ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राफेलवरून राज्यसभेत गदारोळ

राफेलवरून राज्यसभेत गदारोळ

चौकशीसाठी जेपीसीची काँग्रेसची मागणी,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट –

Rajya Sabha

Rajya Sabha

राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी आज राज्यसभेत केली. या मुद्यावरून काँग्रेसने आज राज्यसभेत प्रचंड गोंधळ घातला, तसेच अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत धरणेही दिले. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी गोंधळातच काही विधेयके पारित करवून घेत सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले.
आज भोजनावकाशानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) दुरुस्ती विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू झाली. अल्पशा चर्चेनंतर हे विधेयक सभागृहाने मंजूर केले. याचवेळी काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी राफेल सौद्यावर चर्चा करण्यासाठी नियम २६७ नुसार आपण दिलेल्या स्थगनप्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा केली. मात्र त्याची दखल न घेता अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक सादर करण्याची सूचना केली. यामुळे काँग्रेस सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी वेलमध्ये धाव घेत जोरदार घोषणबाजी सुरू केली. या गोंधळातच नायडू यांनी क्रीडा विद्यापीठ विधेयक सादर करवून घेत त्यावर चर्चाही सुरू केली. काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू असतांना या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच ते विधेयक पारित करण्यात आले.
यानंतर नायडू यांनी होमिओपॅथी केंद्रीय परिषदेबाबतचे विधेयक सादर करण्याची सूचना आयुष मंत्री श्रीपाद नायक यांना केली. त्यामुळे काँग्रेस सदस्य आणखीनच भडकले, त्यांची घोषणबाजी आणखी वाढली. श्रीपाद नायक यांनी गोंधळातच विधेयक मांडले आणि गोंधळातच त्यावर चर्चा झाली. या चर्चेला गोंधळातच श्रीपाद नायक यांनी उत्तरही दिले. काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे चर्चेत कोण काय बोलत आहे, तसेच चर्चेला श्रीपाद नायक यांनी काय उत्तर दिले, ते काहीच ऐकू येत नव्हते.
राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची काँग्रेसच्या सदस्यांची मागणी होती. अध्यक्ष आपल्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे काँग्रेस सदस्यांनी वेलमध्ये बसकण मारली. गोंधळातच होमिओपॅथी केंद्रीय परिषद विधेयक पारित करण्यात आले. मात्र काँग्रेस सदस्यांचा गोंधळ थांबत नव्हता. त्याने आणखी उग्र रूप धारण केले. यानंतर आणखी एक विधेयक चर्चेला घेण्याची नायडू यांची इच्छा होती, पण विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांनी ते टाळले आणि विशेष उल्लेखासाठी सदस्यांची नाव पुकारली. गोंधळातच सदस्यांनी विशेष उल्ल्लेखाचे मुद्दे मांडले. त्यानंतर सभागृहात काँग्रेस सदस्यांचा गोंधळ सुरू असतांनाच अध्यक्ष सभापती नायडू यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यत स्थगित केले.

Posted by : | on : 10 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (652 of 1905 articles)


नवी दिल्ली, ९ ऑगस्ट - कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकांतर्गत या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व्यक्तीला जामीन देण्याची ...

×