ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भाजपाने नेमलेल्या एसआयटीमुळे शिखांना न्याय

भाजपाने नेमलेल्या एसआयटीमुळे शिखांना न्याय

►दंगलीतील आरोपींच्या पाठीशी आहे कॉंग्रेस : रविशंकरप्रसाद,
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा होऊ नये तसेच शीख समाजाला न्याय मिळू नये म्हणून कॉंग्रेसने योजनाबद्ध प्रयत्न केले, असा गंभीर आरोप भाजपाने आज केला. भाजपाने सत्तेवर आल्यानंतर या दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यामुळेच शीख विरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. भाजपामुळेच शीख समाजाला जवळपास ३५ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे, याकडे भाजपाने लक्ष वेधले.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकरप्रसाद यांनी शीखविरोधी दंगलीच्या मुद्यावरुन कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. १९८४ नंतर काही अपवाद वगळता कॉंग्रेस सत्तेवर होती, पण कॉंग्रेसने शीखविरोधी दंगलीची प्रामाणिकपणे चौकशीच होऊ दिली नाही. प्रत्येक वेळी या चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत रविशंकरप्रसाद म्हणाले की, चौकशी प्रामाणिकपणे झाली असती तर अनेक मोठमोठे कॉंग्रेस नेते यात अडकले असते. या मोठ्या नेत्यांना वाचवण्यासाठी कॉंग्रेसने या दंगलीच्या चौकशीत अडथळे आणले.
चौकशी रेंगाळत ठेवण्यासाठी कॉंग्रेसने चौकशी आयोग नेमण्याचे नाटक केले, पण त्यांना प्रामाणिकपणे चौकशी करू दिली नाही. ज्यावेळी एखाद्या आयोगाने सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चौकशी थांबवण्याचा इशारा देण्यात आला, असा आरोप करत प्रसाद म्हणाले की, चौकशीत कॉंग्रेसला सोयीस्कर भूमिका घेणार्‍या चौकशी आयोगाच्या प्रमुखांना त्याचे बक्षीसही नंतर देण्यात आले.
मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर नियुक्त केलेल्या विशेष चौकशी समितीमुळे या दंगलीची प्रमाणिकपणे चौकशी होऊ शकली. या दंगलीतील एका आरोपीला न्यायालयाने फाशीची, तर दुसर्‍याला जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळे शीख बांधवांच्या जखमेवर काही प्रमाणात मलमपट्‌टी झाली आहे. भाजपामुळेच हे होऊ शकले. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे प्रसाद म्हणाले.
वटवृक्ष कोसळतो तेव्हा जमिनीला हादरे बसतात, या शब्दात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी शीखविरोधी दंगलीचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते, असा आरोप करत रविशंकरप्रसाद म्हणाले की, राजीव गांधी यांच्या विधानापासून कॉंग्रेसने स्वत:ला आतापर्यंत दूर केले नाही. त्यामुळे राजीव गांधी यांच्या विधानाशी कॉंग्रेस पक्ष सहमत आहे का, हे त्याने जाहीर केले पाहिजे. १९८४ नंतर केंद्रात सातत्याने कॉंग्रेसचे सरकार होते, त्यामुळे शीख बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेवर असतांना आपण कोणते प्रयत्न केले, ते कॉंग्रेसने सांगितले पाहिजे, असे आव्हान देत प्रसाद महणाले की, कॉंग्रेसने शीखविरोधी दंगलीत महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या कमलनाथ यांना पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. मात्र एक आठवड्याच्या आतच त्यांची उचलबांगडी का करण्यात आली, ते कॉंग्रेसने सांगितले पाहिजे.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (113 of 1888 articles)

Rbi
बँक शिथिल करणार निकष, नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर - भांडवल संरक्षण प्रतिरोध (सीसीबी) निकष लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ...

×