ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ‘मोदीस्ट्रोक’: आयकर मर्यादा ५ लाख, शेतकर्‍यांना मानधन

‘मोदीस्ट्रोक’: आयकर मर्यादा ५ लाख, शेतकर्‍यांना मानधन

•छोटे शेतकरी, लहान उद्योजक, महिला, कामगार, मध्यमवर्गीयांना दिलासा
•५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
•छोट्या शेतकर्‍यांना वर्षाला मिळणार ६ हजार
•असंघटित कामगारांना ३००० रुपये निवृत्तीवेतन
•ग्रॅच्युएटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर
•अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी ७६ हजार ८०० कोटींची तरतूद
•’हाउज द जोश…’ संसदेत गुंजला ‘उरी’चा डायलॉग
•रेल्वेसाठी ६४,५०० कोटींची बंपर तरतूद
•गो संवर्धनावर ७५० कोटी खर्च करणार
•संरक्षण खात्याला मिळणार ३ लाख कोटी
•सैनिकांचे किमान निवृत्तीवेतन दुप्पट
•शेअर बाजारात तेजी,
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Piyush Goyal Budget 2019

Piyush Goyal Budget 2019

अर्थमंत्रालयाचा हंगामी पदभार असलेले पीयूष गोयल यांनी आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज शुक्रवारी संसदेत सादर केला. सध्या अडीच लाख रुपये असलेली आयकर सवलत मर्यादा दुपटीने वाढवत ती पाच लाख रुपये करून, गोयल यांनी पगारदार वर्गाला मोठा दिलासा दिलाच; शिवाय २ हेक्टर शेती असलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याचा प्रस्ताव ठेवून शेतकर्‍यांनाही आर्थिक बळकटी प्रदान केली. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी ७५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
आयकर सवलत मर्यादा वाढविण्यात आल्यामुळे देशभरातील सुमारे तीन कोटी करदात्यांना फायदा होणार आहे. यात निवृत्ती वेतनधारक आणि लहान व्यावसायिकांचाही समावेश असून, त्यांची वार्षिक आयकरातून सुमारे १८,५०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय, आयकर अधिनियम ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५० लाख रुपयेच कायम ठेवताना, स्टॅण्डर्ड डिडक्शनची मर्यादाही सध्याच्या ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली असल्यामुळे प्रत्यक्ष आयकर सवलत ही सात लाखांच्या घरात जाणार आहे. तथापि, पाच ते १० लाख रुपये उत्पन्न असणार्‍यांसाठी सध्या असलेली २० टक्के आणि १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न गटांकरिता ३० टक्क्यांची आयकर मर्यादा कायम ठेवण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी केली.
असंघटित कामगारांना तीन हजार रुपये निवृत्ती वेतन
गोयल यांनी आपल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. मासिक १०० रुपयांच्या गुंतवणुकीवर ६० वर्षे वय पूर्ण करणार्‍या कामगारांना मासिक तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. एखाद्या कामगाराने वयाच्या १८ व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास, त्या दरमहा ५५ रुपयेच गुंतवावे लागणार आहेत. सरकारतर्फे ४५ रुपये गुंतविण्यात येतील. सुमारे १० कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याचे गोयल यांनी जाहीर केले. आगामी पाच वर्षांच्या काळात ही योजना केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वांत मोठी योजना ठरणार आहे, असे गोयल यांनी सांगितले.
किसान सन्मान निधी
पीयूष गोयल यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचीही घोषणा केली. केंद्र सरकार देशभरातील लहान आणि अल्पभूधारक (२ हेक्टरपेक्षा कमी शेती) शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा करणार असल्याचे गोयल यांनी जाहीर केले. ही रक्कम वर्षात तीन हप्त्यात मिळणार असून, दोन हेक्टरपेक्षा कमी कृषक जमीन असलेल्या सुमारे १२ कोटी शेतकर्‍यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
चालू आर्थिक वर्षातच ही योजना देशभरात लागू केली जाणार आहे. या वर्षी या योजनेंतर्गत सरकार २० हजार कोटी रुपयांचे वाटप करणार असून, पुढील आर्थिक वर्षात ही रक्कम ७५ हजार कोटी रुपये इतकी राहणार आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
टीडीएसच्या मर्यादेत वाढ
गोयल यांनी उत्पन्नावरील टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स अर्थात् टीडीएसच्या मर्यादेतही वाढ जाहीर केली. सध्या १० हजार रुपये असलेली टीडीएसची मर्यादा आता ४० हजार रुपये करण्यात आली आहे.
गॅ्रच्युईटीच्या मर्यादेत वाढ
