ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » माजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास

माजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास

कोळसा घोटाळा प्रकरणी अटक व जामीन,
नवी दिल्ली, ५ डिसेंबर –

Coal Scam

Coal Scam

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने विकास मेटल्स अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकास पाटणी, आनंद मलिक यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, न्यायालयाने गुप्ता यांची जामिनावर सुटका केली आहे.
पश्‍चिम बंगालमधील उत्तर व दक्षिण भागातील मोईरा व मधुजोरे येथील कोळसा खाणींचे वाटप विकास मेटल्स अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीला करताना गैरप्रकार झाले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये याबाबत सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. पश्‍चिम बंगालमधील कोळसा खाण वाटप प्रकरणात माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह इतर पाच जणांना दिल्लीतील न्यायालयाने गेल्या आठवड्यात भ्रष्टाचार व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. या प्रकरणातील पाचही आरोपी जामिनावर बाहेर होते. मात्र, गेल्या आठवड्यात न्यायालयाने दोषी ठरवताच सर्वांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.
दोषींच्या शिक्षेबाबत न्यायालयात युक्तिवाद झाला. सीबीआयने दोषींना सात वर्षांची शिक्षा देण्याची विनंती केली. सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने बुधवारी एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षांचा तुरुंगवास, तर विकास मेटलच्या दोन अधिकार्‍यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच सध्या सेवेत असलेले माजी सहसचिव के. एस. क्रोफा व तत्कालीन संचालक के. सी. सामरिया या दोन अधिकार्‍यांनाही न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गुप्ता यांना याआधी कोळसा घोटाळ्यातील आणखी दोन प्रकरणांत दोषी ठरवण्यात आले होते. आता गुप्ता हे कोळसा घोटाळ्यातील एकूण तीन प्रकरणांमध्ये दोषी ठरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने कोळसा घोटाळ्याची सुनावणी करण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पाराशर यांची नेमणूक २५ जुलै २०१४ रोजी केली होती. १९ ऑगस्ट २०१६ रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गुन्हेगारी कट १२० बी, विश्‍वासघात कलम ४०९, फसवणूक ४२०, गुन्हेगारी गैरवर्तन कलम १३ (१)(सी), १३(१) (डी) अन्वये त्यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले होते.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (61 of 1905 articles)

Nsg Commandos Elit Surgicalistrike Unit
दिल्ली, ५ डिसेंबर - पाकिस्तानचे छुपे युद्ध संपण्याची शक्यता नजीक काळात नसल्याने केंद्र सरकार ‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापन करण्याचा ...

×