ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » भारत अंतराळातही शक्तिमान

भारत अंतराळातही शक्तिमान

•उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी,
नवी दिल्ली, २७ मार्च –

Anti Satellite Missile A Sat Pm Modi

Anti Satellite Missile A Sat Pm Modi

भारताने अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रातही एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करत जगातील तीन महाशक्तींच्या रांगेत आज आपल्याला बसवले आहे. ‘मिशन शक्ती’अंतर्गत भारताने आज उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीची देशवासीयांना अतिशय अभिमानाने माहिती दिली.
अंतराळात ३०० किमी अंतरावर स्थापित एक जिवंत उपग्रह भारताने आज सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी आपल्या उपग्रहविरोधी प्रणालीचा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ए-सॅटचा वापर करत केवळ ३ मिनिटांत पाडला. याबाबतची घोषणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांसोबत केलेल्या उद्बोधनातून दिली.
काही वेळापूर्वी भारताने अभूतपूर्व अशी सिद्धी प्राप्त केली आहे. जगातील अंतराळ महाशक्ती म्हणून आपले नाव नोंदवले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकारची क्षमता जगात आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन महाशक्तींकडेच होती, त्या मालिकेत आता भारतही आला आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, भारताने केलेली चाचणी अतिशय दुर्मिळ आणि आव्हानात्मक होती.
अंतराळाच्या खालच्या टप्प्यातील जिवंत उपग्रह पाडण्याची क्षमता प्राप्त करणारा भारत जगातील चौथा देश आहे, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, आमची ही नवी उपलब्धी कोणाच्या विरोधात नाही, तर वेगाने विकसित होणार्‍या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशी आहे. शांती आणि सुरक्षेचे वातावरण तयार करण्यासाठी मजबूत भारताची निर्मिती व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने टाकलेले हे एक़ महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आमचा उद्देश शांतीचे वातावरण निर्माण करणे हे आहे, युद्धाचे वातावरण निर्माण करण्याचे नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, हे करताना आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले नाही. अंतराळातील अण्वस्त्रांच्या स्पर्धेविरुद्ध भारताने नेहमीच भूमिका घेतली आहे, आजही उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता भारताने यशस्वीपणे विकसित केल्यानंतरही भारताच्या या भूमिकेत कोणताच बदल झाला नाही. प्रत्येक देशाच्या विकासाच्या यात्रेत काही क्षण असे येतात, जे अतिशय गौरवास्पद असतात, तसेच त्यांचा येणार्‍या पिढीवरही परिणाम होत असतो, आजचा क्षण हा तसाच आहे, असे ते म्हणाले.
मिशन शक्ती हे अतिशय आव्हानात्मक ऑपरेशन होते. यात उच्च कोटीच्या तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती, याकडे लक्ष वेधत, जगात आम्हीही कोणापेक्षा कमी नाही, हे सिद्ध करून दाखवल्याबद्दल त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. जगात भारताचा गौरव वाढवणारी प्रणाली विकसित केल्याबद्दल, तसेच मेक इन इंडियाअंतर्गत निर्धारित वेळेत उद्दिष्ट गाठण्याची क्षमता प्राप्त केल्याबद्दल देशवासीयांना तुमचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम् या धारणेवर विश्‍वास ठेवणारा भारत संपूर्ण जगालाच आपले घर मानतो, असे ते म्हणाले.

सर्वच देश अंतराळातील शांतता कायम ठेवतील ः चीन
बीजिंग ः भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर हबकलेल्या चीनने, सर्वच देश अंतराळातील शांतता कायम ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सर्वच देश अंतराळातील शांतता कायम ठेवतील, अशी सावध प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केली. जानेवारी २००७ मध्ये चीनने हे सामर्थ्य प्राप्त केले आहे. भारताने ही चाचणी घेऊन कोणत्याही आंंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असेही मंत्रालयाने सांगितले.
राजकीय इच्छाशक्तीच नव्हती : माधवन् नायर
हैदराबाद – उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची क्षमता दशकभरापूर्वीच विकसित करण्यात आली होती. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सामर्थ्य जगासमोर आणणे शक्य झाले नाही, अशी टीका इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन् नायर यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली आहे.
चीनने हवामानाचा जुनाट उपग्रह पाडून २००७ मध्ये आपली शक्ती जगासमोर आणली होती. असेच अभियान राबवण्याचे तंत्रज्ञान त्यावेळीही भारताकडे होते. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नव्हती, असे त्यांनी सांगितले. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडस दाखवत पुढाकार घेतला आणि हे अत्यंत किचकट स्वरूपाचे तंत्रज्ञान भारताकडेही असल्याचे जगाला दाखवून दिले, अशी स्तुती त्यांनी केली. हे सामर्थ्य दाखविण्यास भारत २००७ मध्ये सक्षम होता का, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, निश्‍चितच हे तंत्रज्ञान भारताकडे होते. मात्र, त्यावेळी राजकीय निर्णय होऊ न शकल्याने त्याची चाचणी घेणे शक्य झाले नाही.
अंतराळात शस्त्रांची शर्यत नको : पाकिस्तान
इस्लामाबाद – ए-सॅट म्हणजे अ‍ॅण्टी सॅटेलाईट मिसाईलच्या यशस्वी चाचणीनंतर भारतात उत्साही वातावरण असताना पाकिस्तानने मात्र गरळ ओकली आहे. अंतराळाचा उपयोग शस्त्रांचा साठा करण्यासाठी केला जाऊ नये. अंतराळाचा उपयोग मनुष्याच्या भल्यासाठी केला गेला पाहिजे, सैन्य क्षमता वाढविण्यासाठी नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून पाकची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान बाहेरच्या स्पेसमध्ये शस्त्रांचा वापर केला जाऊ नये, या मताचा राहिलेला आहे. अंतराळ माणुसकीचा संयुक्त वारसा आहे आणि प्रत्येक देशाने आपली जबाबदारी ओळखून अंतराळात आपल्या सैन्याचा दबदबा वाढेल, अशा कामापासून अलिप्त राहिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय अंतराळ कायद्याला लक्षात घेऊन ही निश्‍चित करणे आवश्यक आहे की, कोणत्याही देशाने सामाजिक-आर्थिक विकासासाठी स्पेन टेक्नॉलॉजीचा वापर कोणाची शांतता भंग होईल, यासाठी करता कामा नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. याआधी ज्या देशांनी असा प्रयोग केला त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. आता हे देश स्पेसशी संबंधित लष्करी धोक्यांना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्तपणे काम करतील, अशी अपेक्षाही पाकिस्तानने व्यक्त केली आहे.
कोणत्याही देशाने अंतराळातील आपली क्षमता वाढल्याबाबत गर्व करू नये, कारण त्यात डॉन क्विक्सोटची झलक दिसून येते, ज्यांनी पवन चक्कीला विरोध केला होता, असा टोलाही पाकिस्तानने लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा करतानाच स्पष्ट केले आहे, आमचा कोणत्याही देशाला घाबरविण्याचा किंवा त्यांच्या विरोधा वापर करण्याचा कोणताही उद्देश नाही. तरीही पाकिस्तानने भारताच्या या यशावर आगपाखड केली आहे.

Posted by : | on : 28 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (150 of 2407 articles)

Mission Shakti A Sat
दिल्ली, २७ मार्च - भारतीय क्षेपणास्त्राने (ए-सॅट) पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेला सक्रिय उपग्रह पाडला. या मोहिमेला ‘शक्ती’ असे नाव ...

×