ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » बँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण

बँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण

मुंबई, ७ डिसेंबर –

Bank

Bank

संभाव्य धोक्यांचे पुनर्लोकन करूनच उद्योगांचे कर्जवाटप वाढवा, असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला असला, तरी बँका यासाठी अद्यापही उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) ही सरकारी रोख्यांमधील अशी रक्कम आहे ज्यात ठेवींच्या प्रमाणात बँका आपली गुंतवणूक निश्‍चित करू शकतात. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण २५ टक्क्यांवरून १९.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. मात्र, बँका अजूनही सरकारी रोख्यांमधील एकूण गुंतवणुकीच्या एक तृतीयांश इतकाच भाग राखून ठेवत आहेत.
कर्जाची वाढती मागणी पूर्ण करणे, तरलतेचे प्रमाण योग्य स्तरावर कायम ठेवणे आणि जोखिमेचे घटक कमी करणे यासह विविध उद्देशांमध्ये समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेल्या टप्प्याटप्प्यातील प्रक्रियेत एसएलआरचा दर पुन्हा १८ टक्क्यांपर्यंत आणण्यात येईल, असे आरबीआयने बुधवारीच स्पष्ट केले.
यंत्रणेतील तरलतेचे प्रमाण वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे आदेश दिलेले नाहीत, असे मत बँकर्सने व्यक्त केले आहे.
२०१९पासून येणार्‍या आर्थिक तणावात ठेवी काढून घेण्याचे प्रमाण वाढणार असतानाही वैधानिक तरलता प्रमाण रोखून बँकांची कार्यक्षमता वाढवण्याचा उद्देश नव्या धोरणामागे आहे, असेही बँकर्सने सांगितले. या नव्या धोरणामागे विशिष्ट कारण आहे, असे एचडीएफसी बँकेच्या भारतातील अर्थशास्त्री प्रांजल भंडारी यांनी सांगितले. १ जानेवारीपासून बँकांना एलसीआरचे प्रमाण १०० टक्के ठेवावे लागणार आहे. या एलसीआरमध्ये सरकारी रोख्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सरकारी रोख्यांची मागणी वाढेल आणि त्याची भरपाई करण्यासाठी एलसीआरचे प्रमाण कमी करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बँकांनी जर त्यांच्याकडील सरकारी रोख्यांचा साठा एलसीआरला पुरवण्यासाठी वापरला, तरी बँकांकडे एलसीआरचे प्रमाण अतिरिक्त राहील. त्यामुळे ते अतिरिक्त एलसीआरसाठी गुंतवणूक करू शकतील. दुसरीकडे सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीत जोखीमच नसते, असेही त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर २००९ पासून सरकारने एलसीआरचे प्रमाण ५.५ टक्क्यांनी कमी करून ते १९.५ टक्क्यांवर आणले आहे. त्याच काळात कर्जाची मागणी वाढली असताना बँकांची सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक जवळपास ३० टक्के होती. नोव्हेंबर २००९ मध्ये गुंतवणूक आणि ठेवींचे प्रमाण ३३ टक्के होते, त्यात आता केवळ दोन टक्क्याची घसरण होऊन ते आता ३१ टक्क्यांवर आले आहे. सरकारी रोखे सुरक्षित असून, त्यातील गुंतवणूक जोखीममुक्त असल्याने प्रत्यक्ष आणि परवानगी प्राप्त एसएलआरमधील तफावत फारशी राहणार नाही, असे इंडिया रेटिंग्जचे सहयोगी संचालक सौम्यजित नियोगी यांनी सांगितले.

Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (50 of 1901 articles)

Sambit Patra3
प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप, नवी दिल्ली, ६ डिसेंबर - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेलला भारतात आणल्यामुळे काँग्रेस ...

×