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या करमुक्त ग्रॅच्युईटीच्या मर्यादेतही वाढ करण्यात येत आहे. आता ३० लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे. सध्या ही मर्यादा २० लाख रुपये आहे. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील दोन वर्षांत भविष्य निर्वाह निधी योजनेमधील खाती दोन कोटींनी वाढली आहे. याचाच अर्थ, देशाात नोकर्‍या निर्माण होत असून, बेरोजगारी वाढत असल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे गोयल यांंनी सांगितले.
वित्तीय तूट ३.३ टक्क्यांवर
चालू आर्थिक वर्षाच्या काळात वित्तीय तूट जीडीपीच्या ३.३ टक्क्यांवर आणण्यात सरकारला यश आले असून, पुढील आर्थिक वर्षात ३.४ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य आम्ही निर्धारित केले आहे.
‘आयुषमान’ अंतर्गत १० लाख रुग्णांना फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत १० लाखावर रुग्णांना फायदा झाला आहे. यामुळे मध्यम व गरिबांचे सुमारे तीन हजार कोटी रुपये वाचले आहे, असा दावा पीयूष गोयल यांनी केला. औषधांच्या किमती कमी झाल्याने त्याचा लाभही गरीब रुग्णांना मिळाला आहे. या योजनेंत नोंदणी झालेल्या औषध दुकानांमधून रुग्णांना माफक दरात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. मोदी सरकारने आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व विकास केला आहे.
सात हजार रुपये बोनस
गोयल यांनी आपल्या अर्थसंकल्पात देशभरातील नोकरदार वर्गासाठी आणखी एक मोठी घोषणा केली. २१ हजार रुपये पगार असलेल्यांना ७ हजार बोनस देण्यात येईल. ईपीएफओच्या माध्यमातून हा बोनस मिळणार असल्याचे गोयल यांनी जाहीर केले. मासिक १५ हजारावर वेतन मिळविणार्‍या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. मजुराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रासाठी तीन लाख कोटींची तरतूद
चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेले आव्हान लक्षात घेऊन, या अर्थसंकल्पात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी ३ लाख कोटींपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण दलातील जवानांच्या वन रँक वन पेन्शन योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत ३५ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे, असे गोयल म्हणाले. मागील अर्थसंकल्पात सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ९५ हजार कोटींची तरतूद केली होती. यावेळी प्रथमच संरक्षण क्षेत्रातील तरतुदीने तीन लाख कोटींचा आकडा पार केला आहे.
गाईंसाठी कामधेनू योजना
गोयल यांनी अर्थसंकल्पात गाईंच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना सुरू करण्याची घोषणा केली. गोमातेच्या सन्मानासाठी सरकार कधीच मागे हटणार नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल, ते केले जाईल. देशभरात राष्ट्रीय गोकूळ आयोगाची स्थापनी केली जाईल. कामधेनू योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च केले जातील, असे गोयल यांनी जाहीर केले.
पशू, मत्सपालन कर्जात सवलत
पशुपालन आणि मत्स पालन व्यवसायासाठी घेण्यात येणार्‍या कर्जावरील व्याजदरात २ टक्के सूट मिळेल, असे गोयल यांनी सांगितले. यामुळे या व्यवसायात सहभागी असलेल्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
संसाधनांवर पहिला हक्क गरिबांचाच
देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यकांचाच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संपुआ सरकारच्या काळात स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले होते. आज मात्र पीयूष गोयल यांनी, देशातील संसाधनांवर पहिला अधिकार केवळ गरिबांचाच आहे, असे जाहीर केले. गाव देशाचा आत्मा आहे, त्यामुळे या गावांचा सन्मान करताना त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे, असे गोयल यांनी जाहीर केले.
भाडेवाढ नाही, रेल्वेसाठी १.५८ लाख कोटी
रेल्वे मंत्री असलेले पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कुठलीही वाढ न करता रेल्वेच्या विकासासाठी १.५८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या रेल्वेला बाहेर आणण्याच्या उद्देशाने आजवरची ही सर्वाधिक तरतूद ठरली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात धावणार आहे. सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वेचे नुकसान कमी होण्यासाठी मोठे काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.

