ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राफेलवरून लोकसभेत गदारोळ

राफेलवरून लोकसभेत गदारोळ

►राहुल गांधींना बाराखडी शिकण्याची गरज
►संपुआपेक्षा २० टक्क्यांनी स्वस्त सौदा केला
►राफेलवर अरुण जेटली यांचा घणाघात,
नवी दिल्ली, २ जानेवारी –

Lok Sabha

Lok Sabha

राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप सातत्याने करणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बुधवारी घणाघाती हल्ला चढविला. आता असे वाटते की, राहुल यांना बाराखडी शिकविण्याची गरज आहे, कारण त्यांच्याकडे असलेली आकडेवारीच चुकीची आहे. संपुआ सरकारने राफेलचा जो व्यवहार केला होता, त्यापेक्षाही २० टक्के स्वस्त सौदा भाजपाप्रणीत रालोआ सरकारने केला आहे, अशा खरपूस शब्दात जेटली यांनी त्यांचा समाचार घेतला.
सर्वोच्च न्यायालयात राफेलवर याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्यावर न्यायालयाचा निकालही आला आहे. न्यायालयाने राफेल व्यवहारात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिला आहे, त्यामुळे या प्रकरणी आता संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे जेटली यांनी लोकसभेत राफेलवर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना स्पष्ट केले. तत्पूर्वी, चर्चेला सुरुवात करताना, राहुल गांधी यांनी राफेल हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आणि मोदी सरकारने करार करताना अनिल अंबानींना १ लाख ३० हजार कोटी रुपयांचा थेट फायदा करून दिल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना सडेतोड उत्तर देताना, जेटली म्हणाले की, राहुल गांधी अभ्यास न करता आरोप करतात. त्यांनी १ लाख ३० हजार कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला, हेच समजत नाही. राफेलचा एकूण करारच ५८ हजार कोटी रुपयांचा आहे. या करारात ३० ते ५० टक्के ऑफसेट भागीदारीचा पर्याय आहे. याचा अर्थ, एकूण करारातील रकमेच्या ३० ते ५० टक्के काम फ्रान्सच्या दसाँ कंपनीला भारतीय कंपन्यांना द्यावे लागणार. त्यामुळे फ्रान्सची कंपनी भारतीय कंपन्यांना देणार असलेले पुढील दहा वर्षांसाठीचे काम २९ हजार कोटी रुपयांचे आहे. यात अनेक कंपन्यांचा समावेश असून, अंबानींच्या कंपनीला ८०० कोटी रुपयांचे काम मिळेल व ते काम दसाँ कंपनी परस्पर देईल, त्यात आमचा काही संबंध नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
तो निर्णय संपुआचाच
राहुल गांधींना असे वाटते की, दसाँ कंपनी लढाऊ विमाने तयार करण्याचे काम भारतीय कंपनीला देणार आहे, पण हे सत्य नाही, असे सांगताना जेटली यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.ला विमानांच्या निर्मितीचे काम न देण्याचा निर्णय संपुआ सरकारनेच घेतला होता, असे स्पष्ट केले.
हे गणित बालवाडीतील मुलालाही कळेल
राहुल गांधी राफेलवर सातत्याने खोटे बोलत आहेत. ५०० विरुद्ध १६०० कोटी रुपयांचे जे गणित बालवाडीतील मुलालाही समजू शकेल, ते यांना समजत नाही. देशातील सर्वांत जुन्या काँगे्रस पार्टीच्या अध्यक्षांना लढाऊ विमान काय असते, हे समजू नये, ही फार मोठी शोकांतिका आहे. या देशात एक असे कुटुंब आहे, ज्यांना गणित तर समजते, पण देशाची सुरक्षा समजत नाही, असे सांगताना जेटली यांनी, राहुल गांधींच्या डबल ‘ए’च्या उत्तरात बोफोर्स तोफांमधील भ्रष्टाचारात नाव असलेल्या क्वात्रोची नावाचा उल्लेख केला. डबल ‘ए’ च्या उत्तरात जेटली म्हणाले की, राहुल बालपणी क्यू (क्वात्रोची) च्या मांडीवर खेळले होते.
मां-बेटा चोर है, गांधी परिवार चोर है
बोफोर्स, अगस्ता वेस्टलॅण्ड, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाचे नाव आल्याचा आरोप अरुण जेटली यांनी केला. यावेळी जेटली बोलत असताना, सभागृहात ‘गांधी परिवार चोर है, मां-बेटा चोर है,’ अशा घोषणा सत्ताधारी सदस्य देत होते.
युरो लढाऊ विमानांची आठवण झाली असावी
जेटली बोलत असताना, काँगे्रस सदस्य सभागृहात कागदी विमाने उडवत होते. त्यांना जोरदार चिमटा काढताना जेटली म्हणाले की, काँगे्रस सदस्यांना कदाचित राफेलसोबत स्पर्धेत असलेल्या युरो लढाऊ विमानांची आठवण झाली असावी. आपण तर भ्रष्टाचारात आकंठ बुडालो आहोतच, तेव्हा आता स्वच्छ प्रतिमा असलेल्या मोदी सरकारवरही भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करावे, असा विचार करूनच राहुल गांधी असे आरोप करीत असावे, अशी कोपरखळीही त्यांनी काढली. यावेळी जेटली यांनी बोफोर्स प्रकरणी गठित करण्यात आलेल्या जेपीसीच्या निष्कर्षांची आठवण करून दिली. आजवरच्या सर्वच संरक्षण खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेला पक्ष आता नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. सत्यता नाकारणे हा या पक्षाचा फार जुना आणि नैसर्गिक स्वभाव आहे. या मुद्यावर गेल्या सहा महिन्यांपासून काँगे्रसतर्फे बोलला जाणारा प्रत्येक शब्द निव्वळ खोटाच आहे. सभागृहातही त्यांनी खोट्याचाच पाढा वाचला आहे. आता तर त्यांनी खोटे बोलण्यात विशारद प्राप्त केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सुमित्रा महाजन संतापल्या
