ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » मिशन शक्तीचे तंत्रज्ञान कुणालाही विकणार नाही

मिशन शक्तीचे तंत्रज्ञान कुणालाही विकणार नाही

•चाचणीचा निर्णय २०१४ मध्येच झाला
•संरक्षण मंत्री सीतारामन् यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, २८ मार्च –

Nirmala Sitharaman2

Nirmala Sitharaman2

‘मिशन शक्ती’ अंतर्गत अंतराळात क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेण्याचा निर्णय २०१४ मध्येच झाला होता. केंद्रात भाजपाप्रणीत रालोआचे सरकार आले आणि डीआरडीओच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती, असे स्पष्ट करताना, आम्ही तंत्रज्ञान कोणत्याही देशाला सांगणार नाही आणि विकणारही नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी केले.
अंतराळातील शत्रू राष्ट्रांचे उपग्रह भेदणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. हा प्रकारच अयोग्य आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे अंतराळ मंत्रालयाचाही कारभार आहे. त्यामुळे या मुद्यावर देशाला संबोधित करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयावर टीका करणार्‍यांनी सर्वप्रथम या ऐतिहासिक उपलब्धीचे महत्त्व समजून घ्यायला हवे, असे सीतारामन् यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
’ए-सॅट’ च्या यशस्वी चाचणीविषयी तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता, ही आजवरची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. कारण, अंतराळात उपग्रहाचा अचूक भेद घेणारे क्षेपणास्त्र असणारा भारत हा जगातील चौथा देश झालेला आहे. यातही विशेष बाब अशी आहे की, हे क्षेपणास्त्र आपण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित केले आहे. ते इतर कोणत्याही देशाकडून मागितले नाही आणि कुणीही ते आपल्याला दिलेले नाही. आपण स्वबळावर ते विकसित केलेले आहे आणि आपल्या क्षमतेची चुणूक जगाला दाखवली आहे, हे नागरिकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
आपल्या देशाने आतापर्यंत अनेक उपग्रह अंतराळात पाठविले आहेत. यात अन्य देशांच्या उपग्रहांचाही समावेश आहे. अतिशय कमी खर्चात आपण मंगळयान मोहीमही यशस्वी करून दाखविली आहे, पण आज आपण जे केले, ते अभूतपूर्व असेच आहे. अवघ्या तीन मिनिटांत अंतराळातील ३०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा आपण अचूक भेद केलेला आहे, असे त्यांनी सांगितले. २०१४ मध्येच या प्रणालीला मंजुरी मिळाल्यानंतर तिची चाचणी इतक्या उशिरा का घेण्यात आली, असे विचारले असता सीतारामन् म्हणाल्या की, तुम्ही समजता तितका उशिर मुळीच झालेला नाही, उलट मी तर असे म्हणेन की, अगदी वेळेत आपण ही चाचणी पार पाडली आहे. २०१२ मध्ये भारताने ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली होती, त्याचवेळी डीओरडीओचे संचालक व्ही. के. सारस्वत यांनी, आपल्याकडेही अंतराळातील क्षेपणास्त्र भेदण्याची क्षमता असल्याची माहिती संपुआ सरकारला दिली आणि हे तंत्रज्ञान विकसित करण्याची परवानगीही मागितली होती, पण देशाच्या सुरक्षेत कुठलीही रूची नसलेल्या संपुआ सरकारने परवानगी नाकारली होती. आमच्या सरकारने मात्र सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांमध्येच यासाठी परवानगी दिली.
या चाचणीची घोषणा पंतप्रधानांनी करणे आवश्यक होते काय, या प्रश्‍नात त्यांनी स्पष्ट केले की, मी संरक्षण मंत्री, जेटलीजी अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदी अंतराळ मंत्री आहेत, मग संबंधित खात्यातील उपलब्धींची घोषणा आमच्यापैकीच कुणीतरी करणारच, नाही का? आज आपल्या देशाने अंतराळात ऐतिहासिक यश प्राप्त केले, त्याची माहिती देशवासीयांना मिळायला नको काय आणि अंतराळ मंत्री या नात्याने पंतप्रधान त्या यशाची माहिती राष्ट्राला संबोधित करून देऊ शकत नाही काय?
मिशन शक्तीमधून कोणता संदेश पाठविला, असे विचारले असता, संपूर्ण जग भविष्यातील युद्धाचे स्वरूप म्हणून उपग्रहांकडे पाहात असताना, भारत मागे राहू शकत नव्हता. भारतही कुठेच मागे नाही, हाच संदेश यातून देण्यात आला आहे आणि मी स्वत: देशाची संरक्षण मंत्री या नात्याने या यशावर प्रचंड खुश आहे.

Posted by : | on : 29 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (131 of 2392 articles)

Arun Jaitley 1
सुधारण्याची वेळ आली : अरुण जेटली, नवी दिल्ली, २८ मार्च - जम्मू-काश्मीरच्या समस्येसाठी नेहरू आणि काँगे्रसची धोरणेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. ...

×