ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » ‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’

‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’

•भाजपाच्या राष्ट्रीय संकल्पपत्र अभियानाचा शुभारंभ
•अमित शाह, राजनाथसिंह यांनी दाखवली हिरवी झेंडी,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी –

Man Ki Baat Modi Ke Sath

Man Ki Baat Modi Ke Sath

लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या सहभागाने संंकल्पपत्र (जाहीरनामा) तयार करण्याच्या भाजपाच्या राष्ट्रीय अभियानाचा आज रविवारी राजधानी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री तसेच संकल्पपत्र समितीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
चाणक्यपुरी परिसरातील हॉटेल अशोकामध्ये झालेल्या ‘भारत के मन की बात मोदीजी के साथ’ या महिनाभर चालणार्‍या अभिनव स्वरुपातील संकल्पपत्र अभियानातील रथांना अमित शाह आणि राजनाथसिंह यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. देशभरातील १० कोटी मतदारांच्या आशाआकांक्षा समजून घेत भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवा भारत घडवणारा आपला जाहीरनामा तयार करणार आहे. लोकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या सूचना ऐकून जाहीरनामा तयार करणारा भाजपा हा देशातील ‘सबका साथ सबका विकास’चा पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे.
लोकशाही पद्धतीने होणार जाहीरनामा : अमित शाह
लोकशाही पद्धतीने आपला जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशाने भाजपाने ही पद्धत अवलंबली आहे, लोकांना कसा भारत हवा आहे, ही आम्ही यातून समजून घेणार आहोत, यातून भारतातील लोकशाही अधिक मजबूत होणार असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले.
लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी ३०० रथ देशभर फिरणार आहे. देशातील सर्व विधानसभा मतदारसंघात ७७०० सूचना पेट्याही ठेवण्यात येणार आहेत. भाजपाने संकल्पपत्र अभियानासाठी वेबसाईटही तयार केली आहे. याशिवाय व्हाट्सअ‍ॅप, मिस्डकॉल या मार्गानेही लोकांना भाजपाच्या संकल्पपत्रासाठी आपल्या सूचना करता येतील, असे अमित शाह म्हणाले.
लोकांकडून मिळणार्‍या सूचनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी राज्यस्तरावर २० कार्यकर्त्यांची चमू तयार करण्यात आली आहे. राज्यांकडून येणार्‍या अहवालांचा आढावा घेत भाजपाच्या संकल्पपत्राला अंतिम रूप देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ३० सदस्यांची समिती राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. देशाची वाटचाल निवडणुकीच्या दिशेने सुरू झाली आहे, देशाच्या विकासाची पुढील पाच वर्षांची दिशा यातून निश्‍चित केली जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
देशाला महाशक्ती करणार : राजनाथसिंह
देशाला महाशक्ती बनविण्याचा भाजपाचा हा प्रयत्न असल्याचे संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथसिंह यांनी सांगितले. जनतेच्या भावना समजून घेत संकल्पपत्र तयार करणे हे आमचे कर्तव्यच नाही, तर नैतिक जबाबदारीही आहे. देशातील बेरोजगार आणि शेतकर्‍यांसाठी आमच्या सरकारने खूप काही केले आहे, पण यावर आम्ही समाधानी नाही. खूप काही करायचे आणखी बाकी आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे जनतेला काय हवे, हे आम्ही जनतेपर्यंत जाऊनच समजून घेणार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, थावरचंद गहलोत, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, भाजपाचे महासचिव राम माधव, माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलुनी, सहप्रमुख संजय मयुख यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते.
१२ विषयांसाठी १२ समित्या
संकल्पपत्रासाठी कृषी, रोजगार, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा असे १२ विषय निश्‍चित करण्यात आले असून, प्रत्येक विषयासाठी संयोजक आणि सहसंयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध समित्यांचे प्रमुख :
कृषी – शिवराजसिंह चौहान
युवा – राजीव चंद्रशेखर
महिला व बाल कल्याण – स्मृती इराणी
अनुसूचित जाती/जमाती – थावरचंद गहलोत
अर्थव्यवस्था, उद्योग – अरुण जेटली
सुशासन – डॉ. हर्षवर्धन
पायाभूत सुविधा – हरदीप पुरी
मनुष्यबळ विकास – प्रकाश जावडेकर
राष्ट्रीय सुरक्षा – भुवनचंद्र खंडुरी
परराष्ट्र – डॉ. विनय सहस्रबुद्धे
गंगा, संस्कृती, राममंदिर – महेश शर्मा
रोजगार, श्रम – बंडारु दत्तात्रेय

Posted by : | on : 4 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (71 of 2024 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचे संकेत •राज्य सरकारेही योगदान देतील, न्यू यॉर्क, ३ फेब्रुवारी - शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी जाहीर ...

×