ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राफेलवरून लोकसभेत गदारोळ, कामकाज स्थगित

राफेलवरून लोकसभेत गदारोळ, कामकाज स्थगित

•विरोधक देशविरोधी शक्तींच्या हातातले बाहुले
•सीतारामन् यांचा घणाघात,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –

Nirmala Sitharaman Lok Sabha

Nirmala Sitharaman Lok Sabha

राफेल व्यवहाराबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताचे तीव्र पडसाद आज शुक्रवारी लोकसभेत उमटले. यावरून काँगे्रस आणि अन्य विरोधी पक्षांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. हे वृत्त निराधार आहे, त्यात संपूर्ण सत्य नाही, असे स्पष्ट करताना, विरोधक काही देशविरोधी शक्तींच्या हातातले बाहुले बनले आहेत, असा घणाघाती हल्ला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी चढविला.
सकाळच्या गोंधळात दुपारी १२ पर्यंत कामकाज तहकूब झाले होते. दुपारी कामकाज पुन्हा सुरू होताच, सभागृहात विरोधकांचा गोंधळही सुरू झाला. काँगे्रस, तृणमूल आणि टीडीपीच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेकडे धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि फलकही दाखवले. हजारो कोटी रुपयांच्या या व्यवहारात पंतप्रधान कार्यालयाने किमतीच्या मुद्यावर समांतर चर्चा केली, असा आरोप या सदस्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी या मुद्यावर राजीामा द्यावा आणि राफेलचा तपास करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही विरोधक करीत होते. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन सदस्यांना शांत बसण्याची सूचना वारंवार करीत होते, पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या गोंधळातच सीतारामन् यांनी स्वत:हून या मुद्यावर निवेदन दिले. पंतप्रधान कार्यालय कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकते, या कार्यालयाचा तो अधिकारच आहे, त्याला हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ म्हणता येणार नाही. तुम्ही (विरोधक) अस्तित्वातच नसलेला मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न करीत आहात. भारताला अत्याधुनिक राफेल विमाने मिळू नये, अशी इच्छा असणार्‍या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विदेशी शक्तींना खुश करण्यासाठीच तुम्ही राफेलमध्ये भ्रष्टाचार शोधत आहात. या वर्तमानपत्राने संपूर्ण सत्य लोकांपुढे मांडलेले नाही. संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर त्यावर तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर काय म्हणाले, हे देखील वर्तमानपत्राने छापायला हवे होते. काळजी करण्यासारखे काहीच नाही, सर्वकाही ठीक आहे, असे पर्रीकर यांनी संरक्षण सचिवांच्या फाईलवर नोटींगच्या उत्तरादाखल नमूद केल्याचे सीतारामन् यांनी स्पष्ट केले.
तो हस्तक्षेप नव्हता काय?
संपुआ सरकारच्या काळात राष्ट्रीय सल्लागार परिषद गठित करण्यात आली होती आणि या परिषदेच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या. सरकारच्या प्रत्येक निर्णयाची चाचपणी करताना, त्या पंतप्रधान कार्यालयाचा कारभारही हाताळत होत्या, हा सरकारी कामात हस्तक्षेप नव्हता काय, असा संतप्त सवाल निर्मला सीतारामन् यांनी केला.
राज्यसभाही तहकूब
राज्यसभेतही राफेल मुद्यावरून प्रचंड गोंधळ उडाला. सदस्य शांत बसत नसल्याने अध्यक्षांनी वारंवार कामकाज तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ थांबत नव्हता. इंग्रजी दैनिकातील ‘त्या’ वृत्ताचा आधार विरोधकांनी या सभागृहातही गोंधळासाठी घेतला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी परवानगी नाकारली. या मुद्यावर काँगे्रस सदस्यांनी नियम २६७ अंतर्गत दिलेल्या नोटीसवरील आपला निर्णय मी सुरक्षित ठेवला आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले. या नियमांतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेवून उपस्थित मुद्यांवर चर्चा करण्याची तरतूद आहे.
मी आपला निर्णय राखून ठेवला असल्याने यावर कोणत्याही सदस्याने एक शब्दही काढू नये. तुम्ही कितीही बोलला तरी त्याची कामकाजात अधिकृत नोंद होणार नाही, असे नायडू म्हणाले. विरोधक मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. वारंवार आवाहन करूनही कुणीच शांत बसत नसल्याने नायडू यांनी अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Posted by : | on : 9 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (410 of 2394 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचा राहुल गांधींवर प्रहार, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी - मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेवून, तुम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करण्याचे ...

×