जेटली यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यासाठी काँगे्रस सदस्य घोषणा देत, कागदाची विमाने भिरकावत होते आणि सभागृहाच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन त्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करीत होत्या. सदस्य ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहून अखेर त्या संतापल्या. तुम्ही लहाणपणी कागदाची विमाने भिरकावली नव्हती का, नर्सरीतील मुले तरी चांगली असता, शिक्षिकांचे ऐकतात, पण तुम्ही ऐकण्याच्या पलीकडे गेले आहात, अशा शब्दात त्यांनी गोंधळी सदस्यांना खडसावले. शाळेत मुले सांकेतिक भाषेत बोलतात, तशीच सवय आपल्या नेत्यांनाही लागली, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
उत्तर देण्याची मोदींमध्ये हिंमतच नाही : राहुल
राफेलवरील चर्चेत सहभागी होण्याची, त्यावर उपस्थित प्रश्‍नांची उत्तरे देण्याची हिंमतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वत:ला खोलीत बंद केले आहे, असा आरोप काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
राफेलवर आज बुधवारी लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना, राहुल गांधी यांनी गोव्यातील एका मंत्र्याची कथित ऑडिओ क्लिप चालविण्याची परवानगी मागितली. यावर आक्षेप घेताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ही क्लिप बनावट आहे, तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहिली आहे काय, ती क्लिप बनावट असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाल्यास तुमच्यावर सभागृहाचा हक्कभंग केल्याच्या आरोपात नोटीस दिली जाईल आणि कदाचित तुम्हाला सभागृहातून बडतर्फही केले जाईल. जेटली यांची भूमिका पाहून राहुल गांधी चांगलेच हादरले. मला ही क्लिप चालवायची नाही आणि त्याची सत्यताही तपासायची नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ऑडिओ क्लिप खोटी असल्याची माहिती असल्याने राहुल गांधी यांना घाम फुटला आहे, ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत, असा चिमटा जेटली यांनी काढला.
भाजपाच घाबरली
आपल्या चेहर्‍यावरची भीती लपविताना राहुल गांधी म्हणाले की, आमच्याजवळ असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपाच घाबरलेली दिसत आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढविला. राफेल व्यवहारात माझ्यावर कुणीही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही, असा पंतप्रधानांचा दावा आहे, पण संपूर्ण देश त्यांना राफेलवर उत्तर मागत आहे, असे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला दीड तासांची मुलाखत दिली, मात्र राफेलवर ते काहीच बोलले नाही. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला नसेल, तर ते जेपीसी चौकशीसाठी का तयार नाही. या चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी भीती त्यांना वाटत आहे.
यावेळी अनिल अंबानी यांचा उल्लेख केला असता, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अंबानींचे नाव सभागृहात नको, कारण ते या सभागृहाचे सदस्य नाहीत, असे स्पष्ट बजावले. त्यानंतर त्यांनी ‘डबल ए’ असा उल्लेख केला. त्यांनी हा उल्लेख आपल्या भाषणात वारंवार केला.
हवाई दलाच्या १२६ राफेल विमानांची संख्या ३६ वर कोणी आणली? या व्यवहारात कोणी आणि का बदल केला? माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच सांगितले आहे की, करारात बदल करण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधत, जुना करार सरकारने का बदलला? संपुआ सरकार ५२६ कोटी रुपयांमध्ये १२६ राफेल विमान खरेदी करणार होती, आता मोदी सरकार १६०० कोटी रुपयांमध्ये ३६ राफेल विमाने खरेदी करीत आहे. या किमती का बदलल्या, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. फ्रान्स सरकारने स्वत: सांगितले की, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.कडून विमान तयार करण्याचे काम हिरावून अनिल अंबानींना देण्याचा निर्णय मोदी सरकारचाच होता. अखेर या कंपनीकडून काम का हिरावून घेतले, अशी विचारणाही त्यांनी केली.
मोदींनी चर्चेसाठी समोरासमोर यावे
राफेलशी संबंधित आमच्याकडे असलेले ऑडिओ क्लिप संपूर्ण खरी आहे, असा दावा करतानाच, या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेलच्या फाइल्स असल्यानेच, पंतप्रधान जेपीसी चौकशीला घाबरत आहेत काय, असा सवाल त्यांनी लोकसभेतील गोंधळानंतर आयोजित पत्रपरिषदेत केला. कदाचित, या फाइल्स स्वत:कडे ठेवून पर्रीकर पंतप्रधानांना ब्लॅकमेल करीत असावे, असा तर्कही त्यांनी काढला.

Posted by : | on : 3 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (453 of 2234 articles)

Devegowda Kumarswamy
दिल्ली, २ जानेवारी - कर्नाटकामध्ये आघाडी सरकार स्थापन करण्याआधी काँग्रेस व जनता दल (एस) यांच्यात सर्व पदे २:१ या प्रमाणात ...

×