ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

राममंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

►संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची मागणी,
मुंबई, ३ डिसेंबर –

Dattatreya Hosbale

Dattatreya Hosbale

अयोध्येतील रामजन्मभूमीत जिथे वादग्रस्त बाबरीचे अवशेष आहे, तेथील खोदकामात राममंदिराचेच पुरावे प्राप्त झाले असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, पण अजूनही ही जमीन मंदिर बांधकामासाठी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता शक्य तितक्या लवकर कायदा तयार करून मंदिर बांधकामाचा मार्ग प्रशस्त करायला हवा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी विशद केली.
भगवान विष्णू यांनी वामन अवतारात केवळ तीन पावलांमध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे तिन्ही लोक व्यापले होते, पण त्याच भगवान विष्णूच्या रामावताराला त्यांच्या जन्मभूमीतच मंदिर बांधण्यासाठी जमीन मिळू नये, ही बाब अतिशय निराशाजनक आहे, असे होसबळे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात रविवारी विश्‍व हिंदू परिषदेतर्फे आयोजित विशाल धर्मसभेत बोलताना सांगितले.
याच महिन्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, या अधिवेशनात सरकारने राममंदिराचा मार्ग मोकळा करणारे विधेयक पारित करायला हवे, असे त्यांनी सांगितले. या धर्मसभेत जगद्गुरू रामानंदाचार्य, स्वामी नरेंद्राचार्य महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर आनंदगिरी महाराज, गोविंद देवागिरी महाराज, नयपद्मसागर महाराज आणि विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन उपस्थित होते.
भारतीय पुरातत्त्व खात्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर उत्खनन केले आहे. त्यांना तिथे राममंदिराचे पुरावे मिळाले आहेत. आता आपल्या शपथपत्रानुसार केंद्र सरकारने मंदिरासाठी जमीन उपलब्ध करायला हवी. या जागेवर रामाचेच मंदिर होते, ही बाब अलाहाबाद उच्च न्यायालयानेही सिद्ध केली आहे. कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा हा मुद्दा जर न्यायालयाच्या प्राधान्याचा राहिला नसेल, तर सरकारनेच कायदा करून, मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
नर्मदा नदीच्या किनार्‍यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर मग अयोध्येतील रामजन्मभूमीत रामाचे मंदिर का उभारले जाऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.
नरेंद्राचार्य महाराज
या महासभेत स्वामी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, धर्म हा मनुष्याचे अधिष्ठान आहे. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी आम्हाला जर प्राणाहुती द्यावी लागली, तर आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजू. राममंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा आहे आणि आपल्या अस्मितेसाठी हिंदूंनी जागृत व्हायलाच हवे. इतक्या वर्षांपासून संयम राखून असलेल्या हिंदूंच्या सहिष्णुतेचाही सरकारने विचार करायला हवा. प्रभू रामचंद्रांनी रावणाविरोधात युद्ध छेडले होते. यात त्यांना नल, नील, सुग्रीव आणि हनुमानाची मदत मिळाली होती, आज हिंदू समाजानेही असेच एकत्रित येण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी आदिवासी भागांमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या घटनांवरही चिंता व्यक्त केली.
गोविंदगिरी महाराज
गोविंदगिरी महाराज म्हणाले की, भगवान श्रीराम हे या देशाचे डीएनए आहेत. ते हिंदुत्वाची ओळख आहेत, मावनतेचा सर्वोच्च आदर्श आहेत. हा आदर्श पुनर्स्थापित करण्यासाठी अयोध्येत रामाचे मंदिर तातडीने उभे राहायला हवे. सोमनाथ मंदिराप्रमाणेच राममंदिराचाही मार्ग मोकळा व्हायला हवा.
नयपद्मसागर महाराज
यावेळी बोलताना नयपद्मसागर महाराज म्हणाले, भगवान श्रीरामाचे नाव घेतल्यानंतर ज्यांना जातीयवादाची अनुभूती होते, त्यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही. अलीकडील काळात संपूर्ण देश राममय होत आहे. लोकांमधील उत्साह पाहू जाता, आता राममंदिराचे बांधकाम रोखणे अशक्य आहे. पूर्वीच्या काँगे्रसप्रणीत संपुआ सरकारने श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. भारतात लोकशाही आहे आणि हिंदू या लोकशाहीचा श्‍वास आहे.
सुरेंद्र जैन यांची भूमिका
विहिपचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन म्हणाले की, रामजन्मभूमी मुद्दा हा मुदत संपलेल्या धनादेशासारखा आहे, पण आता काळ बदलला आहे. आजची युवा पिढी राम मंदिराच्या बांधकामासाठी पुढे आली आहे. मुसलमानांचे लाड पुरविण्यासाठी काँगे्रसने राम मंदिर बांधकामाचा मार्ग रोखून धरला होता. मी मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की, बाबर, गझनी आणि अकबर त्यांचे पूर्वज नव्हते, तर त्यांचे पूर्वज श्रीरामाचेच वंशज होते. जेव्हा एखादा देश गुलामगिरीतून मुक्त होतो, तेव्हा त्या देशातून आक्रमणकर्त्यांची पदचिन्हे नष्ट केली जातात. सोमनाथ मंदिर याच प्रेरणेतून उभारले गेले आहे. आज सरदार पटेल असते, तर राममंदिरासाठी इतका संघर्ष करावा लागला नसता, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (68 of 1905 articles)

Electioncommission Building1
आयोगाची माहिती, नवी दिल्ली, ३ डिसेंबर - पुढील वर्षी लोकसभेसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक ...

×