ठळक वैशिष्ठे –
– ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त. उर्वरित टप्पे जैसे थे.
– ३ कोटी करदात्यांना लाभ होणार, ४० हजारापर्यंत व्याजही करमुक्त.
– दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी ३ हप्त्यात ६००० हजार रुपये जमा होणार. १ डिसेंबर २०१८ – पासूनच योजना लागू होणार.
– पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी शेतकरी क्रेडिट कार्ड, कर्जामध्ये ५ टक्के सूट.
– संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी. ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद.
– देशात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर.
– रस्ते, रेल्वे, हवाईसेवा सुधारण्यावर भर.
– १ कोटीपेक्षा अधिक लोकांनी नोटबंदीनंतर भरला आयकर.
– करदात्यांच्या संख्येत वाढ, यंदा १२ लाख कोटी करस्वरूपात मिळाले.
– मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वच परवानग्या एकाच खिडकीवर.
– ऑनलाईन व्यवहाराने सर्व चित्र बदलले, जन-धन योजनेचा मोठा वाटा.
– ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणले, त्रिपुरा रेल्वेच्या कक्षेत मिझोरम.
– येत्या ५ वर्षांत १ लाख डिजिटल गावांची निर्मिती.
– भारतात जगातील सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते, सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा.
– ५ वर्षांत विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या दुपटीने वाढली, १०० हून अधिक विमानतळ कार्यरत.
– देशात दररोज २७ किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती.
– जोखीम असलेल्या पदांसाठी भत्त्यात वाढ, वन रँक वन पेन्शन योजना लागू.
– गर्भवती महिलांसाठी २६ आठवड्यांच्या पगारी रजेची तरतूद.
– मुद्रा योजनेत १५ कोटींचे कर्जवाटप, योजनेचा ७० टक्के महिलांना लाभ.
– असंघटित कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना, ६० वर्षे पार कामगारांना ३ हजार रुपये निवृत्ती वेतन.
– ग्रॅच्युईटीची मर्यादा १० लाखांहून ३० लाखांवर
– १० कोटी असंघटित कामगारांसाठी केंद्राची श्रमयोगी निवृत्ती वेतन योजना.
– गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू संवर्धन योजना.
– स्वस्त घरांची योजना राबवली तर १ वर्ष आयकरात सुट, बिल्डरांना फायदा होणार
– एक घर विकून दोन घरे घेतली तर करांमध्ये सुट
– अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी ७६ हजार ८०० कोटींची तरतूद
– अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेली तरतूद ३५ टक्क्यांनी वाढवणार
– शेतकर्‍यांच्या कर्जाच्या तरतुदीमध्ये ११.६८ लाख कोटींची वाढ
– प्रधानमंत्री किसान योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपये
– सैनिकांचे किमान निवृत्तीवेतन दुप्पट. किमान ३५०० वरुन ७००० रुपये निवृत्तीवेतन मिळणार
– कामगाराचा अकस्मिक मृत्यू झाल्यास ६ लाखांची मदत
– कामगारांच्या मुळ वेतनात ४२ टक्क्यांची वाढ

महत्त्वाचे मुद्दे –
– आयकराच्या घोषणेमुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा
– सरकार नव्या भारताच्या निर्मिती कटीबद्द
– लोकांच्या सहभागामुळेच विकासाला जोश
– हा हंगामी अर्थसंकल्प नाही तर देशाच्या विकासाचं माध्यम आहे
– अर्थमंत्र्यांनी मानले करदात्यांचे आभार
– करदात्यांचे आभार, त्यांच्या करामुळेच तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याची संधी
– वित्तीय तुट सरकारच्या आवाक्यात राहणार
– महागाईचा दर १० टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर
– आम्ही देशाच्या १० वर्षाच्या विकासाचे उद्दीष्ट ठेवून काम
– २०३० पर्यंत १० लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे लक्ष्य
– अंतराळ विकासाला प्रोत्साहन; २०२२ पर्यंत भारताचा अंतराळवीर अंतराळात झेप घेणार
– जीएसटीमुळे महसूलात वाढ झाली. जानेवारी महिन्यात महसूल १ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता
– घर घेणार्‍यांनाही दिलास मिळणार, कर कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न
– जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे ग्राहकांवरचा १८ हजार कोटींचा बोजा कमी झाला
– जीएसटीमुळे गेल्या ७० वर्षातली सर्वात मोठी करसुधारणा
– येत्या काळात करचौकशी ऑनलाईन होणार
– या पुढे २४ तासात आयकर परतावा मिळणार
– १२ लाख कोटींचा कर जमा. आयकर भरण्याची पद्धत सोपी करण्यात आली
– देशभरात २१ नव्या एम्सची सुरूवात झाली आहे
– २०२२ पर्यंत सरकार सर्वांना घरे देणार. दीड कोटींपेक्षा जास्त घरे सरकारने तयार केली आहेत

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (454 of 2394 articles)

Piyush Goyal S
दिल्ली, १ फेब्रुवारी - कार्यवाहक अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी ५ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केल्यानंतर ...

×