ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मावशींचे स्वप्न केंद्र सरकारने साकारले : सुषमा स्वराज

मावशींचे स्वप्न केंद्र सरकारने साकारले : सुषमा स्वराज

►शक्तिपीठातील नव्या स्मृतिशिल्पाचे लोकार्पण ,
नागपूर, २७ नोव्हेंबर –

Sushma Swaraj1

Sushma Swaraj1

महिला स्वावलंबन आणि सशक्तीकरणाची जी संकल्पना वंदनीय मावशी केळकर यांनी मांडली आणि आयुष्यभर त्यासाठी कार्य केले, त्याच आधारावर केंद्रातील मोदी सरकार कार्यरत असून, गेल्या साडेचार वर्षांत आम्ही मावशी केळकर यांची स्वप्नपूर्ती केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. त्या मंगळवारी सायंकाळी नागपुरात आयोजित, राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांच्या नूतनीकृत स्मृतिशिल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होत्या.
आपल्या भावपूर्ण संबोधनात स्वराज यांनी केंद्र सरकारने केलेले हे कार्य बघण्यासाठी आज मावशी असायला हव्या होत्या, असे मत व्यक्त केले. श्रीशक्तिपीठात साकारलेले हे शिल्प केवळ अद्भुत असून मावशींच्या सौम्य आणि अनुशासनाचा संगम असलेल्या व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यातून घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. बर्‍याच वर्षांनी नागपुरात आणि शक्तिपीठात तर प्रथमच आल्या असल्याचे सांगून महिलांच्या स्वालंबनाचे कार्य शक्तिपीठ खर्‍या अर्थाने ‘ऊर्जेचे केंद्र’ बनून पूर्णत्वाला नेत असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘उज्ज्वला योजना’ हे केवळ सरकारी उपक्रम न राहता, त्यातून जनआंदोलन उभे झाले. मुलीच्या जन्माचे स्वागत होऊन लिंग गुणोत्तरात अपेक्षित वाढ झाली आहे. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर मिळाले, त्यात काय विशेष? अशी टीका झाली. पण, डोक्यावर जळणाचा बोजा नेऊन महिलांचे टक्कल पडणे किंवा धुरामुळे होणारे श्‍वसन विकार आणि आंधळेपणापासून महिला वाचल्या. स्वयंपाक लवकर होऊन वेळेची बचत झाली आणि घरच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी हा वेळ सार्थकी लागला, असे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले.
अमेरिकेत बाळंतीण युवतींना चार महिन्यांची रजा मिळावी यासाठी लढा देणार्‍या इवांका ट्रम्प यांना, भारतातील युवतींना सहा महिन्यांची मातृत्व रजा मिळत असल्याचे कळताच, त्यांना प्रचंड आश्‍चर्य आणि कौतुक वाटल्याचे स्वराज यांनी सांगितले. हे कसे शक्य झाले? हा त्यांचा प्रश्‍न होता. पण, ‘अमुक एक मी करू शकत नाही’ हे शब्दच महिलांनी आपल्या शब्दकोषातून काढण्याचा मावशींनी दिलेला संदेश त्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.
‘परदेशात आपला मित्र – भारतीय दूतावास’ हा मंत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पदाधिकार्‍यांना दिल्याचे सांगून परदेशात अडकलेल्या २,०३,६६६ लोकांना आतापर्यंत मायदेशी आणले. परराष्ट्र धोरणात कूटनीती महत्त्वाची आहे. जगभरातील १९४ देशांमध्ये वाद आहेतच. पण, राष्ट्रहित सर्वोपरी या मावशींनी दिलेल्या सूत्रानुसार चालताना, भारताचे प्रत्येक राष्ट्रासोबत चांगले संबंध असून, संतुलन साधण्याचे काम सरकार करतेय, असे त्यांनी स्पष्ट केले.
रामनगरच्या श्रीशक्तिपीठात आयोजित या कार्यक्रमात मंचावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, श्रीशक्तिपीठाच्या अध्यक्ष नीला सप्रे आणि कार्यवाहिका स्मिता केळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन नीला सप्रे यांनी, तर सूत्रसंचालन मेधा नांदेडकर यांनी केले. मावशी केळकर यांच्या जीवनावरील माहितीपट या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. वैयक्तिक गीत अनुराधा टिकेकर यांनी सादर केले. सभागृहात समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, विश्राम जामदार, समितीच्या पदाधिकारी आणि सेविकांची प्रमुख उपस्थिती होती.
स्मृतिशिल्पाची विशेषता
तारखेनुसार २७ नोव्हेंबर हा वंदनीय मावशी केळकर यांचा चाळीसावा स्मृतीदिन आहे. त्यांना सेविकांनी अंतिम प्रणाम दिलेल्या जागीच हे स्मृतिशिल्प उभारण्यात आले आहे. ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रशांत सातपुते यांनी या शिल्पाचे डिझाईन केले असून, त्यांच्यासह शिल्पाचे काम पूर्ण करणार्‍या जेडी बिल्डकॉनचे संजय जोशी आणि महेश दंदे यांचा केंद्रीय मंत्री स्वराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावशींचा फोटो एनलार्ज करून त्यानुसार कटिंग करून सिमेंटमध्ये हे शिल्प साकारले आहे. तसेच, शिल्प दररोज सगळ्यांना बघण्यासाठी खुले राहणार आहे.
सेविकेचे व्यक्तिमत्त्व राष्ट्राला समर्पित : शांताक्का
दगडातून अनावश्यक भाग वगळून आवश्यक गोष्टी राहू दिल्या की ज्याप्रमाणे देखणे शिल्प घडते, त्याचप्रमाणे, व्यक्तीमधील चांगले गुण कायम ठेवून वाईट भाग काढून टाकून अंतरात्म्याला समाधान देणारे कार्य केल्यास राष्ट्राला समर्पित व्यक्तिमत्त्व घडेल, हाच मावशींचा संदेश होता. त्यानुसारच, समितीचे कार्य पुढे जात आहे. तेजस्वी हिंदू राष्ट्राचे निर्माण हे ध्येय मावशींनी सेविकांना दिले असल्याचे शांताक्का यांनी आपल्या संबोधनात नमूद केले.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (456 of 2027 articles)

Election Voting
दिल्ली, २७ नोव्हेंबर - मध्यप्रदेश आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २८ नोव्हेंबरला मतदान होत आहे. या दोन राज्यात मतदानाची जय्यत ...

×