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - माझ्यात किती हिंमत आहे आणि मी किती प्रामाणिक आहे, यासाठी ...

×