ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » भारताला राफेल मिळू नये, म्हणून मिशेलने केले होते लॉबिंग

भारताला राफेल मिळू नये, म्हणून मिशेलने केले होते लॉबिंग

►अगस्तातील दलाल हॅशकेच्या घरातून मिळाली कागदपत्रे
►काँगे्रसला आणखी एक धक्का,
नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Christian Michel Sonia Gandhi Rahul

Christian Michel Sonia Gandhi Rahul

अगस्ता वेस्टलॅण्ड हलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात ३२५ कोटी रुपयांची दलाली घेणार्‍या ख्रिश्‍चियन मिशेलने, राफेलसारखी अत्याधुनिक विमाने भारताला मिळायला नको, यासाठी जोरदार लॉबिंग केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यातील आणखी एक दलाल असलेला इटलीचा नागरिक गुईडो हॅशकेच्या घराची तेथील तपास यंत्रणांनी झडती घेतल्यानंतर, मिशेलच्या या लॉबिंगचा पर्दाफाश झाला आहे. अगस्ताप्रमाणे राफेल व्यवहारातही इटली कनेक्शन समोर आल्याने काँगे्रसची विशेषत: गांधी घराण्याची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
मिशेलने राफेलऐवजी युरोफायटर टायफून या विमानांची भारताने निवड करावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. युरोफायटर विमानांसाठी त्याची पडद्याआड जोरदार लॉबिंग सुरू होती, असे हॅशकेच्या घरातील कागदपत्रांकडून स्पष्ट झाले असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी लोकसभेत राफेल मुद्यावरील चर्चेला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् सडेतोड उत्तर देत असताना, काँगे्रसचे सदस्य कागदी विमान उडवत होते. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, युरोफायटर विमानांच्या स्मरणार्थ ही विमाने उडवली जात असल्याचा टोमणा मारला होता. ऑगस्ट २००७ मध्ये भारत सरकारने १२६ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी विनंती निविदा जारी केल्या होत्या, त्यावेळी फ्रान्सच्या राफेल विमानांची अन्य पाच लढाऊ विमान कंपन्यांसोबत स्पर्धा होती. त्यानंतर स्पर्धेत असलेल्या अन्य लढाऊ विमानांचे कठोर मूल्यपान, परीक्षण केल्यानंतर दसाँचे राफेल आणि युरोफायटरचे टायफून ही दोन विमाने स्पर्धेत होती. त्यातून राफेलची निवड करण्यात आली होती.
या वृत्तानुसार, अगस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्याातील आरोपी ख्रिश्‍चिअन मिशेल आणि गुईडो हॅशके हे दोघेही तत्कालीन संपुआ सरकारमधील नेते आणि हवाई दल अधिकार्‍यांकडे लॉबिंगवर सातत्याने चर्चा करीत होते. मेंटेनन्स कमांडचे प्रमुख, एअर ऑफिसर मेंटेनन्स आणि चीफ ऑफ इंजिनीअरिंगकडे लॉबिंग करावे लागेल,
त्यांना कसेही करून पटवावे लागेल, असा निष्कर्ष या दोन दलालांच्या चर्चेतून समोर आला होता. हॅशके इटालियन उद्योजक असून, तोसुद्धा हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात आरोपी आहे. या प्रकरणी इटलीत त्याने शिक्षा भोगली असून, आता तो माफीचा साक्षीदार आहे. भारताच्या विनंतीवरून त्याच्या विरोधात जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीसही इंटरपोलने मागे घेतली आहे.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (430 of 2234 articles)

Akhilesh Yadav
दावा, नवी दिल्ली, ७ जानेवारी - २०१२-१३ या काळात उत्तरप्रदेशचे खनन मंत्रालय तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडेच होते. या काळात ...

×