ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज

मिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने उतरवली वकिलांची फौज

►भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप,
नवी दिल्ली, ६ डिसेंबर –

Sambit Patra3

Sambit Patra3

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेलला भारतात आणल्यामुळे काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची झोप उडाली असून, आपले पाप लपवण्यासाठी तसेच मिशेलच्या बचावासाठी काँग्रेसने वकिलांची फौज उतरवल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संबित पात्रा यांनी या मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मिशेलचे प्रत्यार्पण झाल्यानंतर गांधी कुटुंबाच्या तोंडचे पाणी पळाले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला, असा आरोप करत ते म्हणाले की, त्यामुळेच मिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेसने वकिलांची मोठी फौज पाठवली आहे.
मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे मिशलचे प्रत्यार्पण शक्य झाले आहे. मात्र, यामुळे आनंद न होता, आपले पितळ उघडे पडेल, अशी भीती गांधी परिवाराला वाटत आहे, असा आरोप पात्रा यांनी केला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अलजो जोसेफ हे मिशेलचे वकील होते. भाजपाने यावर आक्षेप घेतल्यावर काँग्रेसने अलजो जोसेफ यांची पक्षातील पदावरून हकालपट्ठी केली. जोसेफ यांच्यासोबत विष्णू शंकर आणि श्रीराम प्रकट या दोन वकिलांनीही मिशेल यांच्यासाठी काम केले होते. यातील विष्णू शंकर हे केरळ काँग्रेसच्या नेत्यांचे पुत्र आहेत, तर श्रीराम प्रकट विद्यार्थी असतांना एनएसयूआयचे पदाधिकारी होते. काँग्रेसने अलजो जोसेफ यांची पक्षातील पदांवरून हकालपट्टी केली, तर अन्य दोन वकिलांची का केली नाही, अशी विचारणा पात्रा यांनी केली.
१० जनपथच्या इशार्‍यावरून म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सूचनेवरून मिशेल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीला काँग्रेसच्या वकिलांनी विरोध केला, असे पात्रा म्हणाले. एकाच्या सांगण्यावरून आपण मिशेलचे वकीलपत्र घेतले, असे अलजो जोसेफ यांनी म्हटले आहे, हा एक कोण आहे, ते समोर आले पाहिजे, अशी मागणी पात्रा यांनी केली.
आधी मोदी यांच्या संबंधाची चौकशी करा : काँग्रेस
ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीशी काँग्रेसचे नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आहेत, त्यामुळे मोदी यांच्या या कंपनीशी असलेल्या संबंधाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ऑगस्ट वेस्टलॅण्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला गोवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘चोर की दाढी मे तिनका’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या अलजो जोसेफ यांनी मिशेल यांच्या घेतलेल्या वकिलपत्रावर भाजपाने हल्ला चढवला होता.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी भाजपाच्या या भूमिकेचा समाचार घेतला. एखाद्याने घेतलेल्या वकिलपत्राचा पक्षाच्या भूमिकेशी संबंध जोडायचा असेल, तर सर्वात प्रथम जेटलींना उत्तर द्यावे लागेल. नीरव मोदी यांचे वकीलपत्र जेटली यांच्या मुलीच्या कंपनीने का घेतले, ते त्यांनी सांगितले पाहिजे. भोपाळ वायुकांडातील आरोपी कंपनीचा बचाव अरुण जेटली यांनी का केला, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असेे शेरगील म्हणाले.
रविशंकरप्रसाद यांनी सहाराचे वकीलपत्र का घेतले, त्याचप्रमाणे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ललित मोदीसाठी विदेशात प्रतिज्ञापत्र का दिले, हे आधी भाजपाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यात काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध काहीच पुरावे सापडत नसल्यामुळे भाजपा आता वकिलाच्या मुद्यावरून विनाकारण वातावरण तापवत आहे, असा आरोप त्यांनी केला.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून भाजपा काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत ते म्हणाले की, ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात भ्रष्टाचाराचा संशय आल्यानंतर काँग्रेसच्या सरकारनेच याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या कंपनीकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला होता. याउलट मोदी सरकारनेच या कंपनीला क्लीन चिट देत तिची पाठराखण केली होती.
ऑगस्टा वेस्टलॅण्डच्या घोटाळ्याचा फायदा खर्‍या अर्थाने भाजपानेच उचलला आणि आता तो काँग्रेसवर आरोप करत आहे. काँग्रेसने काळ्या यादीत टाकलेल्या या कंपनीला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर काढले आणि मेक इन इंडियात तिचा समावेश केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (807 of 2426 articles)

Supreme Court 2
दिल्ली, ६ डिसेंबर - केंद्र सरकारने अधिकार गोठवून सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी दाखल केलेल्या ...

×