ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » मतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

मतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

►देशातील ४२ साहित्यिकांना सन्मान,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २२ जून –

Ratnakar Matkari

Ratnakar Matkari

साहित्य अकादमीचे २०१८ च्या पुरस्कारांची आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली असून, मराठी भाषेतून या पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली. विविध भाषांतील देशातील ४२ साहित्यिकांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण येत्या १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच बालकदिनी करण्यात येणार आहे.
बालसाहित्य आणि युवा साहित्य अशा दोन गटांत यंदा हे पुरस्कार देण्यात आले. यातील २१ पुरस्कार बालसाहित्यासाठी, तर २१ पुरस्कार युवा साहित्यासाठी आहेत. साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला मिळाला आहे, तर मराठी बालसाहित्याच्या पुरस्कारासाठी रत्नाकर मतकरी यांना यांची निवड करण्यात आली. देशातील २२ भाषांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पुरस्कार समितीने साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठेच्या या पुरस्कारांसाठी विजेत्यांच्या नावांची शिफारस केली होती. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. युवा पुरस्कारांमध्ये १० कविता संग्रह, ७ लघूकथा, तीन कादंबर्‍या आणि एका नाटकाचा समावेश आहे.
बालसाहित्य पुरस्कारांमध्ये रत्नाकर मतकरी (मराठी), जुगलोचन दास (आसामी), श्रीशेंदू मुखोपाध्याय (बंगाली), सीताराम बासुमतरी (बोडो), इस्टराइन किरे (इंग्रजी), चंद्रकांत शेठ (गुजराती), दिविक रमेश (हिंदी), कांच्यानी शरणप्पा शिवसंगप्पा (कन्नड), झरीफ अहमद झरीफ (काश्मिरी), कुमुद भिकू नाईक (कोंकणी), विद्यानाथ झा (मैथिली), पी. के. गोपी (मल्याळम्), खंगेम्बम शामूगोऊ (मणिपुरी), भीम प्रधान (नेपाळी), बिरेंद्र मोहंती (ओडिया), तारसेम (पंजाबी), सी. एल. शंखला (राजस्थानी), संपदानंद मिश्रा (संस्कृत), लक्ष्मीनारायण हंसदा (संताली), कल्पना अशोक चेल्लनी (सिंधी), कृंगाई सेतुपती (तमिळ), नरमशेट्टी उमामहेश्‍वर राव (तेलुगू), रईस सिद्दिकी (उर्दू) यांचा समावेश आहे. तर काव्यसंग्रहासाठीच्या युवा पुरस्कारांमध्ये समरग्नी बंडोपाध्याय (बंगाली), इशा दादावाला (गुजराती), आस्तिक वाजपेयी (हिंदी), विल्मा बंटवाल (कोंकणी), उमेश पासवान (मैथिली), तोंगब्राम अमरजित सिंग (मणिपुरी), जयद्रथ सुना (ओडिया), दुष्यंत जोशी (राजस्थानी), मुनी राजसुंदर विजय (संस्कृत), बाल सुधाकर मौली (तेलुगू) यांचा समावेश आहे.
लघुकथांसाठीचे पुरस्कार बिपाशा बोरा (आसामी), पद्मनाभ भट (कन्नड), धीबा नाझिर (काश्मिरी), छुडेन कबिमू (नेपाळी), राणी मुर्मू (संथाली), सनील कृष्णन् (तमिळ), शहनाज रेहमान (उर्दू) यांना मिळाले आहेत. कादंबरींसाठीचे पुरस्कार नवनाथ गोरे (मराठी), अमल (मल्याळम्), गुरप्रीत सेहजी (पंजाबी) यांना, तर नाटकासाठीचा पुरस्कार चंपा चेतनानी यांच्या सिंधी नाटकाला जाहीर करण्यात आला आहे.

Posted by : | on : 23 Jun 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1266 of 2053 articles)


पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी ►कारवाई करून दाखवावी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ जून - लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत अतिरेक्यांपेक्षा सर्वसामान्य जनता ...

×