ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » राफेलची काही कागदपत्रे चोरीला

राफेलची काही कागदपत्रे चोरीला

•केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती,
नवी दिल्ली, ६ मार्च –

Supreme Court 1

Supreme Court 1

राफेल सौद्याशी निगडीत कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
डिसेंबरमध्ये राफेल प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका फेटाळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला, त्यावेळी केंद्र सरकारने महत्त्वाचे तथ्य दाबून ठेवले होते, असा आरोप करीत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी संयुक्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रमुख असलेल्या आणि न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या त्रिसदस्यीय न्यायासनाने या याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी सुरू केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी हिंदू वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाचा संदर्भ भूषण यांनी न्यायालयात दिला असता, महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी त्यास विरोध केला. त्यांचा हा लेख, चोरीला गेलेल्या कागदपत्रांवर आधारित आहे आणि याचा तपास सध्या सुरू आहे, असे त्यांनी न्यायालयास सांगितले.
एन. राम यांचा हिंदू या वृत्तपत्रातील पहिला लेख ८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाला. बुधवारीही त्यांची एक बातमी हिंदूमध्ये प्रकाशित झाली असून, सुनावणी प्रभावित करण्याच्या हेतूनेच ही बातमी प्रकाशित करण्यात आली आणि हा न्यायालयीन अवमाननेचा प्रकार आहे, असे वेणुगोपाल यांनी न्यायालयास सांगितले.
ही पुनर्लोकन याचिका फेटाळण्याची मागणी करीत वेणुगोपाल यांनी, भूषण हे प्रसिद्ध झालेल्या लेखावरून युक्तिवाद करीत असल्याचा आक्षेप न्यायालयात घेतला. केंद्र सरकार कागदपत्रे चोरीस गेल्याचा आरोप करीत असून, त्याबाबत केंद्राने काय केले, अशी माहिती न्यायालयाने त्यांना यावेळी विचारली.
राफेल प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली असताना केंद्र सरकारने महत्त्वाचे तथ्य दाबून ठेवले होते, असा युक्तिवाद यावेळी प्रशांत भूषण यांनी स्वतःच्या याचिकेवर, तसेच यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केला.
राफेल प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली नसती, तर केंद्र सरकारने दाबलेले तथ्य बाहेर आले असते, असेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.
ज्या कागदपत्रांवर भूषण विश्‍वास ठेवत आहेत, ती संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत आणि या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, असे वेणुगोपाल यांनी न्यायालयास सांगितले. भूषण यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालय राफेल सौद्यांची ही कागदपत्रे रेकॉर्डवर घेणार होती, असा याचा अर्थ होत नसल्याचे यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. चोरी गेलेल्या कागदपत्रांबाबत केंद्र सरकार काय कारवाई करीत आहे, याची माहिती भोजनानंतर होणार्‍या सुनावणीत देण्यात यावी, असे न्यायालयाने वेणुगोपाल यांना सांगितले. याचिकाकर्ते ज्या कागदपत्रांवर विश्‍वास ठेवत आहे, ती गोपनीय आणि वर्गीकृत श्रेणीतील आहे. त्यामुळे हे गोपनीयता अधिनियमाचे उल्लंघन आहे, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले.
चोरीला गेलेल्या कागदपत्रांवर ही याचिका अवलंबून असून, ती फेटाळण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली. हिंदू या वृत्तपत्रात बुधवारी प्रकाशित झालेली बातमी सुनावणी प्रभावित करणारी आहे आणि ही न्यायालयाची अवमानना आहे, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले.

Posted by : | on : 7 Mar 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (93 of 2216 articles)

Prime Minister Narendra Modi With Chief Minister Edappadi K. Palaniswami And Deputy Chief Minister O. Panneerselvam During A Nda Poll Rally In Chennai
नरेंद्र मोदी यांची घोषणा, चेन्नई, ६ मार्च - तामिळनाडूच दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन् यांचे नाव चेन्नईच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला देण्याचा ...

×