ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी यांच्या द्वेषातून तयार झाली संधीसाधू आघाडी

मोदी यांच्या द्वेषातून तयार झाली संधीसाधू आघाडी

नितीन गडकरी यांचा स्पष्ट आरोप,
नवी दिल्ली, १२ जानेवारी –

Union Minister And Bjp Leader Nitin Gadkari

Union Minister And Bjp Leader Nitin Gadkari

पराभवाच्या भीतीने उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांना आघाडी करावी लागली, नरेंद्र मोदी यांच्या द्वेषातून ही संधीसाधू आघाडी तयार झाली असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी भाजपाला सत्तेवर येण्यापासून तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.
रामलीला मैदानावरील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राजकीय प्रस्ताव मांडताना गडकरी म्हणाले की, विरोधकांच्या महाआघाडीत कितीही पक्ष आले तरी त्यांचा पराभव आणि भाजपाचा विजय निश्‍चित आहे. विरोधकांनी आमच्याविरुद्ध कितीही खोडसाळ आणि निराधार आरोप केले, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणात आकंठ बुडालेल्या तसेच जातीयवादी राजकारण करणार्‍या या विरोधी पक्षांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय, त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही.
मोदी सरकारची साडेचार वर्षांतील कामगिरी पाहून अवसान गमावेलला काँग्रेस पक्ष तसेच त्याचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर निराधार आणि खोडसाळ आरोप करीत आहे. राफेल मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीनचिट दिली आहे, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्रदीर्घ भाषण करीत सर्व आरोपांचे मुद्देसूद निराकरण केले असले तरी काँग्रेसने भ्रष्टाचाराचे धादांत खोटे आरोप करणे थांबवले नाही.
पंतप्रधान हे कोणा एका पक्षाचे नाही तर संपूर्ण देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर असे खालच्या पातळीवरील आरोप करून राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर देशातील कोट्यवधी जनतेचा अपमान करीत आहे. एका सामान्य घरातून आलेली व्यक्ती देशाची पंतप्रधान होते, हे मान्य करण्याची तयारी नसल्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर असे खोडसाळ आणि निराधार आरोप करीत आहे, असे गडकरी म्हणाले.
मोदी यांचे सरकार सत्तेवर येण्याआधी देशाची स्थिती अतिशय वाईट होती, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला होता, सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले होते, पण मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाचे चित्र बदलून टाकले. जे काँग्रेसच्या साठ वर्षांत झाले नाही; ते मोदी यांनी साडेचार वर्षात करून दाखवले, हेच काँग्रेसचे दु:ख आहे.
सामाजिक आणि आर्थिक आघाडीवर सर्वांना समानता मिळावी, ही आमची भूमिका होती, त्यामुळे अनुसूचित जाती जमाती, तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मुस्लिम भगिनींना न्याय देण्यासाठी तीन तलाकसंदर्भातील विधेयक आणले, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. या प्रस्तावावर झालेल्या काही भाषणानंतर हा राजकीय प्रस्ताव पारित करण्यात आला.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (402 of 2234 articles)

Alokkumar Verma
चौकशी सुरू, नवी दिल्ली, १२ जानेवारी - वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेण्याच्या आरोपात सीबीआय संचालकपदावरून दूर ...

×